Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

आयआयएमएस मध्ये जागतिक महिला दिन उत्साहात साजरा.

Date:

पिंपरी : यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या इंटरनॅशनल इन्स्टिटूयट ऑफ  मॅनेजमेंट सायन्स अर्थात  आयआयएमएस च्या चिंचवड येथील कॅम्पसमध्ये ‘जागतिक महिला दिन’ उत्साहात साजरा करण्यात आला. महिला दिनानिमित्त आयोजित मार्गदर्शनपर व्याख्यान करताना सायबेज कंपनीच्या ट्रॅव्हल आणि हॉस्पिटॅलिटी विभागाच्या वरिष्ठ उपाध्यक्ष गीता शाम यांनी भारतीय महिलांच्या सक्षमतेचे महत्व विशद करत महिलांनी स्वतःच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले. मुलाबाळांसह कुटुंबाचेही पालन पोषण आणि जडणघडण करण्यात महिलांची भूमिका जास्त महत्वाची आहे असे सांगून शहरी महिलांपेक्षा ग्रामीण भागातील महिला या अधिक कणखर असतात असेही  सांगितले.
याप्रसंगी आयोजित करण्यात आलेल्या  परिसंवादात सायबर सुरक्षा तज्ञ् नीना गोडबोले,एक्यूरेट कंपनीच्या स्ट्रेटीजी हेड आर्ट पारखी, मानसोपचार   समुपदेशक  अनघा  छत्रे,आयटीसी कंपनीच्या एरिया एक्झिक्युटिव्ह प्रियांका उदवंत या विविध क्षेत्रातील अनुभवी महिलांनी विविध उदाहरणाचे दाखले देत उपस्थितांशी संवाद साधला.
प्रियांका उदवंत म्हणाल्या की, महिलांच्या प्रगतीमध्ये सर्वात मोठा अडथळा या महिलाच असतात,त्यामुळे महिलांनी एकमेकींना समजून घेऊन सहकार्य करणे गरजेचे आहे. नीना गोडबोले यांनी  मनोगतात सांगितले की, स्वप्न बघण्यासाठी पैसे लागत नाहीत त्यामुळे  महिलांनी निदान स्वप्न बघताना तरी संकोच बाळगू नये आणि आपली स्वप्न कशी पूर्ण होतील यादृष्टीने वाटचाल करण्याचे धाडस करावे.
आरती पारखी यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, नोकरदार महिलांनी व्यक्तिगत जीवन आणि काम  संतुलन सांभाळण्यासाठी आवर्जून नियोजन करावे, तसेच विविध प्रशासकीय  जबाबदाऱ्या सांभाळताना आलेले अनुभवही त्यांनी विशद केले.
तर अनघा छत्रे यांनी आपल्या मनोगतात सांगितले  की, बहुतांश महिलांना ‘मला नाही जमत’ असं म्हणणारी नकारात्मक मानसिकता झटकून टाकली पाहिजे. एकूणच परिसंवादात सहभागी वक्त्यांनी सांगितले की, महिलांनी जगण्याकडे आशावादी दृष्टिकोनातून पाहावे आणि  स्वतःचा विकास करतानाच अन्य महिलांनाही  त्यांच्या प्रगतीसाठी जमेल तितका हातभार लावावा असे सांगितले.
या कार्यक्रमाला यशस्वी एज्युकेशन सोसायटीच्या  आयआयएमएसचे संचालक डॉ.मिलिंद मराठे, डॉ.विजय कुलकर्णी, यशस्वी इन्स्टिट्यूट फॉर स्किल डेव्हलपमेंटचे संचालक अभिषेक कुलकर्णी, यशस्वी एकेडमी फॉर स्किल्सचेचे संचालक संजय छत्रे, यशस्वी इन्स्टिटूयट ऑफ टेक्नॉलॉजीच्या शैक्षणिक विभाग प्रमुख सुनीता पाटील, ऑपरेशन हेड ई. आर.मूर्ती, प्रा. भाग्यश्री कुंटे, प्रा. अमर गुप्ता, संस्थेच्या मनुष्यबळ व्यवस्थापिका आदिती वाकलकर यांच्यासह संस्थेचे सर्व अध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परिसंवादाचे सूत्रधार म्हणून डॉ. दीप्ती लेले यांनी काम पाहिले,  सूत्रसंचालन निकिता पुराणिक या विद्यार्थिनीने  केले. तर या कार्यक्रमासाठी मुक्ता केसकर, आशा महाजन, रश्मी बदले आदींनी विशेष सहकार्य केले.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

मुरलीधर मोहोळ यांच्या नेतृत्वात लढणार महापालिका निवडणूक : मंत्री चंद्रकांत पाटील यांची स्पष्टोक्ती

‘पुणेकरांशी संवाद साधून निवडणुकीसाठी वचननामा तयार करणार’-मुरलीधर मोहोळ यांच्या...

सुप्रिया सुळे, कंगना रणौत अन् महुआ मोईत्रांचा एकत्र डान्सचा व्हिडीओ व्हायरल

मुंबई- नेहमी एकमेकींच्या विरोधात आगपाखड करणाऱ्या आणि...

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी युवक काँग्रेसचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर

मुंबई, दि. ७ डिसेंबर २०२५ आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर...

चित्रपट निर्माता विक्रम भट्ट यांना अटक:30 कोटींच्या फसवणुकीचा आरोप

मुंबई-चित्रपट निर्माता विक्रम भट्ट यांना मुंबई आणि राजस्थान पोलिसांनी...