पुण्यात आता ..लिटर, लिटरने मोजून मापून ..विकत घ्यावे लागेल पाणी … पाणी रे पाणी …

Date:

पाणी रे पाणी … तेरा रंग कैसा … जेबमें है जितने पैसे .. बस है वैसा … …..

पुणे- पाणी रे पाणी … तेरा रंग कैसा … जेबमें है जितने पैसे .. बस है वैसा … असे चित्र आता पुण्यात महापालिकेच्या कृपाछत्राने निर्माण होते आहे . ज्याच्या खिशात पैसे , त्यालाच मिळेल पाणी; हो, ते हि अगदी मोजून मापून …

 

1 2 3 4

तुम्ही दुध लिटरने मोजून घेता … तुम्ही रिक्षाने जाता..मीटर नुसार पैसे देता, विजेचे बिल मीटर नूसार देता… मग आता पाणी देखील मीटरने मोजून घ्या की… असा फतवा…. महात्मा गांधी जयंतीपासून अंमलात आणला जातो आहे . अर्थात २ ऑक्टोबर पासून या योजनेचा प्रारंभ होतो आहे . फसव्या जाहिराती त्यासाठी केल्या जात आहेत . २४ तास पाणी पुरवठ्याची फसवी स्वप्ने त्यासाठी दाखविली जात आहेत .
आणि हो, मीटर म्हणे तुम्हाला फुक्कट देणार … मीटर साठी काय हे, नगरसेवकाच्या इमारती विकून पैसे आणणार आहेत कि क्लास वन अधिकाऱ्यांच्या वेतनातून पैसे काढणार आहेत? नागरीकांचेच पैसे मीटर साठी वापरणार … आणि म्हणे फुक्कट मीटर देणार …
बरे आता आपण घरात पाणी साठवून ठेवतो… न जाणो .. उद्या पाणी नाही आले तर … ? आणि हो कधी तरी पाहुणे येणार म्हणून .. तर कधी पांघरुणे धुवायचीत.. आणि काही ना काही कारणाने आता पाणी साठविताना विचार करावा लागणार बरे … शौचालयात फ्लश किती वेळा करता कि आणि किती कुठे पाणी वापरता या सर्वच पाण्याची नोंद मीटर नुसार पालिका घेणार आहे आणि त्यानुसार तुमच्याकडून बिलाची आकारणी वसुली करणार आहे . अर्थात याला गर्भश्रीमंत म्हणा किंवा श्रीमंत किंवा आणखी कोणत्या वर्गातील लोकं कदाचित पाठींबा देतील ही…पाण्याची गळती रोखली पाहिजे , पाण्याची नासाडी थांबली पाहिजे याबाबत दुमत असण्याचे कारणच नाही .

पण आता पाणी अगदी पेट्रोल  तेला प्रमाणे आणि दुधाप्रमाने पाणी मोजून घेण्याची वेळ तुमच्यावर आली आहे हे मात्र नक्की … घ्या मोजून, हरकत नाही… आता बाहेरच्या .. रस्त्यावरच्या माणसाला हे प्यायला पाणी देताना हॉटेलवाले तर निश्चितच विचार करतील आणि सर्वसामान्य माणूस ही करेलच .. आणि एखादा श्रीमंत ही.. घरगड्याला प्रश्न करेल ..  अरे किती पाणी वापरतोस अंघोळीला ? या महिन्यात एवढे बिल कसे आले पाण्याचे म्हणून? पाण्याचे बिल वाढले कि मध्यमवर्गीयांत कधी पती पत्नींची भांडणे होण्याची वेळ येवू शकेल , झाडांना पाणी देताना , पक्ष्यांना पाणी देतांना जरी नाही विचार केला तरी  आज ना उद्या कधीतरी प्रत्येकाची पहा, कशी तरी, केव्हा तरी, तारांबळ उडते कि नाही .
मीटर पद्धती चा घाट पालिकेत काही आज घातला गेलेला नाही. 30 वर्षात मीटर पद्धतीचा हा चोथ्यांदा घातलेला घाट आहे . सुरुवातीला तर या मीटरचे रीडिंग घेण्यासाठी तरुणांची भरती देखील कधी काळी झाली होती  . आणि तेव्हा वर्षाच्या आत मीटर पद्धती उखडून हि गेली …
आता काय
स्मार्ट पुणे
होय … या स्मार्ट पुण्यात यंदा भरपूर पाऊस झाला आहे ,सर्व धरणे तुडुंब भरली आहेत.

तरी २९ टीएमसी च्या वर साठा करण्याची सध्या तरी क्षमता नाही यांची  .

अर्थात हि क्षमता वाढविण्याचा प्रयत्नच कोणी कधी केला नाही हा भाग वेगळा ..

कधी काळी आपल्या पूर्वजांनी पिण्याच्या पाण्यासाठी बांधलेल्या कात्रजच्या पेशवेकालीन धरणांची…  यांनी तळी आणि पर्यटन केंद्रे बनवून,  आसपासचे जंगल तोडून जंगलाची भूमी निवासी करवून करोडोंचा माल कमविण्यासाठीच वेळ घालविला .नवी धरणे कोणी कुठे कधी का बांधावीत ? आहे त्या जल स्त्रोत्रांचा वापर कोणी ,कसा ,का वाढवावा ? का जतन करावीत ही जलस्त्रोत्रे ? हे प्रश्न राहू द्यात तसेच…. 

पण आता  २४ तास पाण्याचे खोटे -फसवे स्वप्न दाखविताना आणि मीटरने पाणी पुरवठा करताना  अजिबात काही xxx वाटणार नाही का हो ?

सध्या देखील पुणेकर २४ तास पाणी वापरतो आहेच . जरी पालिकेने रोज ३ तास अगर ४ तास पुरवठा केला तरी ….पुणेकर २४ तास पाणी वापरतो आहेच.
म्हणजे, पाणी आल्यावर ते साठवून दिवसभर पाणी वापरतात पुणेकर, तेवढेच पाणी त्यांना …’ २४ तास मीटरने पाणीपुरवठा ‘ या योजनेत ही लागणार आहेच . आणि आपल्या धरणात… आपला वाटा आहे,तेवढाच मिळणार आहे .
मग …. ?
मग काय ?
मीटरचा घाट…. ?
कोणाकडून घेणार हे मीटर ? कोठून, कोणाचे,पैसे देणार त्यास ?
आणि पुणेकरांना कसे देणार हो पाणी .. म्हणजे कसे लिटर ?
आणि मीटर नादुरुस्त झाले तर … ? वेगाने पळाले तर ? पुन्हा बसवावे लागले तर .. किती खर्च करायचा हो पुणेकरांनी …
हेच का ते अच्छे दिन …. ?
आणि आता आहे ती पाणीवाटप यंत्रणा विना मीटरने सुरळीतपणे राबवू शकत नाही का? जुन्या नलिका बदलून सर्वत्र रोज सकाळी ४ तास संध्याकाळी ४ तास पाणीपुरवठा का करू शकत नाही ?

याची उत्तरे देण्याएवजी  हा नवा जलक्रांती चा तमाशा सुरु कसा झाला आहे  ?
असे प्रश्न विचारणार आहे कोणी पालिकेला …
नाहीतरी हात, पाय आणखी धुवायला कोणाला जास्त पाणी लागते आहे, असे म्हणत ..
चालू द्यात चालले आहे ते .. बघू यात काय होते आहे ते ..अशी भूमिका घेत याकडे पुणेकर दुर्लक्ष करणार आहेत ? या साऱ्या  प्रश्नांची उत्तरे आता येणारा काळच देणार आहे ..

कारण तोटयात गेलेला व्यापारी आपली यातना आपणच सहन करतो . आणि फायद्यात गेला तर इन्कमटॅक्स त्याला भरावा लागतो . तोटयात गेल्यावर नाही येत इन्कमटॅक्सवाले …. तसे दुष्काळात सलग ९ महिने एक वेळेचा पाणीपुरवठा स्वीकारणारे पुणेकर आता धरणे भरल्यावर मात्र मीटर लावून पाणी घेतीलही… पण धन्य हो त्या मीटर बनविणाऱ्याचे ..

महापालिकेच्या निवडणुका तोंडावर आहेतच ….

 

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक धनकवडे उद्या करणार भाजपात प्रवेश

पुणे-केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि आमदार भीमराव तापकीर यांच्या...

पुणे, पिंपरीत भाजपचा महापौर होईल,भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील-मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे -आगामी नगरपरिषद निवडणुकीत भाजप राज्यात एक क्रमांकावर राहील,...

‘भाजपा-शिवसेना पुणे महापालिका एकत्र लढणार’

शिवसेनेसोबत बैठकीनंतर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांची माहिती पुणे, ...

काँग्रेसमध्ये इनकमिंग जोरात, मिरा भाईंदरमध्ये वेंचर मेंडोंसा व तारेन मेंडोंसा यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश.

भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका, महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला विजयी...