देशभरातून 5 हजाराहून अधिक ग्रामपंचायत प्रतिनिधींची उपस्थिती
पुणेः
‘वॉटर सिसोेर्सेस इन ग्राम पंचायत’ या पुस्तकाचे प्रकाशन उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते लखनौ येथे झाले. यावेळी केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री नरेंद्र िंसंह तोमर, केंद्रीय पंचायतीराज मंत्री पुरूषोत्तम रूपाला, ‘यशदा’ चे महासंचालक आनंद लिमये उपस्थित होते. देशभरातून 5 हजाराहून अधिक ग्रामपंचायत प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
‘यशदा’(यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी), पंचायतीराज मंत्रालय भारत सरकार आणि यु एन डी पी (युनायटेड नेशन्स् डेव्हलपमेंट प्रोग्रॅम) यांच्या मार्गदर्शनाखाली हे पुस्तक तयार केले आहे. हे पुस्तक ग्रामपंचायतीच्या प्राथमिक माीहितीच्या स्वरूपातील आहे. हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषांमध्ये अगदी सोप्या भाषेत छायाचित्र आणि रेखाचित्रांच्या माध्यमातून तयार करण्यात आले आहे. डॉ. हेमंत वसेकर आणि डॉ.सुमंत पांडे यांनी या पुस्तकाच्या समन्वयकाचे काम पाहिले आहे.
ग्रामपंचायत पातळीवर जलसाक्षरतेचा प्रसार व्हावा, या प्रमुख उद्देशाने हे पुस्तक तयार करण्यात आले आहे.
यामध्ये एकूण 10 प्रकरणे आहेत. यामध्ये जल संधारण, भू जल व्यसस्थापन, मृदा जलसंधारणाचे तंत्रज्ञान, वृक्ष लागवडीचे महत्व, पाणलोट व्यवस्थापन, जल अंदाजपत्रक आदी विषयांवर लेख आहेत.
‘सर्व भारतीय भाषांमध्ये हे पुस्तक पोहचावे आणि जलसाक्षरतेचा प्रसार व्हावा, अशी अपेक्षा नरेंद्रसिंह तोमर यांनी प्रकाशन प्रसंगी व्यक्त केली.

