
The DG, NCC, Lt. Gen. B.S. Sahrawat is also seen.

The Union Minister for Defence, Smt. Nirmala Sitharaman, the Minister of State for Defence, Dr. Subhash Ramrao Bhamre the three Service Chiefs: Air Chief Marshal B.S. Dhanoa, General Bipin Rawat & Admiral Sunil Lanba and the DG, NCC, Lt. Gen. B.S. Sahrawat are also seen.
नवीदिल्ली-प्रजासत्ताक दिनाच्या संचलनाच्या निमित्ताने पंतप्रधान रॅली मध्ये पुण्याच्या सर्वेश सुभाष नावंदे यास भारतातून एअर फोर्स विंग मध्ये बेस्ट कॅडेट सुवर्ण पदक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमास भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी संरक्षण मंत्री निर्मला सीतारमन,संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे ,सेनादलाचे तिन्ही प्रमुख जनरल बिपीन रावत, ऍडमिरल सुनील लांभा, चिफ मार्शल बिरेंद्र सिंग धनोआ आदी उपस्थित होते. पंतप्रधान आपल्या भाषणात बोलले कि विविधतेत एकता तसेच एकमेकांपासून शिकण्यासारखे बरेच काही आहे. आपल्या आजूबाजूतील बदल भारतातील तरुण देशामध्ये परिवर्तन घडवून आणू शकतात
व तसेच पंतप्रधानांनी सशस्त्र दलांवर आपल्या राष्ट्राला अतिशय गर्व आहे, असे सांगितले.
आपण देशाचे सेवारत असलेल्या शूर व्यक्तींबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दरवर्षी 28 जानेवारी रोजी प्रधानमंत्री रॅली करिअप्पा परेड ग्राऊंड दिल्ली छावणी मध्ये होत असते. यावर्षी च्या 2018 च्या प्रधानमंत्री रॅली मध्ये एन.सि. सि. च्या माध्यमातून पुण्याच्या सर्वेश सुभाष नावंदे यास भारतातून एअर फोर्स विंग मध्ये बेस्ट कॅडेट सुवर्ण पदक मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.
सर्वेश बद्दल आपण माहिती जाणून घेऊया. सर्वेश चे वय १९ वर्ष असून तो मॉडर्न कॉलेज पुणे येथे बी.एस.सी द्वितीय वर्षाचे शिक्षण घेत आहे. प्रजासत्ताक दिन 2018 च्या रॅली मध्ये सहभागी होण्यासाठी सर्वेश ने R.D. कॅम्प मध्ये आपला सहभाग नोंदविला. नोव्हेंबर 2017 मध्ये पुणे विभागातून सर्वेश ची निवड पुढील कॅम्प साठी औरंगाबाद येथे झाली. अविरत मेहनत घेऊन विशेष नैपुण्य दाखवल्या मुळे सर्वेश प्रधानमंत्री रॅली मध्ये सहभागास पात्र ठरला. महाराष्ट्रातुन 112 कॅडेट यामध्ये सहभागी झाले होते. सर्वप्रथम महाराष्ट्रा मधून सर्वेश ची बेस्ट कॅडेट म्हणून निवड झाली.तदनंतर संपूर्ण भारतातुन दिल्ली मध्ये 17 डिरेक्टरेट चे 2500 पेक्षा जास्त कॅडेट्स यामध्ये सहभागी झाले होते. या सर्वांन सोबत सर्वेश ची स्पर्धा होती.यामध्ये लेखी परिक्षा, शारीरिक चाचणी, मुलाखत या सर्वांना मध्ये सर्वेश ने एअर फोर्स विंग मध्ये प्रथम येणाचा बहुमान प्राप्त केला. संपूर्ण भारतातुन एअर फोर्स विंग मध्ये बेस्ट कॅडेट सुवर्ण पदक प्राप्त झाले.