Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

वॉर्डविझार्डतर्फे इलेक्ट्रिक दुचाकीच्या ४२६१ युनिट्सची विक्री, सप्टेंबर २०२२ मध्ये ७० टक्के वाढीची नोंद

Date:

वडोदरा३ ऑक्टोबर २०२२ – वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लि – या भारताताली आघाडीच्या इलेक्ट्रिक दुचाकी ब्रँड जॉय ई बाइकच्या उत्पादक कंपनीने सप्टेंबर २०२२ मध्ये इलेक्ट्रिक दुचाकीच्या ४२६१ युनिट्सची विक्री केली असून ७० टक्के वाढ नोंदवली आहे. गेल्या वर्षी म्हणजेच सप्टेंबर २०२१ मध्ये कंपनीने २५०० युनिट्सची विक्री केली होती.

इलेक्ट्रिक वाहनांना असलेल्या वाढत्या मागणीसह कंपनी सणासुदीच्या हंगामासाठी सज्ज होत आहे. ऑगस्ट २२ मध्ये कंपनीने १७२९ युनिट्सची विक्री केली होती आणि त्याच्याशी तुलना करता कंपनीने मासिक पातळीवर १४६ टक्क्यांची वाढ नोंदवली आहे.

सप्टेंबर महिन्यातील विक्री आकडेवारीविषयी वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लि. चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. यतिन गुप्ते म्हणाले, सणासुदीचे दिवस आणि ग्राहकांमधील सकारात्मक वातावरण यामुळे बाजारपेठेतील मागणी वाढत आहे. इलेक्ट्रिक दुचाकींसाठी आवश्यक पायाभूत सुविधा वाढत असताना दुसरीकडे पुरवठा साखळीमध्येही सुधारणा होत असल्यामुळे आमच्या उत्पादनांना मोठी मागणी मिळत आहे. सणासुदीचे दिवस आणि वैयक्तिक वाहनाची वाढती गरज यांच्या जोरावर दमदार रिटेलची आमची अपेक्षा आहे. केवळ देशातच नव्हे, तर परदेशातील बाजारपेठेत अस्तित्व तयार करण्यासाठी आम्ही सप्टेंबर महिन्यापासून नेपाळमध्ये विक्री सुरू केली असून इतर जागतिक बाजारपेठांमध्येही नव्या संधींचा शोध आम्ही घेत आहोत. बाजारपेठेची सध्याची क्षमता लक्षात घेता बाजारपेठेतील तेजीचे वातावरण टिकून राहील याबाबत आम्ही आशावादी आहोत.’

ग्राहकांमधील सकारात्मक वातावरण आणि पुरवठा साखळीतील समस्यांचे निराकरण केल्यानंतर कंपनीने आर्थिक वर्ष २३ च्या दुसऱ्या तिमाहीत ८४४८ युनिट्सची विक्री केली आहे. आर्थिक वर्ष २२ मधील दुसऱ्या तिमाहीच्या तुलनेत यंदा ५५ टक्क्यांची वाढ झाली असून तेव्हा कंपनीने ५४४६ इलेक्ट्रिक दुचाकींची विक्री केली होती.

आर्थिक वर्ष २३ च्या दुसऱ्या तिमाहीची वैशिष्ट्ये
जागतिक विस्तारकंपनीने नेपाळमधील महाबीर ऑटोमोबाइल्स या सर्वात जुन्या आणि आघाडीच्या वाहन वितरकांपैकी एका कंपनीशी करार केला आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये कंपनीने आपले कामकाज सुरू केले.
जातिक संशोधन आणि विकास केंद्रकंपनीने सिंगापूर येथे आपले पहिले जागतिक आर अँड डी केंद्र सुरू केले आहे. कंपनीद्वारे आपल्या संपूर्ण मालकीची उपकंपनी वॉर्डविझार्ड ग्लोबल पीटीई लि. अंतर्गत सिंगापूरमध्ये  केंद्र आणि जागतिक विक्री कार्यालयाचीही स्थापना करणार आहे. इलेक्ट्रिक वाहनांना मिळत असलेली वाढती मागणी आणि अधिक चांगल्या सुरक्षिततेसह उत्पादने विकसित करण्याची गरज लक्षात घेत कंपनीने हा निर्णय घेतला आहे.
आर्थिक भागिदारीवॉर्डविझार्ड आणि मंगलम इंडस्ट्रीयल फायनान्स लि., आरबीआय नोंदणीकृत एनबीएफसीने भागिदारी केली असून त्याद्वारे खरेदीदारांना सहजपणे ईव्ही खरेदी करता यावी यासाठी वित्तपुरवठा केला जाणार आहे. या कराराअंतर्गत मंगलमद्वारे वॉर्डविझार्डच्या कमी व उच्च दाबाच्या इलेक्ट्रिक दुचाकी खरेदी करण्यासाठी वाहन कर्ज दिले जाईल.   
विपणनवॉर्डविझार्डने #BharatkaJoy हे नवे ब्रँड कॅम्पेन सुरू केले असून त्याला ‘साथ चले’ या गीताची जोड देण्यात आली आहे. वेगवेगळ्या परदेशातील लाखो भारतीयांच्या भावना सादर करणारे हे कॅम्पेन वेगवेगळ्या टप्प्यांत विभागण्यात आले असून जॉय ऑफ गिव्हिंग, जॉय ऑफ केयरिंग, जॉय ऑफ सेलिब्रेशन अशा मानवी भावनांवर लक्ष केंद्रित करणारे आहे. 
ईव्ही इंडिया २०२२जॉय ई बाइक ही ईव्ही इंडिया २०२२ ची टायटल स्पॉन्सर असून कंपनीने ग्रेटर नॉयडा येथील इंडिया एक्स्पोमध्ये झालेल्या ईव्ही इंडिया २०२२ त आपल्या इलेक्ट्रिक दुचाकींची संपूर्ण श्रेणी सादर केली होती. 

वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लिमिटेडविषयी

वॉर्डविझार्ड इनोव्हेशन्स अँड मोबिलिटी लि. ही इलेक्ट्रिक दुचाकी (ईव्ही) क्षेत्रातील आघाडीची वाहन उत्पादक कंपनी असून ती जॉय ई- बाइक्स ब्रँडच्या दुचाकींचे उत्पादन करते. बीएसईवर इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षेत्रातील पहिली नोंदणीकृत कंपनी या नात्याने कंपनीने भारतीय ईव्ही क्षेत्राच्या संभाव्य विकासावर लक्ष केंद्रित केले आहे. आपल्या सकारात्मक बदल घडवून आणण्याच्या तत्वाशी सुसंगत राहात सध्याच्या वाहतूक व्यवस्थेला हरित पर्याय देण्यावर कंपनीचा भर आहे. जॉय ई- बाइक्सच्या माध्यमातून कंपनी नेहमीच्या इंधनांवर चालणाऱ्या बाइक्सना पर्याय उपलब्ध करून देत आहे. कंपनी देशभरातील २५ प्रमुख शहरांत कार्यरत असून ही संख्या आणखी वाढवण्याची योजना आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्रात लहान मुले ,मुली अन जमिनीही पळविणाऱ्या टोळ्या -देवेन्द्रजी तुम्ही करत काय आहात ?

पुणे-महाराष्ट्रात लहान मुले ,मुली अन जमिनीही पळविणाऱ्या टोळ्या प्रचंड...

11 सरकारी रुग्णालयातून ‘बोगस’ औषधींचे वितरण:मंत्र्यांची कबुली

नागपूर:राज्यातील सरकारी आरोग्य संस्थांमध्ये बोगस औषधांचा पुरवठा आणि वापर...

पुतिन यांनी पाकच्या PM ना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले

मॉस्को :पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ शुक्रवारी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर...