पुणे,: ‘महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पुणे शहर अध्यक्ष विठ्ठल शेषराव जाधव यांचे आज शनिवार (दि.२८) रोजी सायंकाळी दुखःद निधन झाले. त्यांच्या पश्चात त्यांच्या आई वडिलांसह, पत्नी आणि एक मुलगा आहे.
विठ्ठल जाधव यांची प्रकृती काही दिवसांपासून चिंताजनक होती. त्यामुळे त्यांना उपचारासाठी भारती विद्यापीठ रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले.उद्या रविवार (दि.२९) रोजी सकाळी विठ्ठल जाधव यांच्या मूळ गावी गेवराई (बीड) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. आमदार भीमराव तापकीर,माजी महापौर दत्ता धनकवडे , तसेच विशाल तांबे, वसंत मोरे,अॅड.संभाजी थोरवे अॅड. दिलीप जगताप ,सागर भागवत, सुनील खेडेकर,किरण परदेशी ,वर्षा तापकीर, अनिल बटाने ,उदय जगताप ,अप्पा परांडे ,गणेश भिंताडे,सचिन दोडके ,अनिल भोसले,पत्रकार संजीव शाळगावकर ,शरद लोणकर, शकीला शेख,सचिन कोळी,सोमनाथ गरजे,अनिल मोरे ,सागर बोधगिरे,संतोष सागवेकर,महेंद्र संचेती,जगदीश कुंभार,दीपक आवळे ,बाजीराव गायकवाड,उर्मिला हिरवे,तसेच अभिनेता सुरेश विश्वकर्मा , योगेश सुपेकर, सचिन गवळी आदी मान्यवरांनी भारती हॉस्पिटलमध्ये त्यांचे अंत्यदर्शन घेतले आणि यावेळी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजलीअर्पण केली