पुणे : नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट अर्थात एनआयपीएम ही मनुष्यबळ विकास क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील संस्था असून संस्थेचे संपूर्ण देशभर पस्तीस हजार सभासद आहेत. ५३ विभागीय केंद्रांमार्फत संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी विश्वेश कुलकर्णी यांची निवड झाली. २०१८-२०२० या कार्यकाळासाठी बहुमताने हि निवड करण्यात आली.
विश्वेश कुलकर्णी हे ‘यशस्वी’ या संस्थेचे अध्यक्ष असून मनुष्यबळ व कौशल्य विकास या क्षेत्रामध्ये गेली ३०-३५ वर्षे कार्यरत आहेत.त्यांनी एनआयपीएमच्या पुणे विभागाचे अध्यक्ष म्हणूनही याआधी काम पाहिले होते. त्यांच्याच अध्यक्षतेखाली पुणे येथे पश्चिम विभागीय परिषद आयोजित करण्यात आली होती. तसेच येत्या २८ व २९ सप्टेंबर २०१८ रोजी पुणे येथे ‘नॅटकॉन’ ही आंतरराष्ट्रीय परिषद आयोजित करण्यात आली असून या परिषदेसाठी सुमारे १५ देशांचे वक्ते व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
विश्वेश कुलकर्णी यांची ‘राष्ट्रीय अध्यक्ष’ म्हणून निवड झाल्याबद्दल विविध स्तरातून आनंद व्यक्त होत आहे. त्यांची या पदावर निवड झाल्याने ३५ वर्षांनंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रातील नेतृत्वाला राष्ट्रीय स्तरावर आपली भूमिका मांडण्याची संधी मिळाली आहे.


