Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

१९८ रुपये किलोची पावडर असताना, तब्बल १० हजार ६०० रुपये किलोची पावडर कशाला :स्थायी समितीचा महाघोटाळा थांबवा – अश्विनी कदमांची आयुक्ताकडे मागणी

Date:

पुणे- गेल्या २६ ऑगस्ट ला नगरसेविका अश्विनी नितीन कदम यांनी महापालिका आयुक्तांसह महापालिकेचे मुख्य लेखापाल , अतिरिक्त आयुक्त यांच्या नावे पत्र दिलेय . पण अजूनही यातील कोणीही या प्रकारची दाखल घेतली नाही अगर चौकशी केली नाही अगर खुलासाही केला नाही . ज्याचा खुलासा खरे तर २४ तासाच्या आत  करायला हवा होता . कारण ही त्यास तसेच आहे . अश्विनी नितीन  कदम यांनी केलेला आरोप अत्यंत गंभीर आहे तो म्हणजे बायोविझाबायोलोजीकल ओडर कंट्रोलर कम्पोस्टिंग पावडर  १० हजार ६०० रुपये दराने ४७१ रुपये प्रती किलोने एकूण ४९ लाख ९२ हजार ६०० रुपयात खरेदी करण्याचा स्थायी समितीचा  ५६४ क्रमांकाचा प्रस्ताव तातडीने रद्द करावा . कारण प्रत्यक्षात नावांचा खेळ करून १९८ रुपये किलो दर असलेली आरोबिक सिटी वेस्ट ट्रीटमेंट पावडर च या पूर्वी खरेदी केली गेली आहे.अश्विनी कदम या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा आहेत त्यामुळे त्यांना या प्रकारची माहिती आहे , त्या म्हणाल्या महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने शहरातील ओल्या कचऱ्यामुळे होणारी दुर्गंधी नष्ट करण्याकरिता जीव वैद्यकीय औषध फवारणी करणे हे काम मी. झेनिथ मायक्रो कंट्रोल यांच्या कडून ८९ लाख ४ हजार रुपये  पर्यंत करून घेण्यास  व त्याच्याशी करारनामा करण्यास स्थायी समितीची मान्यता मिळावी म्हणून महापालिका आयुक्तांना २२ मार्च २१ रोजी  पत्र दिले आहे.यावर मोनिका वाळुंजकर,केतकी घाटगे,विलास नवाळी,सुधीर चव्हाण, अजित देशमुख या अधिकाऱ्यांच्या सह्या आहेत. युनुस पठाण आणि रमेश शेलार यांची नावे आहेत पण सह्या नाहीत . या पत्रात त्यांनी  असे म्हटले आहे कि,’ शहरात सद्य स्थितीत १ हजार ते पंधराशे टन ओला कचरा निर्माण होतो  . यात प्रामुख्याने २०० मेट्रिक टन क्षमतेचा प्रकल्प हडपसर येथे आहे.सुस रोड येथे २०० मे. टनाचा बायो मिथनायझेशनचा प्रकल्प आहे. सद्य स्थितीत १३ बायोगॅस प्रकल्प सुरु असून अन्य प्रकल्प अन्य कारणांमुळे सुरु होऊ शकलेले नाहीत  सादर ओळ कचरा संकलन वाहतूक व प्रक्रिया प्रकल्प या ठिकाणी दुर्गंधीयुक्त वास येत असल्याच्या नागरी तक्रारी येत आहेत. समाविष गावात कचरा विलागीकर्ण होत नाही तेथील मिश्र कचऱ्याचे प्रमाण २०० मेट्रिक टन आहे. तेथूनही दुर्गंधी च्या तक्रारी येतात . या पूर्वी खात्याकडून आरोबिक पावडर खरेदी करून उरली कचरा डेपो व अन्य ठिकाणी वापरली आहे. सदरची निविदा क्रमांक ७३ -२०२० ३१ ऑगस्ट २०२० रोजीच संपुष्टात आली आहे. यामुळे ओल्या कचऱ्यावरदुर्गंधी नाहीशी करण्याकरता परिणामकारक औषध फवारणी आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर झेनिथ मायक्रो कंट्रोल यांनी बायो विझार्त पावडर महापालिकेस पुरवठा करण्याची तयारी दर्शविली आहे.सदर पावडरचे पेटंंट असून मध्य प्रदेशातील रीवा महापालिका आणि साताऱ्यातील मलकापूर नगर पालिकेने या पावडरचा वापर केला आहे. भारत सरकारच्या जल आणि स्वच्छता मंत्रालयाने जुलाई २०१५ च्या पत्रात या पावडरची माहिती दिली आहे.  एक किलो पावडर मधून ५० ते ६५ टन ओल्या कचऱ्यावर फवारणी करणे शक्य असून  १२ ते १४ दिवसात त्याचे जैविक खात निर्मिती होते व खाता पासून बियाणे उग्विन्यास मदत होते. शिवाय ओल्या कचऱ्याची दुर्गंधीही येणार नाही .त्याकरिता प्रतिदिन ७ किलो पावडर घ्यावी ज्याचा खर्च ७४ हजार २०० रुपये येणार आहे.सद्यस्थितीत ४ महिने कालावधीकरता पावडरचा उपयोग आवश्यक आहे या करता ९० लाख रुपये खर्च अपेक्षित आहे . रामटेकडी फायनल प्लॉट नं ८७/८८ येथे प्रक्रिया न होणारा सुमारे ३५० मी. टन कचरा जमा होतो त्याबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत . अशा सर्व बाबींचे अवलोकन होऊन बायो विझार्त हि पावडर झेनिथ मायक्रो कंट्रोल यांच्याकडून मनपा  अधिनियम १९४९ चे शेड्युल चाप्टर ५ (२)(२) अन्वये १०६०० रुपये प्रती किलो दराने ४ महिन्याकरता ८९ लाख ४ हजार रुपयांपर्यंत खरेदी करण्यास प्रशासकीय मान्यता मिळणे व स्थायी समिती ची मंजुरीसाठी पाठविणे साठी या विषयपत्रिकेवर स्वाक्षरी होणेस विनंती आहे. २२ मार्च च्या या पत्रा नंतर  खुद्द आयुक्तांनी आपल्या सहीनिशी १६ जुलै २०१२१  रोजी ५६४ क्रमांकाचा प्रस्ताव त्वर्य असे नमूद करून नगरसचीवांकडे पाठविला. या प्रस्तावात त्यांनी असे म्हटले आहे कि, शहरातील सार्वजनिक स्वच्छतेकारिता बायो विझार्ड बायो लोजिकल ओडर कंट्रोलर कम्पोस्टिंग पावडर क्रोनिक स्पॉटवर, कचऱ्यावर, मेलेल्या जनावरांवर फवारणी करण्याकरता प्रदूषण विरहित आरोबिक सिटी वेस्ट  ट्रीटमेंट महाराष्ट्र महापालिका अधिनियम मधील अनुसूची -ड प्रकरण ५ मधील २ (२) अन्वये झेनिथ मायक्रो यांच्याकडून ४९ लाख ९२ हजार ६०० रुपयांपर्यंत खरेदी करण्यास ,करारनामा करणेस व बिल अदा करण्यास स्थायी समितीची मान्यता मिळावी . अश्विनी कदम यांनी या प्रस्तावाला स्थायी  समितीने दिलेल्या मान्यतेवर आक्षेप घेतला आहे.सदरच्या कामासाठी मिळणाऱ्या पावडरचा दर हा १९८ रुपये प्रती किलो असल्याचा दावा करत महापालिका ती असताना १० ६०० रुपये किलो प्रती दराने खरेदी का करत असल्याचा प्रश्न उपस्थित करत या प्रकरणी चौकशी करून दोषी व्यक्तीना शासन करावे  अशी मागणी सौ. कदम यांनी केली आहे. आयुक्त, स्थायी समिती अध्यक्ष , घनकचरा विभाग ,अतिरिक्त आयुक्त यांनी याप्रकरणी अद्याप कोणताही खुलासा  अगर उत्तर दिलेले  नाही .

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले:मोहोळ

पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत...

श्रमिक-कष्टकऱ्यांसह वंचित घटकांसाठी लढणारा महान संघर्षयोध्दा हरपला-उपमुख्यमंत्री अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांना...

सामाजिक चळवळींचा आधारवड, श्रमिकांचे ‘बाबा’ हरपले – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

श्रमिक चळवळींचे ज्येष्ठ नेते बाबा आढाव यांना श्रद्धांजली मुंबई, दि.८:-...

राहुल गांधी म्हणाले,बाबा आढावांनी वंचित आणि शोषितांच्या साठी जीवन समर्पित केले

नवी दिल्ली: ज्येष्ठ समाजवादी आणि कष्टकरी समाजाचे नेते बाबा...