औद्योगिक आस्थापनामध्ये मतदार जागृती मंचाची स्थापना करण्यात यावी-मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे

Date:

पुणे : औद्योगिक क्षेत्र व इतर आस्थापनामधील  कामगारांमध्ये मतदारांची पध्दतशीर शिक्षण व सहभाग (स्वीप) हा कार्यक्रम राबविण्यासाठी मतदार जागृती मंचची स्थापना करण्यात यावी, अशी माहिती प्रधान सचिव तथा मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली.

 जिल्हाधिकारी कार्यालयात औद्योगिक आस्थापनामध्ये मतदार जागृती मंचची स्थापना व स्वीप कार्यक्रमाची आढावा बैठक घेण्यात आली त्यावेळी श्री. देशपांडे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड,  उपसचिव तथा सहमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी, स्वीपचे राज्य सल्लागार दिलीप शिंदे, सहसंचालक उद्योगचे सदाशिव सुरवसे, महाव्यवस्थापक डिआयसी पी. डी. रेंदाळकर, अपर कामगार आयुक्त शैलेंद्र पोळ, उपजिल्हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, जिल्हयातील निवडणूक उपविभागीय अधिकारी उपस्थित होते.

यावेळी श्री. देशपांडे म्हणाले, शहरी व औद्योगिक क्षेत्रात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी मतदारांची नोंदणी वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी मतदार जागृती मंचाची स्थापना करण्यात येऊन त्याव्दारे संघटीत व असंघटीत कामगारांची मतदार नोंदणी होणे आवश्यक आहे. या मंचामार्फत जास्तीत जास्त औद्योगिक आस्थापनावरील कामगारांची मतदार नोंदणी करण्यात येऊन निवडणूक प्रक्रिया विषयी जागृती निर्माण करण्यात यावी. यासाठी स्वयंसेवी संस्था व कामगार संघटना यांचा सहभाग घेण्यात यावा.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, पुणे जिल्हा हा औद्योगिकदृष्टया प्रगत जिल्हा आहे. खाजगी उद्योगधंदे मोठया प्रमाणात  आहेत. या उद्योग क्षेत्रातील कामगारांमध्ये स्वीपचा कार्यक्रम प्रामुख्याने राबविण्यात येत आहे. यापुढेही जिल्हयात सर्व औद्योगिक आस्थापनामध्ये प्रशासन, कामगार संघटना व स्वयंसेवी संस्था यांच्यामार्फत स्वीप कार्यक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

बोपोडीत ३०० खाटांचे शासकीय रुग्णालय व्हावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे यांची मागणी

'ससून' ची विश्वासार्हता जपणे गरजेचे -पश्चिम महाराष्ट्रातील अनेक रुग्णांची...

रेशन माफियांवर कडक कारवाई करूनशासनाने जरब बसवावी-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : गरीब, सामान्य नागरीकांसाठी असलेले रेशन वरील धान्य...

पुण्यातील रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरसाठी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावे-आमदार सिद्धार्थ शिरोळे

पुणे : रेल्वे प्रवाशांच्या सोयीकरिता पुणे-मुंबई, पुणे-बेंगळुरू, पुणे-हैदराबाद या...

तर तेव्हा फडणवीस जनसंघी अनुयायांसह ‘मुग गिळुन’ गप्प का होते..?

मुंबई -दि २६ फेब्रू २०२६-काँग्रेस काळात मोगलांचा इतिहास १७...