जागतिक हृदयदिनानिमित्त माधवबागद्वारा मुंबईतील डबेवाला संघटनेच्या सदस्यांसाठी हार्ट अटॅक प्रथमोपचार प्रात्यक्षिक

Date:

मुंबई-हार्ट अटॅक कुणालाही कधीही येउ शकतो. आज भारतात दर तेहतीस सेकंदाला एक व्यक्ती हार्ट अटॅकने मृत्यूमुखी पडते आहे. अशावेळी पहिल्या सहा मिनिटांत सी.पी.आर हे प्रथमोपचार त्या व्यक्तीला दिले असता त्याच्या जगण्याची शक्यता खूप वाढते. यामुळे जास्तीतजास्त भारतीयांनी हे शिकले पाहिजेत.

मुंबईतील डबेवाला ही संघटना कित्येक वर्ष मुंबईकरांना घरचा आहार पोहोचवण्याचे काम चोखपणे व नियोजनबद्ध रीतीने करत आहे. लोकांच्या पोटाची काळजी घेत असतानाच आता ते कुणाचा प्राण वाचवण्याचे कामही करू शकतात. कारण माधवबागने एका खास उपक्रमामध्ये त्यांना सी.पी.आरप्रात्यक्षिकाद्वारे प्रशिक्षण दिले आहे. चर्चगेट स्टेशनबाहेर इरॉस थिएटरपाशी सकाळी ११.१५ ते १२ दरम्यान या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी माधवबागचे संस्थापक व सी.ई.ओ. डॉ. रोहित माधव साने आणि  मुंबई जेवण डबे वाहतूक संघ अध्यक्ष श्री रामदास करवंदे उपस्थित होते. यावेळी डबावाल्यांसमोर सोप्या भाषेतील विवेचनासह सविस्तर सी.पी.आर. प्रात्यक्षिक करण्यात आले. माधवबागचे वेस्टर्न मुंबई मेडिकल हेड डॉ. बिपिन गोंड यांनी हे प्रात्यक्षिक दिले. भारतात दरवर्षी सुमारे २८ लाख व्यक्ती हृदयविकाराने बळी पडत आहेत या पार्श्वभूमीवर हे सी.पी.आर प्रथमोपचार अनेकांचे प्राण वाचवू शकतात.

यामुळे माधवबागद्वारा जागतिक हृदय दिनाच्या निमित्त असे प्रात्यक्षिक प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. २००६ मध्ये डॉ. रोहित साने यांनी माधवबागची स्थापना केली आणि थोड्या कालावधीतच हृदयरोगावरील एक विश्वासार्ह आणि उपयुक्त उपचार करणारी वैद्यकीय संस्था म्हणून माधवबाग प्रसिद्ध झाले. ‘आवश्यक ते सर्व काही’ हे ब्रीदवाक्य असलेले माधवबाग आपल्या उपचारपद्धतीमधील अत्याधुनिक वैद्यकीय तपासण्या, आयुर्वेदीक उपचार व आहारव्यायामातील योग्य जीवनशैली बदल यांच्या समावेशामुळे ओळखले जाते. गेल्या १३ वर्षांमध्ये दहा लाखाहून अधिक रुग्णांनी या उपचारांचा लाभ घेतला आहे. माधवबागचे उपचार हे कठोर संशोधन व शास्त्राधारित आहेत.

माधवबागला नुकताच ‘इंडियाज ग्रेटेस्ट ब्रॅन्ड हा पुरस्कार मिळाला असून डॉ. रोहित साने यांचा ‘इंडियाज ग्रेटेस्ट लीडर’ असा सन्मान एशियन बिझनेस  ॲन्ड सोशल इन्व्हेस्टर फोरम२०१८-१९च्या १२व्या एडिशनद्वारा करण्यात आला. माधवबागच्या २ हॉस्पिटल आणि २००हून अधिक क्लिनिक्समधून हृदयविकार व संबंधित आजारांवर  विनाशस्त्रक्रिया आयुर्वेदीक पद्धतीने उपचार केले जातात.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...