लाॕकडाउन नंतर ……… (लेखिका – विद्या घटवाई)

Date:

सक्तीने घरात राहल्या मुळे सुरुवातीला अमंळ जडच गेले. महत्त्वकांक्षांना फुटलेल्या धुमार्यांना एकदम खीळ बसली..आता सकाळु उठून कोणालाच ,कुठेही जायचे नाही..सगळे निवांत ..सुशेगात….त्यामुळे आधी काही सुधरतच् नव्हते .सगळेच घरात असल्याने वेगवेगळे खाद्यपदार्थ तयार करुणे याकडे आपसूकच् मोर्चा वळवला. पण सगळीच कामे स्वतः करावयाची असल्याने मग शांतपणे कामाचे नियोजन केले. त्यामुळे थोडा थोडा वेळ हाती यायला लागला. तेव्हा टीमवर्कचे महत्व पटले. मग माझे आवडते वाचन सुरु केले. विविध विषयावर वाचत राहिल्याने बाहेरची परिस्थिती कळत होतीच. तो पर्यत मनाला शांती गवसू लागली होती.आतून शांती गवसू लागली तेव्हा कळले घरी बसायला सांगितले म्हणून आपण वैतागलो नव्हतो तरं मनाविरुध्द केवळ दुसर कोणी तरी सांगतयं,म्हणून ही जरा अवघडले होते तरं.. सदैव आपल्याला हवे तेच होत नसते. हे यापूर्वी ही माहित होतेच की.. पण आपण पुन्हा पुन्हा त्याच चुका करत राहतो.
असो सगळ्यांनी बसून मिळून दिवसभराचे नियोजन केले. यात मी “मौना ” ची कल्पना मुलांना भीतभीत सांगितली .जिथे जोरात आरडाओरड अपेक्षित होता तिथे मुलांनी चक्क यला होकार दिला. आणि काही अंशी ती अंमलात आणली. तेव्हा या जगात अशक्य असं काहीच नाही हे पटले. सारखी खा खा व्हायला लागल्यावर आरोग्यमंत्राची आठवण झाली. जरुरी आहे तेव्हाच खाण्यासठी तोंड उघडावे ,हे आठवले. तेव्हा हे सतत भूक लागणे हा मनाचा खोडसाळपणा आहे हे सांगून झाले. थोडक्यातही भागतेच. आणि ही युध्यजन्य परिस्थिती आहे हे स्पष्ट केले.हे काही पटायला तयार नव्हते मुलांना.कारण तशी परिस्थिती त्यांनी काय तुम्ही आम्ही ही अनुभवली नाही. तेव्हा “संयम” नावाचे रामबाण अस्र बाहेर काढले.(रामायणाचा ही असर असेल) मनाचाही व्यायाम असतो हे मुलांना सविस्तर पटवून दिले. मनावर नियंत्रण ही मानवाच्या आयुष्यातील सर्वात मोठी गोष्ट आहे.यावर चर्चा केली. यावर मात्र चर्चेचे वाद म्हणावं इथपर्यंत आलो. पण आजकालच्या मुलांशी संवाद होऊच शकत नाही .या आजकालच्या पालकांच्या मताला मात्र तडा गेला .आणि आतून सुखावले. एकूणात कायं सगळे जण एकत्र बसायलो लागलो.गप्पागोष्टी ते सत्संग हे आजही चालू आहे.आता या वातावरणाला रुळलोयं. आतून उबदार ,सुरक्षित वाटतयं.. बाहेरची रोजच्या रोज येणारी अपडेट्स भीतीदायक आहेत. पण यातून सर्वाथाने तरुन जाण्यासाठी मनाची ताकद वाढवावी लागणार आहे. आणि ती कुटुंबातील सर्वांनी एकत्रित येऊनच वाढणार. कारण आपण वसुधैवं कुटुंब्कम् मानणारे आहोत. तेव्हा परिस्थिती कशीही असो मनुष्य त्यातून मार्ग काढतोच. कारण जगण्याची गरज -सर्व्हाव्हल . रोजच्या धकाधकीतही आपण जगत होतोच की आता भरपूर वेळ हाताशी आहे तरं कलेकलेने/चवीचवीने जगू या..अनेक कोटी योनीतून आपल्याला मनुष्य जन्म मिळतो असे म्हणतात.बुद्धी चे हे वरदान केवळ मानवालाच् मिळाल्याने त्याचा उपयोग त्याने सकारात्मक करावा हेच या विशेष दिवसांचे सांगणे असावे. आज मात्र मनातून दरवर्षी निदान आठ दिवस तरी लाॕकडाऊन असावे असे ठाम वाटते आहे. कारण सुख म्हणजे हेच तरं असते ,ह्याच साठी आपण धकाधकीचा अट्टाहास करतो आणि हो बुध्दीवाद्यांचा हा तरं क्वालीटी टाईम आहे.फक्त याला कोणत्याही जीवघेण्या आजाराची झालर नको.

  • © विद्या घटवाई
SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्यस्तरीय ७ वा जाधवर विज्ञान महोत्सव शनिवारी 

प्राचार्य डॉ. सुधाकरराव जाधवर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय...

निवडणुकीत पैशांच्या गैरवापरावर प्राप्तिकर विभागाची करडी नजर; २४ तास नियंत्रण कक्ष कार्यरत

पुणे : आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रचारात होणाऱ्या...

ग्रंथ दालनातूनच साहित्य संमेलनस्थळी प्रवेश

पुणे : साहित्यिक, सांस्कृतिक विकासासाठी लेखक, प्रकाशक, विक्रेता आणि...

महाराष्ट्रात 600 मेगावॅट सौरऊर्जा प्रकल्पांसाठी विक्रन इंजिनीअरिंगचा ₹2,035 कोटींचा ईपीसी करार

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी उभारण्यात येणारी 600 मेगावॅट एसी सौरऊर्जा...