पुणे कॅम्प भागातील साचापीर स्ट्रीटवरील श्री वास्तूपूज्य महाराज टेम्पल ट्रस्ट मंदिराचा शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे . त्यानिमित्ताने पुणे कॅम्पमधील कॉन्व्हेट स्ट्रीटवरिल सेंट जॉन शाळेच्या मैदानावर उभारण्यात आलेल्या चंपानगरी हे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत . त्यानिमिताने आचार्य श्रीमद विजय श्रेयांश प्रभू महाराज साहेब आणि नंदिभूषण आदिखाना उपस्थित होते .
सकाळी गुरुमहाराज यांचे प्रवचन झाले . त्यानंतर सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला . सायंकाळी भजन झाले . या कार्यक्रमामध्ये गुजराथी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते . यानिमिताने ११ मे रोजी सकाळी पुणे कॅम्प भागात मिरवणूक ( वरघोडा ) काढण्यात येणार आहे . त्यानंतर महापूजा होणार आहे . यावेळी मंदिरास विद्युत रोषणाईची सजावट करण्यात आली होती .


