पुणे- संपूर्ण पुणे शहर ,गल्ली बोळ लॉक डाऊन च्या काळात खोदून ठेवलेल्या महापालिकेत आता टेंडर काढण्यापूर्वीच कामे करणे ,आणि नुकतेच केलेले रस्ते पदपथ उध्वस्त करण्याचा धडाका लाऊन महापालिकेचे लाखो करोडो रुपयांचा चुराडा करण्याची जणू शर्यतच लागली आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी आताच कमाई डोळ्यासमोर ठेऊन चाललेला हा कारभार महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयातून जोरात सुरु आल्याचा आरोप होतो आहे.यात सर्वात आघाडीवर भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय असल्याचे वारंवार दिसून येते आहे . येथील अधिकारी आणि ठेकेदार यांच्या संगनमताने लाखो -करोडो रुपयांची धूळधाण केली जात असल्याचे सांगण्यात येते आहे .
दरम्यान अशाच एका प्रकरणाच्या संदर्भात कॉंग्रेसचे नगरसेवक अविनाश बागवे यांनी महापालिका आयुक्तांना पत्र दिले आहे त्यात त्यांनी म्हटले आहेकी,’ पुणे महानगरपालिकेने मार्च 2021 मध्ये महापौर निधीतून प्रभाग क्र.19 मध्ये भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय शेजारील घंघाळे पथ येथे लाखों रुपये खर्च करून फुटपाथ करण्यात आले होते.
त्याच ठिकाणी आता मे 2021 मधेच बिगर निविदा काम चालू करून दोनच महिन्यापूर्वी झालेल्या चांगल्या पदपथाची नासधूस करून मनपाचे लाखों रुपयांचे आर्थिक नुकसान करण्यात आले.
या पराक्र्णी संबंधित ठेकेदार, व अधिकाऱ्यांनवर कडक कारवाई करावी.
करोना काळात असा भ्रष्टाचार होणे ही अतिशय गंभीर बाब आहे. आयुक्तांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे .
लॉक डाऊन, कोरोना ची महामारी याकाळात महापालिकेच्या ठेकेदारांची कामे थांबलेली नाहीत एकूणच शहरात अनेक ठिकाणी सर्व नियम धाब्यावर बसवून रस्ते खोदाई करण्यात आली आहे यापैकी कुठेही कसले काम आहे, कोणाच्या आदेशाने सुरु आहे, त्याची कालमर्यादा किती आहे , टेंडर किती रकमेचे आहे, कोण काम करते आहे ? अशा पद्धतीची परिपूर्ण माहितीचा फलक काम होत असेल तिथे लावणे क्रमप्राप्त असते. पण असे फलक कुठेही दिसत नाहीत .

