पुणे : २१ जून रोजी संपूर्ण जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा होत असताना पुण्यातही स्किल डेव्हलपमेंटमध्ये कार्यरत असणाऱ्या ‘यशस्वी’ संस्थेच्यावतीने ‘योग दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
निरोगी आरोग्य राहावे यासाठी सर्वांनी ‘योगाभ्यास’ हा आपल्या दैनंदिन आयुष्याचा भाग बनवावा, दिवसातून किमान अर्धा तास तरी आवर्जून वेळ काढून योगासने करावीत असे आवाहन यावेळी प्रसिद्ध योग प्रशिक्षक मनाली देव यांनी व्यक्त केले.
संस्थेच्या शिवाजीनगर येथील हॉटेल मेनेजमेंट एन्ड केटरिंग स्किल सेंटर येथे ‘योग’ दिनानिमित्त प्राणायाम व विविध योगासनांची प्रात्याक्षिके करण्यात आली.
या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात विद्यार्थी-विद्यार्थिनी,शिक्षक व अन्य कर्मचारी यांनीही आपला सहभाग नोंदवला.तसेच योग दिन आयोजनासाठी यशस्वी संस्थेच्या संचालिका स्मिता धुमाळ यांनी विशेष प्रयत्न केले.

