पुणे :
नगरसेवक आणि ‘मुक्ताई प्रतिष्ठान’चे राजाभाऊ लायगुडे यांच्या पुढाकाराने धायरीत ‘स्वच्छतेकडून कचरामुक्तीकडे उपक्रम ‘ सुरु करण्यात आला आहे. ललीत राठी ( ‘जनाधार ‘ कचरा निर्मूलन विभाग), विनीत बिहाणी (‘श्री रिसायकलर्स’), राजेश मणेरीकर (जनाधार ई – वेस्ट विभाग’), विलास पोकळे (‘क्लीन गार्बेज मॅनेजमेंट’), ‘वनराई ‘, ‘एन्व्हॉयर्नमेंट क्लब ऑफ इंडिया’ यांचा सहभाग या उपक्रमात आहे.
‘ई वेस्ट’ गोळा करण्याकरिता ‘इको बीन’ या कचरा पेटया नागरिकांच्या प्रबोधनासाठी राजाभाऊ लायगुडे यांच्या धायरीतील जनसंपर्क कार्यालयात ठेवण्यात आल्या आहेत. २o१६ चा कचरा निर्मूलन कायदाही नागरिकांच्या माहितीसाठी या कार्यालयात लावण्यात आला आहे. हा उपक्रम राजाभाऊ लायगुडे यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आला.
कचरा वर्गीकरण, प्रक्रिया विषयक ‘वनराई’, ‘एन्व्हॉयर्नमेंट क्लब ऑफ इंडिया’ या पर्यावरणप्रेमी संस्थांनी तयार केलेली माहिती पत्रके सोसायट्यामध्ये वितरित करण्यात येत आहेत.
‘मुक्ताई प्रतिष्ठान’ आणि स्वयंसेवी संस्थांच्या वतीने या उपक्रमात जास्तीत जास्त सोसायटयांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

