पुणे, 5 जुलै 2017: भारतीय जलतरण महासंघाच्या विद्यमाने महाराष्ट्र राज्य हौशी जलतरण संघटना यांच्या तर्फे आयोजित 44व्या ग्लेनमार्क ज्युनिअर राष्ट्रीय जलतरण स्पर्धेत
वॉटरपोलो प्रकारात साखळी फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्र, पश्चिम बंगाल यांनी, तर मुलींच्या गटात पश्चिम बंगाल, कर्नाटक या संघांनी आपापल्या प्रतिस्परध्यांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल, म्हाळुंगे बालेवाडी येथील जलतरण तलाव येथे सुरु असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्र संघाने आपली विजयी मालिका कायम ठेवत कर्नाटक संघाचा 10-0असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. महाराष्ट्र संघाकडून भागेश कुठेने 6 गोल, तर भूषण पाटील, अभिषेक गुप्ता यांनी प्रत्येकी एक गोल केला. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या लढतीत पश्चिम बंगाल संघाने केरळ संघाचा 5-2 असा पराभव करून अंतिम फेरी गाठली. विजयी संघाकडून विशाल यादव व दिपांकर सरदार यांनी प्रत्येकी दोन गोल तर सागर मोंडलने एक गोल केला.अंतिम फेरीत महाराष्ट्र संघाचा सामना पश्चिम बंगाल संघाशी होणार आहे.
मुलींच्या गटात उपांत्य फेरीत पश्चिम बंगाल संघाने केरळ संघाचा 7-3 असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. पश्चिम बंगाल कडून जस्मिन खाटूनने 4 गोल तर, अनुश्री दासने दोन गोल आणि अनीश शहाने एक गोल केला.
कर्नाटक संघाने महाराष्ट्र संघाचा 7-4 असा पराभव केला. अंतिम फेरीत पश्चिम बंगाल संघाचा सामना कर्नाटक संघाशी होणार आहे.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: वॉटरपोलो: उपांत्य फेरी: मुले:
पश्चिम बंगाल: 5(विशाल यादव 2, सागर मोंडल 1, दिपांकर सरदार 2) वि.वि.केरळ: 1(रोहित एजे 1);
महाराष्ट्र: 10(भागेश कुठे 6, भूषण पाटील 1, अभिषेक गुप्ता 1, वैभव कुठे 2)वि.वि.कर्नाटक: 0;
मुली:
पश्चिम बंगाल: 7(अनीश शहा 1, अनुश्री दास 2, जस्मिन खाटून 4)वि.वि.केरळ: 3(सुर्वा व्हीएस 2, कृपा आर आर 1);
कर्नाटक: 7(स्वरणा रचना 3, कांकना भिडे 1, आर्या दीक्षित 1, शिवानी रेड्डी 2)वि.वि.महाराष्ट्र: 4(नम्रता व्यवहारे 1, महिमा मोझेस 3)


