‘शो मस्ट गो ऑन’ – राकेश बापट
चित्रिकरणादरम्यान अमुक नायकाला झाली जखम… अशा बातम्या आपण अनेक वेळा ऐकतो. स्टट तसेच फाईट सिक्वेन्सचे सीन करताना नायकांना अशा प्रकारच्या किरकोळ जखमा होतच असतात. हिंदीत हे नित्याचे झाले असले तरी मराठी चित्रपटाच्या शुटीगदरम्यान अशा इंसीडट्स क्वचितच घडल्या असतील. अशीच एक घटना ‘वृंदावन’ या मराठी चित्रपटाच्या शुटींगदरम्यान घडली. या सिनेमाचा नायक राकेश बापटला अॅक्शन सिक्वेन्स करत असताना पायाला गंभीर दुखापत झाली होती. मात्र, कामामध्ये व्यस्त असलेल्या राकेशला ते कळले देखील नव्हते. तब्बल ४० मिनिटाच्या या फाईट सीननंतर राकेशला आपल्या पायाला झालेल्या या दुखापतीची जाणीव झाली. एका सीन दरम्यान काँक्रीटच्या भिंतीपलीकडे जंप मारत असताना राकेशचा अपघात झाला होता. या अपघातात राकेशच्या पायाचे बोन फ्रॅक्चर झाल्याची शंका युनिटला आल्यामुळे सिनेमाचे चित्रिकरण तिथेच थांबवत राकेशला तात्काळ दवाखान्यात हलविण्यात आले होते. अचानक घडलेल्या या घटनेमुळे पनवेल येथील महागड्या अशा आयुष रिसोर्टमध्ये झालेल्या या सिनेमाचे चित्रीकरण पुढे लांबवण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला, मात्र इतर कलाकारांच्या तारखा तसेच चित्रीकरणाचे शेड्युलिंग लक्षात घेता राकेशनेच ”शो मस्ट गो ऑन’ करत ठराविक वेळेमध्ये चित्रीकरण पूर्ण केलं. सुदैवाने राकेशला झालेली दुखापत अधिक खोलवर नसल्याकारणामुळे डॉक्टरां नीदेखील राकेशला काम सुरु ठेवण्यास काही हरकत नसल्याचे सांगितले.
राकेशसोबतच पूजा सावंत तसचं वैदेही परसूरामी ही मुख्य भूमिकेत असणार आहेत. तसेच अशोक सराफ, महेश मांजरेकर, मोहन जोशी, शरद पोंक्षे, उदय टिकेकर, भारत गणेशपुरे या दिग्गज अभिनेत्यांची फौजदेखील या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. टी एल व्ही प्रसाद या सुप्रसिद्ध दक्षिणात्य दिग्दर्शकाने या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून राजप्रेमी, संदीप शर्मा, सुनील खांद्पूर या तिघांनी मिळून ‘रिअलस्टिक फिल्म कंपनी’च्या बॅनरखाली या सिनेमाची निर्मिती केली तर अमित कारखानीस आणि अनघा कारखानीस हे सहनिर्माते आहेत.जीसिम्सचे कार्तिक निशानदार आणि अर्जुन बर्हान हे सिनेमाचे प्रमोटर्स आहेत. येत्या ८ एप्रिलला ‘वृंदावन’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे