
मुंबई- ‘वाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटाला विरोध दर्शवत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या चित्रपटावर बंदी घालावी यासाठी काँग्रेसच्या वतीने मागणी करण्यात आली आहे. राज्यात OTT आणि सिनेमागृहात हा चित्रपट येत्या 30 जानेवारीला म्हणजे गांधी पुण्यातिथीदिनी प्रदर्शित होणार असून, ‘वाय आय किल्ड गांधी’ या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. हा चित्रपट राष्ट्रपिता महात्मा गांधींची हत्या करणारा नथूराम गोडसे याच्यावर तयार करण्यात आली असून, त्यात महात्मा गांधी यांची गोळी झाडून हत्या करण्यात येते.आणि नथुराम स्वतःचे स्पष्टीकरण देतो,जे आम जनतेला पटवून देण्यासाठी चित्रपटामधून मांडले जाते आहे हे खुलेआम दाखवून त्याचे उदात्तीकरण आणि गांधींचे अवमूल्यन करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
30 जानेवारीला महात्मा गांधींची पुण्यतिथी
महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित “वाय किल्ड आय गांधी” या चित्रपटाला बंदी घालण्यात यावी अशी मागणी केली आहे. 30 जानेवारी 1948 रोजी नाथूराम गोडसे याने महात्मा गांधी यांची हत्या केली होती. चित्रपट निर्माता गांधीजीच्या हत्येचे समर्थन करत असून, 30 जानेवारी 2022 रोजी “वाय किल्ड आय गांधी” या चित्रपटाला प्रदर्शित करण्याचे प्रयत्न करत आहेत. या दिवशी गांधींजी पुण्यतिथी देखील आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधींच्या विचारांनी जग प्रभावित
नाना पटोले म्हणाले की, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांनी संपुर्ण जग प्रभावित झाले आहे. भारताला देखील महात्मा गांधीच्या नावाने जगभरात ओळखले जाते. सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या शस्त्रांचा वापर करुन भारत जिंकता येतो, हे महात्मा गांधींनी आपल्या स्वातंत्र्यातून दाखवून दिले आहेत. 30 जानेवारीला महात्मा गांधी यांची पुण्यतिथी आहे.
यादिवशी राष्ट्रीय एकता, जातीय सलोखा, अहिंसा आणि शांतता यांचा दिवस म्हणून जगभरात साजरा केला जातो. तर दुसरीकडे आपल्या देशात अशांतता, द्वेष आणि हिंसाचार दाखवणारा ‘वाय किल्ड गांधी’ हा चित्रपट दाखवण्यात येणार आहे. त्यामुळे फॅसिस्ट वृत्तीला बळ मिळेल. असे नाना पटोले यांनी म्हटले आहे.

