पुणे-पीएमपीएमएल’च्या संचालक पदावर खासदार संजय काकडे यांचे कट्टर समर्थक म्हणून गणले जाणारे नगरसेवक शंकर पवार यांची निवड करण्यात आली . तर, राष्ट्रवादी, काँगेस, शिवसेना महाविकास आघाडीतर्फे भैय्यासाहेब जाधव यांना उमेदवारी देण्यात आली. यावेळी 80 – 43 असे मतदान झाले. यात 37 मतांनी पवार यांनी जाधव यांचा पराभव केला.या निवडीमुळे पुण्यात काकडे गटाला यापुढे तरी डावलण्याचे राजकारण होवू न देता योग्य पद्धतीने न्याय दिला गेला पाहिजे असे धोरण भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी अंगीकारल्याचे स्पष्ट झाले आहे.गेल्या महापालिका निवडणुकीत आणि अन्य निवडणुकीत काकडे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी दिलेल्या योगदानाची दखल या धोरणा अंतर्गत पक्षाला घ्यावी लागेल असे चत्र निर्माण झाल्यानंतर काकडे यांचे महापालिका वर्तुळातील वर्चस्व आता वाढणार असल्याचे दिसते आहे. या पूर्वी सभागृह नेते पदाचे नाव जाहीर करताना खुद्द खासदार काकडे यांनीच महापालिकेत येवून धीरज घाटे यांचे नाव शहराध्यक्ष यांना समवेत घेवून घोषित केलेहोते .
आज महापालिका सभागृहात नगरसेवक शंकर पवार यांची पीएमपीएमएल संचालक पदी निवड झाल्यानंतर आमदार सिद्धार्थ शिरोळे महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, सभागृह नेते धिरज घाटे, आमदार चेतन तुपे पा. विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, शिवसेना गटनेते पृथ्वीराज सुतार, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, मनसेचे गटनेते वसंत मोरे, यांनी अभिनंदन केले.
शंकर पवार हे राज्यसभेचे खासदार संजय काकडे गटाचे घानिष्ठ आणि निष्ठावंत कार्यकर्ते मानले जातात. विधानसभा निवडणुकीत हडपसर आणि वडगावशेरी मतदारसंघात भाजपचा पराभव झाल्यानंतर पुणे महापालिकेतील पदाधिकारी बदलण्यात आले. सिद्धार्थ शिरोळे आमदार झाल्यानंतर त्यांनी ‘पीएमपीएमएल’च्या संचालक पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या जागेवर काम करण्यासाठी शंकर पवार यांना संधी देण्यात आली. त्यांनतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी पवार यांचे अभिनंदन केले.दरम्यान, ‘पीएमपीएमएल’चे अधिकारी खास सभेला उपस्थित नसल्याने नगरसेविका नंदा लोणकर, योगेश ससाणे यांनी नाराजी व्यक्त केली.