इंटेक्स 2जी फीचर फोनवर व्होडाफोनचे 100 रुपयांपर्यंतचे रिचार्ज करा आणि मिळवा 50 रुपयांचा अतिरिक्त टॉकटाइम, 18 महिन्यांसाठी करा 900 रुपयांपर्यंतची बचत
– इंटेक्सतर्फे 2जी हँडसेट्सवर 180 दिवसांची खास रिप्लेसमेंट वॉरंटी योजना
मुंबई – भारतातील आघाडीची दूरसंचार पुरवठादार कंपनी व्होडाफोन इंडियाने सणासुदीच्या हंगामात ग्राहकांना आकर्षक योजना पुरविण्याची खासियत कायम ठेवत भारतातील आघाडीची मोबाइल हँडसेट कंपनी इंटेक्स टेक्नॉलॉजीजशी भागीदारी जाहीर केली आहे. या भागीदारीमुळे इंटेक्सच्या 2जी फीचर फोनवर 100 रुपयांपर्यंतचे रिचार्ज केल्यास 50 टक्के कॅशबॅक मिळणार आहे.
इंटेक्सचा 2जी हँडसेट वापरणा-या व्होडाफोन ग्राहकांना 100 रुपयांपर्यंतच्या प्रत्येक व्हॉइस प्लॅन रिचार्जसाठी 50 रुपयांचा अतिरिक्त टॉकटाइम किंवा 50 टक्के कॅशबॅक मिळेल. यामुळे 18 महिन्यांच्या कालावधीत 900 रुपयांपर्यंत बचत करणे शक्य होणार आहे. ग्राहकांना या कॅशबॅकचा वापर व्हॉइस कॉल्स, एसएमएस आणि मूल्यवर्धित सेवांचा आनंद घेण्यासाठी करता येईल. ही कॅशबॅक योजना 31 ऑक्टोबरपर्यंत असून, इंटेक्सच्या नुकत्याच सुरू झालेल्या ‘नवरत्न’ मालिकेतील फोन्ससह आधीच्या आणि आगामी 2जी फीचर फोन मॉडेल्ससाठी ती लागू असेल.
व्होडाफोन इंडियाच्या ग्राहक व्यवसाय विभागाचे सहयोगी संचालक अवनीश खोसला म्हणाले, ‘सध्या सणासुदीचा काळ असून, तो अधिक आनंदी व्हावा, यासाठी व्होडाफोन आकर्षक अशा कॅशबॅक योजना सादर करत आहे. व्होडाफोन आणि इंटेक्सच्या भागीदारीमुळे आमच्या ग्राहकांना आपल्या प्रियजनांशी दीर्घ संवाद साधण्याचे एक निमित्त मिळणार आहे. फीचर फोन वापरणा-या आमच्या ग्राहकांसाठी कॅशबॅक ही आणखी एक मूल्यवर्धित सेवा असून, याद्वारे ते आपल्या या नव्या उपकरणाचा पुरेपूर वापर करू शकतील.’
इंटेक्स टेक्नॉलॉजीजच्या संचालक आणि व्यवसाय प्रमुख निधी मार्कंडेय म्हणाल्या, ‘व्हॉइस योजनांसाठी आम्ही व्होडाफोनबरोबर केलेल्या भागीदारीमुळे फीचर फोन वापरणा-या ग्राहकांना सध्याच्या सणासुदीच्या काळात आपले कुटुंबीय आणि स्नेह्यांबरोबर अधिक व्हॉइस कॉल्स करणे शक्य होणार आहे. व्होडाफोनचे भारतभरातील नेटवर्क आणि इंटेक्सचे वितरण जाळे याचा ग्राहकांना फायदा होईल. भारतात अजूनही मोठ्या प्रमाणावर फीचर फोन
वापरले जातात. स्मार्ट फोनच्या लाटेत या ग्राहकांच्या गरजा भागवणेही आवश्यक असल्याने आम्ही सर्व प्रकारच्या इंटेक्स फीचर फोनसाठी खास रिप्लेसमेंट वॉरंटी योजनाही आणली आहे.’
याशिवाय इंटेक्सद्वारे सर्व 2जी फीचर फोन्ससाठी खास 180 दिवसांची रिप्लेसमेंट वॉरंटी सेवा पुरवली जात आहे. ही योजना मोबाइल फोन आल्याची तारीख कोणतीही असली, तरी लागू असेल. मात्र, तो मोबाइल फोन 1 सप्टेंबर 2017 पासून एक्टिव्हेट झालेला असला पाहिजे.