– वारीमध्ये सहभागी होण्याचे सलग पाचवे वर्ष
– वारक-यांना मिळणार मोफत कॉलिंग सुविधा, मोबाइल फोन चार्ज करण्यासाठी सुविधा,
रिचार्ज व्हाउचर्स आणि एम-पेसा ही पैसे हस्तांतरण सेवा
– गेल्या चार वर्षांत लाखो वारक-यांनी घेतला मोफत कॉलिंग सुविधेचा लाभ
पुणे – भारतातील आघाडीची दूरसंचार सेवा पुरवठादार कंपनी व्होडाफोन इंडियाने आज आषाढातील एक प्रथा बनलेल्या आपल्या अनोख्या उपक्रमाची घोषणा केली. यंदा या उपक्रमांतर्गत दोन व्होडाफोन मोबाइल बस लाखो वारक-यांसोबत पंढरपूरच्या वारीत सहभागी होतील. गेल्या चार वर्षांप्रमाणेच यंदाही या बस वारक-यांबरोबर पुणे ते पंढरपूर प्रवास करतील. श्री संत ज्ञानेश्वर महाराज आणि श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गांवर प्रत्येकी एक बस असेल.
वारक-यांना त्यांच्या संपूर्ण प्रवासात आपल्या प्रियजनांशी संपर्कात राहता यावे, या उद्देशाने व्होडाफोन मोबाइल बसमध्ये मोफत फोन करण्याची आणि मोबाइल फोन चार्ज करण्याची सुविधा, तसेच रिचार्ज व्हाउचर आणि एम-पेसा ही पैसे हस्तांतरण सेवा उपलब्ध असेल. वारक-यांना पंढरपूरच्या वाटेवर पालख्यांच्या प्रत्येक थांब्याच्या ठिकाणी या सुविधांचा लाभ घेता येईल. वारक-यांच्या सोयीसाठी प्रत्येक बसमध्ये आठ फोन आणि शंभरहून अधिक चार्जिंग पॉइंट्स आहेत. गेल्या चार वर्षांत व्होडाफोन मोबाइल बस उपक्रमांतर्गत लाखो वारक-यांना व्होडाफोन मोबाइल बसमद्वारे सहकार्य करण्यात आले आहे.
श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या विश्वस्तांच्या हस्ते व्होडाफोन मोबाइल बस उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. व्होडाफोन इंडियाच्या महाराष्ट्र आणि गोवा परिमंडळाचे व्यवसाय प्रमुख आशिष चंद्रा हे या वेळी उपस्थित होते.
या उपक्रमाबाबत आशिष चंद्रा म्हणाले, ‘पंढरपूरच्या वारीमध्ये सलग पाचव्या वर्षी सहभागी होताना व्होडाफोनला अतिशय आनंद होत आहे. ही वारी महाराष्ट्रातील काना-कोपऱ्यातून लाखो भाविकांना एकत्र आणणारी एक अनोखी यात्रा आहे. वारीच्या या ४५० किमी च्या प्रवासात हे भाविक पायी चालत सहभागी होतात.”
“व्होडाफोन मोबाइल बस उपक्रमाच्या निमित्ताने पंढरपूरच्या या वारीत सहभागी होण्यास व्होडाफोनला अतिशय आनंद होतो आहे. या बसमधील सुविधांमुळे वारकरी आपल्या प्रियजनांच्या कायम संपर्कात राहू शकतील. वारीच्या एकूण २१ दिवसांच्या या प्रवासात वारक-यांना व्होडाफोनच्या विनाअडथळा आणि विश्वासार्ह संपर्क जाळ्यामुळे आपल्या प्रियजनांच्या कायम संपर्कात राहणे सहज शक्य असल्याने निश्चिंतता लाभेल आणि वारक-यांचा आध्यात्मिक आनंद आणखी समृद्ध करण्याचा आमचा हा प्रयत्न यापुढेही सुरू राहील.”