लसीचे दोन्हीही डोस घेतलेल्यांना निर्बंधांमधून सूट मिळावी यावर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार; उपमुख्यमंत्री अजित पवार

Date:

पुणे- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज पिंपरी चिंचवड येथे एका कार्यक्रमासाठी आले असताना माध्यमांशी बोलताना म्हणाले की, ‘लसीकरण मोठ्या प्रमाणावर केले गेले पाहिजे आणि दोन डोस घेतलेल्यांना हळूहळू बाहेर पडायची परवानगी देण्यात आली पाहिजे, असे माझे वयक्तिक मत आहे. पण त्याबाबत मी शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार आहे.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, ‘प्रत्येकाची मते ही वेगवेगळी आहेत. काही जणांना वाटते की, पुढचे 100 ते 120 दिवस हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. त्यामुळे या दिवसांमध्ये कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन केले गेले पाहिजे. मात्र अनेक ठिकाणी लोक विनामास्क फिरताना दिसत आहेत. अशी बेफिकिरी योग्य नाही’ असेही पवार म्हणाले.अजित पवारांनी माध्यमांसोबत संवाद साधत असताना लसींच्या पुरवठ्यावरही भाष्य केले आहे. ते म्हणाले की, ‘केंद्र सरकारकडून लोकसंख्या लक्षात घेऊन कोरोना लस मिळायला हवी. मात्र, असे होत नाही. लस उपलब्ध होत नाही यामुळे लसीकरणाचा वेग मंदावला आहे. जुलैमध्ये लस मिळेल असे केंद्राकडून सांगण्यात आले होते. पण अजूनही पुरेशी लस मिळालेली नाही’

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पीएम सूर्यघर योजनेच्या जाचक अटीविरोधात महावितरण कार्यालयावर मोर्चा

ग्राहकहित व पर्यावरणासाठी सौरऊर्जेच्या जाचक अटीच्या निषेधार्थ महावितरणवर...

पंतप्रधान आवास योजनेतील सव्वाचार कोटीच्या घोटाळ्यावर मुनगुंटीवार आक्रमक

'तारीख पे तारीख' नको, थेट निलंबन करा! सुधीर मुनगंटीवारांचा...

हुंडाविरोधी कायद्याची कडक अंमलबजावणी व जिल्हास्तरावर विशेष पथके तैनात करा- डॉ. गोऱ्हे

बुलढाणा-बाणेर येथील विवाहितांच्या आत्महत्या प्रकरणी सखोल चौकशी व कठोर...

१० लाख रुपयांची X रे मशीन ६१ लाखांना खरेदी केली-आरोग्यमंत्री तानाजी सावंतांच्या काळात गैरव्यवहार :मनसे

मुंबई-महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग आणि महाराष्ट्र वैद्यकीय वस्तू खरेदी...