· दर्शनी मूल्य १ रुपये असणाऱ्या प्रत्येक समभागासाठी (इक्विटी शेअर)रु.५२२ ते रु.५३१ किंमतपट्टा निश्चित करण्यात आला आहे.
· ही ऑफर बुधवार, १ सप्टेंबर २०२१ पासून शुक्रवार ३ सप्टेंबर २०२१ या कालावधीत सुरु राहणार
· समभाग खरेदीची बोली लावताना किमान २८ समभागांसाठी आणि त्यानंतर २८ च्या पटीत अर्ज करता येणार
· इक्विटी समभागाच्या दर्शनी मूल्याच्या ५२२ पट फ्लोअर प्राईस आणि इक्विटी समभागाच्या दर्शनी मूल्याच्या ५३१ पट कॅप प्राईस
मुंबई, २८ ऑगस्ट २०२१: दक्षिणभारतातील सर्वाधिक मोठ्या समग्र डायग्नॉस्टिक्स (निदान) साखळी असणाऱ्या आणि आर्थिक वर्ष २०२० पर्यंत कृतीशील महसुलानुसार आणि आर्थिक वर्ष २०२०च्या महसुलावरून सर्वाधिक वेगाने वाढणाऱ्या डायग्नॉस्टिक्स साखळी पैकी एक असणाऱ्या (स्त्रोत: क्रिसील अहवाल) विजया डायग्नॉस्टिक्स सेंटर लिमिटेड कंपनीने त्यांची प्राथमिक समभाग विक्री (आयपीओ) १ सप्टेंबर २०२१ पासून खुली होत असल्याचे जाहीर केले आहे.
या योजनेचा प्रत्येक समभागासाठीचा किंमतपट्टा ५२२ रुपये ते ५३१ रुपये इतका निश्चित करण्यात आला आहे. समभाग खरेदीची बोली लावताना किमान २८ समभागांसाठी आणि त्यानंतर २८ च्या पटीत अर्ज करता येणार आहे. ही ऑफर शुक्रवार ३ सप्टेंबर २०२१ रोजी बंद होईल.
या योजनेत ३५,६८८,०६४ पर्यंतचे इक्विटी समभाग विक्रीसाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. यामध्ये ५,०९८,२९६ पर्यंतचे इक्विटी समभाग डॉ. एस. सुरेंद्रनाथ रेड्डी (प्रवर्तक विक्री समभागधारक), २९,४८७,२९० पर्यंतचे इक्विटी समभाग काराकोरम लिमिटेड आणि १,१०२,४७८ इक्विटी समभाग केदार कॅपिटल अल्टरनेटीव्ह इन्व्हेस्टमेंट फंड यांचे आहेत. केदार कॅपिटल एआयएफ १ (केदार कॅपिटल अल्टरनेटीव्ह इन्व्हेस्टमेंट फंड सोबत काराकोरम लिमिटेड- केदार कॅपिटल एआयएफ १ म्हणजेच ‘गुंतवणूकदार विक्री समभागधारक’.)
सिक्युरिटीज अंड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया – सेबी (इश्यू ऑफ कॅपिटल अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) २०१८च्या सुधारित (“SEBI ICDR Regulations”) नियम 31 सोबत सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्ट (रेग्युलेशन) रुल्स १९५७च्या १९(२)(ब) सुधारित नियमावलीनुसार (“SCRR”) ही ऑफर खुली करण्यात आली आहे. सेबी आयसीडीआर नियामकांच्या ६(१) निर्देशांनुसार ही ऑफर बुक बिल्डींग प्रक्रीयेद्वारे जाहीर करण्यात आली असून त्याअंतर्गत प्रमाणित तत्त्वावर पात्र संस्थात्मक खरेदीदारांना (“QIBs”) वाटपासाठी ५० टक्क्यांपेक्षा जास्त नसलेले समभाग उपलब्ध होतील विक्रेता समभागधारकांशी आणि व्यवस्थापकांशी सल्लामसलत करून सेबी कंपनी आयसीडीआर नियामकांच्या निर्देशांनुसार पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या हिश्शातील ६० टक्क्यांपर्यंत समभाग प्रमाणित तत्वावर प्रमुख गुंतवणूकदारांना (Anchor Investors) वाटपासाठी उपलब्ध करू देईल. त्यापैकी एक तृतीयांश समभाग स्थानिक म्युचुअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध करून दिले जाणार आहेत. स्थानिक म्युचुअल फंडांकडून प्रमुख गुंतवणूकदारांसाठी राखीव करण्यात आलेल्या वाटप किंमतीइतक्या किंवा अधिक किंमतीसाठी ऑफर मिळाल्यासच त्यांना हा एक तृतीयांश हिस्सा मिळू शकेल. जर प्राथमिक समभाग विक्रीमध्ये प्रस्तावित पेक्षा कमी समभागांना मागणी आली किंवा प्रमुख गुंतवणूकदारांच्या हिश्शामध्ये वाटप झाले नाही तर असे सर्व शिल्लक समभाग पात्र संस्थात्मक खरेदीदारांच्या (“QIBs”) हिश्शामध्ये वर्ग करण्यात येतील. ऑफर प्राईस इतक्या किंवा त्याहून अधिक किमतीला बोली मिळाल्यास QIB च्या एकूण हिश्शापैकी ५ % फक्त म्युच्युअल फंडांना वाटपासाठी उपलब्ध असतील आणि QIBचा उर्वरित हिस्सा म्युच्युअल फंडांसह अन्य सर्व QIB बोलीधारकांसाठी उपलब्ध करून दिला जाईल. ऑफर प्राईस इतक्या किंवा QIB भागाच्या ५% हून कमी किमतीला बोली मिळाल्यास QIB मध्ये सुयोग्य वाटपासाठी म्युच्युअल फंड भागात वाटणीसाठी उपलब्ध झालेले राहिलेले इक्विटी समभाग उर्वरित QIB भागात वर्ग होतील.
तसेच, सेबी आयसीडीआर निर्देशांनुसार ऑफरच्या १५ टक्क्यांपेक्षा अधिक हिस्सा प्रमाणित तत्वावर बिगर संस्थात्मक गुंतवणूकदारांसाठी आणि योजनेच्या ३५ टक्क्यांपेक्षा अधिक हिस्सा किरकोळ (रिटेल) गुंतवणूकदारांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे. ऑफर किंमतीच्या समकक्ष किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीला मागणी आल्यासच हे हिस्सा वाटप केले जाईल. पुढे जाऊन, योजनेत ऑफर किंमतीच्या समकक्ष किंवा त्यापेक्षा अधिक किंमतीला मागणी आल्यास इक्विटी समभाग पात्र कर्मचाऱ्यांसाठी राखीव आहेत. प्रमुख गुंतवणूकदारांखेरीज (Anchor Investors) रिटेल गुंतवणूकदरांसह सर्व संभाव्य गुंतवणूकदारांनी आपापल्या बँक खात्यांचा तपशील (युपीए आयडीसह) जाहीर करून अर्जाची विहित रक्कम ब्लॉक (“ASBA”) करून ठेवणे बंधनकारक आहे. ज्या अनुसार योजनेत सहभागी करून घेण्यासाठी सर्व बोली रकमा या एससीएसबीतर्फे ब्लॉक करून ठेवण्यात येतील. प्रमुख गुंतवणूकदारांना त्यांच्यासाठीच्या हिश्शात “ASBA” प्रक्रीयेनुसार सहभागी होण्याची परवानगी नाही.
या योजनेची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत: (i)विक्री समभागधारकांच्या ३५,६८८,०६४ पर्यंतच्या इक्विटी समभागांची विक्री योजना (ii) शेअर बाजारावर इक्विटी समभागांची नोंदणी झाल्याचे फायदे मिळविणे.
इक्विटी समभागांची नोंदणी झाल्यामुळे कंपनीची दृश्यात्मकता आणि ब्रँड प्रतिमा वाढेल आणि भागधारकांना लिक्वीडीटी पुरविली जाईल अशी कंपनीची अपेक्षा असून भारतात इक्विटी समभागांकरता बाजारपेठ उपलब्ध होईल.
आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, एडलवाइज फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी लिमिटेड या योजनेसाठी बुक रनिंग लीड व्यवस्थापक म्हणून काम पाहणार आहेत.
रेड हिअरिंग प्रॉस्पेक्टसद्वारा उपलब्ध समभागांची मुंबई शेअर बाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) दोन्ही ठिकाणी नोंदणी करण्यात येणार आहे.