पुणे : झपाटलेला या प्रसिद्ध सिनेमात बाबा चमत्कार ही अजरामर भूमिका साकारून नावारूपास आलेले ज्येष्ठ अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांनी पुण्यात वयाच्या 83 व्या वर्षी गुरुवारी( दि.४) सायंकाळी अखेरचा श्वास घेतला. कडकोळ हे मराठी अभिनेते आणि लेखक आहेत. त्यांनी मराठी चित्रपट, नाटक, तसेच दूरचित्रवाहिनी मालिकांतून अभिनय केला आहे. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून, नातवंडे असा परिवार आहे.

सलाम पुणे’ पुरस्कारानं त्यांना २०११ मध्ये सन्मानित करण्यात आले होते त्यानंतर राज्य शासनाने आणि बालगंधर्व परिवाराने ज्येष्ठ नाटय़-चित्रपट अभिनेते राघवेंद्र कडकोळ यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून त्यांना सन्मानित केले . अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेतर्फे ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले होते.

राघवेंद्र कडकोळ यांनी कृष्णधवल चित्रपटापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. रंगभूमीवर त्यांनी काशीनाथ घाणेकर, शरद तळवळकर यासारख्या दिग्गज कलावंतांसोबत काम केले. कडकोळ यांची ‘झपाटलेला’ या चित्रपटातील ‘बाबा चमत्कार’ ही भूमिका विशेष गाजली. त्यांनी ‘अश्रूंची झाली फुले’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’ यांसारख्या अनेक नाटकांमध्ये चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. त्यांची ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकातील ‘धर्माप्पा’ ही भूमिकाही गाजली. कडकोळ यांनी ‘ब्लॅक अँड व्हाईट’, ‘कुठे शोधू मी तिला’, ‘गौैरी’, ‘सखी’ या मराठी चित्रपटांमध्ये, तर ‘छोडो कल की बाते’ या हिंदी चित्रपटात काम केले आहे. कडकोळ यांनी ‘गोल्ड मेडल’ नावाचे पुस्तकही लिहीले आहे. चित्रपट, नाटक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
महाविद्यालयात शिकत असताना कडकोळ यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे घरातील आर्थिक जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. उदरनिर्वाहासाठी त्यांनी जंगल खात्यात टायपिस्ट म्हणून सरकारी नोकरी मिळवली. सुरुवातीच्या काळात कडकोळ यांनी नोकरी करत असताना त्यांनी रंगभूमीच्या पडद्यामागे कलाकारांना निरोप देणे, चहा देणे, खुर्च्या मांडणे अशी मिळेल ती कामे स्वीकारली. परंतु एक कलाकार म्हणून त्यांनी कधीच कोणासमोर काम मिळवण्याची मागणी केली नाही. “करायला गेलो एक” हे पहिले व्यावसायिक नाटक त्यांनी साकारले. महिन्यातून 20-22 दिवस नाटकांचे दौरे असल्याने नोकरीवर परिणाम होऊ लागला. त्यामुळे हातच्या नोकरीवर त्यांना पाणी सोडावे लागले होते.

राघवेंद्र कडकोळ यांनी ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटापासून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. रंगभूमीवर त्यांनी काशीनाथ घाणेकर, शरद तळवळकर यासारख्या दिग्गज कलावंतांसोबत काम केले. नववीत शिकत असताना असताना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे लिखाण झपाटल्यासारखे वाचले. त्यामुळे सावरकरांच्या विचारांचा प्रभाव त्यांच्या मनावर होऊ लागला. याच दरम्यान त्यांनी आपले शिक्षण सोडून देशसेवा करण्याचा निर्णय घेतला. नौदलात भरती होण्यासाठी परीक्षा पास केल्या. भारतीय आयएनएस विभागात एका टीम सोबत त्यांना पाठवण्यात आले. तेथील समुद्र, बोटी पाहून ते अगदी भारावून गेले. शेवटी आपण जे ठरवले ते प्रत्यक्षात उतरत असल्याचा आनंद त्यांना होत होता. परंतू त्या टीममधून राघवेंद्र यांना बाजूला काढून पुन्हा मेडिकल टेस्ट घेण्यासाठी पाठवण्यात आले. यागोदरच सगळ्या मेडीकल टेस्ट पास करूनच त्यांना तिथे पाठवण्यात आले असताना पुन्हा ही टेस्ट कशासाठी? असा प्रश्न त्यांच्या मनात घोळत बसला. रिपोर्टमध्ये त्यांच्या एका कानात दोष असल्याचे कारण सांगून त्यांना घरी पाठवण्यात आले होते.
घरी परतल्यावर राघवेंद्र यांनी शिक्षणाकडे लक्ष केंद्रित केले. महाविद्यालयात शिकत असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यामुळे घरातील आर्थिक जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. उदरनिर्वाहासाठी त्यांनी जंगल खात्यात टायपिस्ट म्हणून सरकारी नोकरी मिळवली.
नोकरी करत असताना राघवेंद्र यांनी रंगभूमीवर पडद्यामागे कलाकारांना निरोप देणे, चहा देणे, खुर्च्या मांडणे अशी मिळेल ती कामे स्वीकारली. परंतु एक कलाकार म्हणून त्यांनी कधीच कोणासमोर काम मिळवण्याची मागणी केली नाही. “करायला गेलो एक” हे पहिले व्यावसायिक नाटक त्यांनी साकारले. महिन्यातून वीस-बावीस दिवस नाटकांचे दौरे असल्याने नोकरीवर परिणाम होऊ लागला. त्यामुळे त्यांना नोकरीवर पाणी सोडावे लागले होते.
जवळजवळ दोन दशकांपूर्वी रिलीज झालेल्या ‘झपाटलेला’ या सिनेमाचा उल्लेख निघाला की सर्वपथम आठवतो तो तात्या विंचू आणि त्याला ‘ओम फट् स्वाहा’ हा मृत्युंजय मंत्र देणारा बाबा चमत्कार. लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे आणि दिलीप प्रभावळकर यांच्यासह राघवेंद्र कडकोळ यांच्या महत्त्वाच्या भूमिका चित्रपटात होत्या. राघवेंद्र कडकोळ यांनी बाबा चमत्कार ही व्यक्तिरेखा वठवली होती. ‘झपाटलेला’ या चित्रपटाच्या सिक्वेलमध्येही राघवेंद्र झळकले होते. “अश्रूंची झाली फुले” नाटकातील “धर्माप्पा” ही भूमिका राघवेंद्र यांच्याकडे ओघाने आली. एक कानडी व्यक्ती मराठी कसे बोलतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे धर्माप्पा. त्यांच्या या भूमिकेचे विशेष कौतुक देखील झाले. धोंडी, देवदासी, हसुया पण, कायद्याच्या कचाट्यात, रायगडाला जेव्हा जाग येते सारख्या चित्रपट नाटक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली. त्यांच्यातील कलागुणांमुळे बालगंधर्व जीवन पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले. काही वर्षापूर्वी राघवेंद्र कडकोळ यांना अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पुणे शाखेतर्फे ‘नटवर्य केशवराव दाते पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले होते. त्यांनी ‘गोल्ड मेडल’ नावाचे पुस्तक लिहिले आहे.

