पुणे,दि.23-
क्रांती प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ ओमकारेश्वर मंदिराच्या प्रांगणात गुरूवारी पार पडला. या सोहळ्यात 25 स्पर्धक सजावटकारांना बक्षिसे देण्यात आली.ही स्पर्धा ऑनलाइन स्वरुपात व्हिडिओ आणि फोटो या माध्यमातून घेण्यात स्पर्धेत शहरी व ग्रामीण भागातील एक हजार स्पर्धक सहभागी झाले होते. पहिल्या पाच स्पर्धकांना माइक्रोवेव, इलेक्ट्रिक कैटल, मिक्सर आणि वेक्युम क्लिनर अशी गृहउपयोगी बक्षिसे देण्यात आली. पारितोषिक वितरण समारंभास खासदार गिरिश बापट, शिल्पकार विवेक खटावकर, सुरेश राऊत, गौरव बापट, पुणे शहर भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष राघवेद्र मानकर , कसबा पेठ विधानसभा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अमित कंक, पुणे मनपा स्विकृत नगरसेवक राजू परदेशी व क्रांति प्रतिष्ठानच्या प्रमुख स्वरदा बापट उपस्थित होते. प्रास्ताविक स्वरदा बापट यानी केले व पुणे खासदार गिरिश बापट आणि विवेक खटावकर यानी मनोगत व्यक्त करताना स्पर्धकाचे कौतुक करुन अभिनंदन केले. स्पर्धेचे परिक्षण अश्विनी पांडे, वैशाली नाईक यांनी केले. सूत्रसंचालन जतिन पांडे यानी केले. गौरव बापट यानी आभार मानले.
क्रांती प्रतिष्ठानतर्फे सजावटकारांचा गौरव
Date:

