मध्य रेल्वे पुणे विभागच्या रनिंग रूम आणि क्रू लॉबीवर माहितीपट

Date:

माहितीपट देणार रनिंग रूम आणि क्रू लॉबीविषयी विविध माहिती
पुणे :
‘ई एन फिल्म्स’च्या वतीने सुरक्षित रेल्वे प्रवास या दृष्टीकोनातून महत्वाची असलेली रनिंग रूम आणि क्रू लॉबी यावर लक्षकेंद्रित करणाऱ्या जनहितार्थ माहितीपटाची निर्मिती केली आहे. 5 मिनिटांच्या या माहितीपटात मध्य रेल्वे पुणे विभागातील रनिंग रूम्समध्ये देण्यात आलेल्या सुविधांची माहिती देण्यात आली आहे. यामध्ये लोको पायलटच्या सुरक्षित ट्रेन ऑपरेशनचे महत्त्व तसेच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी रेल्वेने घेतलेली काळजी या विषयाची उत्तम सांगड घातली आहे, अशी माहिती विभागीय सूत्रांनी दिली.
यूट्यूबच्या माध्यमातून हा माहितीपट उपलबद्ध झाला आहे.
विभागातील लोको पायलट्सची महत्त्वाची कामे या माहितीपटाच्या माध्यमातून ठळकपणे समोर आली आहे. सर्व विभागीय कामकाज आणि नियोजनात सेफ ट्रैन ऑपरेशन व पैसेंजर सेफ्टी यावर लक्ष केंद्रित केले जात आहे. विशेषत: लोको ऑपरेशनमध्ये याचा थेट रेल्वे धावण्याशी संबंध आहे. सुरक्षित रेल्वे ऑपरेशन करून प्रवाशांची सुरक्षितता रेल्वेसाठी किती महत्त्वाची आहे यावर प्रकाश टाकणे हा या माहितीपट बनवण्यामागील प्रमुख उद्देश होता. त्याकरिता ‘ई एन फिल्म्स’ ने पुणे विभागातील रेल्वेचे रनिंग रूम आणि क्रू लॉबी यांच्या कार्यावर आधारित हा माहितीपट तयार केला.
पुणे विभागीय क्रू बुकिंग लॉबीमध्ये लोको पायलट आपली पुढील ड्युटी सुरु करण्याआधी स्वाक्षरी करतो तेंव्हा सुरक्षित प्रक्रियेचे कसे पालन केले जाते तसेच रनिंग रूममध्ये असलेल्या विविध सुविधांविषयी माहिती या माहितीपटात आहे.
हा माहितीपट ‘ई एन फिल्मस’ चे नेव्हिल भास्करन यांनी लिहिला आणि दिग्दर्शित केला आहे.
मध्य रेल्वे पुणे विभागने रेल्वेगाड्यांच्या सुरक्षित वाहतुकीवर भर दिला आहे. रेल्वेतील प्रवासी त्यांच्या इच्छुक स्थळी सुरक्षितपणे पोहोचविणे ही रेल्वेची जबाबदारी आहे. याकरिता गाड्या वेळेवर आणि सुरक्षितपणे धावतील यासाठी लोको ऑपरेशन विभाग आणि इंजिन चालक वर्ग यांना काही कर्तव्ये पार पाडावी लागतात. रेल्वेच्या लोकोमोटिव्ह ऑपरेशन विभागाकडून इंजिनचालक ची बदलणारी ड्युटी यावर नियंत्रण असते. या सर्व सुरक्षितेत जेथे लोको पायलट दोन गाड्यांच्या वेळेमध्ये विश्रांती घेतात अशी रनिंग रूम आणि जेथून लोको पायलट आपल्या पुढील गाडीच्या प्रवासासाठी सही करून निघतो ती क्रू बुकिंग लॉबी सुरक्षित ठेवण्याचे काम कसे होते याचा आढावा या माहितीपटातून मिळते.
या माहितीपटातून विभागीय रेल्वे प्रबंधक श्रीमती रेणु शर्मा या पुणे विभागाच्या सुरक्षित परिचालनबद्दलच्या उद्देश्यला प्राधान्य देताना दिसतात. त्या पुढे म्हणतात पुणे विभाग पैसेंजर सुरक्षेबद्दल व त्याच्याशी संबंधित परिचालांच्या सर्व कार्यावर खास प्राधान्य देते. सर्व रेल्वे पॅसेंजर ने सुरक्षित आपल्या नियोजित स्थळी आनंदाने पोहचावे हीच पुणे रेल्वे विभागची इच्छा आहे.
जोएल मॅकेन्झी DME (operation), लोको आपरेशन पुणे विभागाचे प्रमुख आहेत. हा विभाग ‘लोको मूव्हमेंट आणि ट्रेन क्रू ऑपरेशन या कामाशी संबंधित आहे. जोएल यांच्या नवीन कल्पना आणि उत्कृष्ट व्यवस्थापन यामध्ये सुरक्षित लोको ओप्रेशनवर भर देण्यात आला आहे. विभागातील सर्व लोको पायलट, लोको इंस्पेक्टर, इत्यादी आपल्या सहकाऱ्यांसमवेत सुरक्षित लोको ऑपरेशन देण्यासाठी परिश्रम घेत आहे. पुणे रेल्वे दररोज १५० ते २०० गाड्यांमधून लाखो प्रवाशांची ने- आण करीत असते. म्हणूनच सार्वजनिक दृष्टिकोनातून रनिंग रूम्स आणि क्रू लॉबी वरील हा माहितीपट उपयुक्त ठरणार आहे.
ही सर्व माहिती ई एन फिल्म्स, विश्वसनीय विभागीय व रेल प्रवासी सूत्रांद्वारे दिली गेली आहे.
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

झोपडीपट्टीचा विकास हाच खरा आमचा संकल्प — आमदार सुनील कांबळे

— लोहियानगर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे आमदार सुनील कांबळे व...

मिर्चीच्या ‘वेस्ट-हर्ता’ उपक्रमाची आशिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद,पुण्यात भव्य गौरव सोहळा संपन्न

पुणे —सामाजिक स्वच्छतेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलणाऱ्या रेडिओ मिर्चीच्या...