पुणे- मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्था गेली अनेक वर्ष मानवी हक्क कायद्याची जनजागृती करीत असुन संस्थेच्या माध्यमातून अन्याय , अत्याचारीत पिडीतांना मोफत विधीतज्ञामार्फत कायदेशीर सल्ला व मार्गदर्शन करण्याबरोबरच त्यांच्या संविधाननीक मुलभूत हक्का विषयी जागृतीचे कार्य करीत आहेत. या संस्थेच्या कायदेशीर सल्लागार समितीच्या महाराष्ट्र अध्यक्षपदी सचिन झालटे (पाटील)B.sc, LLm यांची नियुक्ती करण्यात आली. नियुक्ती पत्र संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर व डॉ.अभिषेक यांच्या हस्ते देण्यात आले.


