कोण होणार गृहमंत्री ?

Date:

मुंबई: सोमवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांचा समावेश होणार आहे. त्यांनी गृह खाते घेतले नाही तर ते दिलीप वळसे पाटील यांच्याकडे जाऊ शकते. मात्र सध्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे त्यांच्या संयत कार्यपद्धतीमुळे सध्या शरद पवार यांच्या सर्वाधिक जवळ गेले असल्याचे बोलले जाते. त्यामुळे गृह खात्यासाठी त्यांनीही जोरदार फिल्डिंग लावली आहे.दुसरीकडे शिवसेनेमध्ये देखील मंत्रिपदासाठी इच्छुकांनी जोरदार लॉबिंग सुरू केल्याचे कळते. मंत्रिपदासाठी शिवसेनेकडून अनेक नावांची चर्चा सुरू आहे. यात रविंद्र वायकर, संजय राठोड, गुलाबराव पाटील, दादा भुसे, अनिल परब, तानाजी सावंत, प्रकाश आबिटकर, सुनील प्रभू, दीपक केसरकर, उदय सामंत, आशीष जैस्वाल, रविंद्र फाटक, अब्दुल सत्तार, संदिपान भुमरे, राहुल पाटील, शंकरराव गडाख, मंजुळा गावित, प्रताप सरनाईक, बालाजी किणीकर आदींचा या नावांमध्ये समावेश असल्याचे कळते. विधान परिषदेवरील दिवाकर रावते, रामदास कदम यांच्याबाबत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

अजित पवार यांना गृह खाते मिळावे, अशी त्यांच्या समर्थक आमदारांची इच्छा आहे. मात्र गृह खाते हे जितके ताकद देणारे असते तितकेच ते विवादांना सामोरे जाण्याचे कारणही ठरू शकते. त्यामुळे अजितदादांच्या समर्थकांमध्येच यावरून दोन गट आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी गृह खाते नाकारल्यास त्यासाठी दिलीप वळसे व जयंत पाटील यांच्यात स्पर्धा होण्याची शक्यता आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

पत्रकारिता संपली तर समाज संपेल – ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई

पत्रकारिता जगवायची की मारायची जनतेने विचार करावा - अविनाश...

पुण्यात घरगुती पीएनजी (PNG) आणि सीएनजी (CNG) पुरवठा 100 टक्के अखंडित राहणार: एमएनजीएल (MNGL) चे आश्वासन

घरगुती वापरासाठीच्या नैसर्गिक वायू पुरवठ्यात कोणतीही अडचण किंवा टंचाई...