मनसुख हिरेन प्रकरणात सचिन वाझेंना अटक का झाली नाही? त्यांना कोण वाचवतोय? विधानसभेत देवेंद्र फडणवीस आक्रमक

Date:

  • फडणवीस यांनी मनसुख यांच्या पत्नीचा जबाब सभागृहा वाचून दाखवला.

मुंबई- मनसुख हिरेन यांच्या हत्येवरून विधानसभेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आज जोरदार खडाजंगी झाली. यामध्ये विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन यांच्या पत्नी विमला यांचे तक्रार अर्ज जशास तसे वाचून दाखवले. विमला हिरेन यांना संशय आहे, की एनकाउंटर स्पेशलिस्ट सचिन वझे यांनीच मनसुख यांची हत्या केली. देवेंद्र फडणवीस यांनी हे वाचताच सभागृहात गदारोळ उडाला. तर सत्ताधाऱ्यांनी प्रकरणाचा तपास एनआयएकडे गेल्यामुळे भाजपला घेरण्याचा प्रयत्न केला. अशात सभागृहाचे कामकाज 4 वेळा तहकूब कारावे लागले.

देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूचा मुद्दा उपस्थित केला. त्यांनी मनसुख यांच्या पत्नीचा जबाब सभागृहात वाचला. “माझ्या पतीची चौकशी वझे यांनीच केली होती. हिरेन तीन दिवस वाझेंकडेच होते. एवढेच नव्हे तर हिरने यांची गाडीही चार महिने वाझेंकडेची होती” असे हिरेन यांच्या पत्नी म्हणाल्या. “वझेंना 201 कलमाखाली अटक का झाली नाही? वझे यांना कोण वाचवत आहे?” असा सवाल यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.

सभागृहात बोलताना फडणवीस म्हणाले, “मी जबाब वाचून दाखवतो. वरील एकंदर परिस्थितीवरुन, माझ्या पतीचा खून झाला असावा अशी माझी खात्री आहे. हा खून सचिन वाझेंनी केला असावा असा माझा संशय आहे. म्हणून सदर घटनेबाबत सखोल चौकशी व्हावी. यामध्ये अजून दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत. पहिली म्हणजे 2017 चा एफआयआर आहे. यानुसार दोन लोकांनी 40 लाखांची खंडणी मागितल्याचा एफआयआर आहे. यात दोन लोकांनी अटकपूर्व जामीन घेतला. यातील एकाचे नाव धनंजय विठ्ठल गावडे तर दुसऱ्याचे नाव सचिन हिंदुराव वाझे असे आहे.”

सचिन वाझे कोणत्या पक्षाचे? त्यांना तत्काळ अटक करा.
दरम्यान, सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर गृहमंत्र्यांनी मोहन डेलकर आत्महत्या प्रकरणाची एसआयटी चौकशीची घोषणा केली. त्यावर देवेंद्र फडणवीस संतापले. सचिन वझे यांना तत्काळ अटक करा. सचिन वझेचे काय हे आम्हाला कळाले पाहिजे. सचिन वझे कोणत्या पक्षाचे होते? त्यांना मनसुख हिरेन प्रकरणी तत्काळ अटक करा. त्यांना पाठीशी का घातले जात आहे? असेही फडणवीस यांनी सुनावले आहे.
दरम्यान अन्वय नाईक हत्या प्रकरण फडणवीस यांनी आपल्या कारकीर्दित दाबले असा घणाघाती आरोप गृह मंत्री यांनी केला तेव्हा अशा धमक्या देऊन वाझेला वाचवु पहाता काय ? कोणती चौकशी लावायची ते लावा, आम्ही घाबरत नाही असे फडणवीस म्हणाले.

या वेळी महाविकास आघाडीचे आमदार भास्कर जाधव हे सुद्धा आक्रमक झालेले दिसले.त्यांनी फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली. भास्कर जाधव म्हणाले की, 2017 साली देवेंद्र फडणवीस सत्तेत असताना त्यांनी अन्वय नाईक प्रकरण दाबले. आता ठाकरे सरकार नाईक यांच्या पत्नीच्या तक्रारीवरुन याप्रकरणाची चौकशी करत आहे. त्यावेळेस सचिन वझे प्रकरणाचा तपास करत होते. ते पदावर कायम राहिले तर माजी मुख्यमंत्र्यांसह अनेकजण अडचणीत येतील. त्यामुळे भाजपकडून सचिन वझे यांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोप शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

येरवडा कारागृहात 5 मोबाईल,2 पॉवर बँक,चार्जिंग वायर सापडली..

पुणे- येथील येरवडा मध्यवर्ती कारागृहात पुन्हा एकदा सुरक्षेचा प्रश्न...

माझी गाणी आजही रसिकांच्या पसंतीत -सिनेगीतकार समीर अंजान

'एमआयटी एडीटी' विद्यापीठाच्या 'पर्सोना महोत्सवा'ची उत्साहात सांगता लोणी-काळभोर (पुणे)...

अंतरकचेरी व्हॉलीबॉल स्पर्धेत सलग दहा वर्षे विजेतेपदाची परंपरा कायम!

पिंपरी चिंचवड महापालिकेचा दणदणीत विजयपिंपरी : पुणे आंतर कचेरी...