Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

तब्बल दोनशे कामगार महिलांचे लसीकरण पहिल्याच दिवसात..

Date:

पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद,

नगरसेवक महेश वाबळे यांच्या प्रयत्नांना यश

पुणे- नगरसेवक महेश वाबळे यांनी सुरु केलेल्या लसीकरणा च्या नव्या विशेष मोहिमेत पहिल्याच दिवशी 200 कामगार महिलांचे लसीकरण करण्यात आले. भारतीय जनता पक्षाचे पद्मावती, सहकारनगर परिसरातील प्रभाग क्रमांक ३५ चे भाजपा नगरसेवक महेश वाबळे यांच्या वतीने घरेलू कामगार महिलांसह विविध कलाक्षेत्रातील कलाकारांसाठी महापालिकेच्या माध्यमातून लसीकरण मोहीम राबवण्यात येत आहे.

या संदर्भात वाबळे म्हणाले,’घरेलू कामगारांसह परिसरातील विविध कलाक्षेत्रातील कलाकार मिळून सुमारे दोन हजार महिलांना या मोहिमेचा लाभ होईल.नगरसेवक स्तरावर राबविण्यात येणारी ही दक्षिण पुण्यातील सर्वात व्यापक मोहीम आहे. महापालिकेच्या सहकार्याने हे लसीकरण केले जाणार आहे. नगरसेवक महेश वाबळे पुढे म्हणाले, माझ्या प्रभागामधील पद्मावती झोपडपट्टी, शंकर महाराज वसाहत, मोरे वस्ती, अरणेश्वर येथील आण्णा भाऊ साठे वसाहत, अशा वसाहतीं मधील १८ ते ४४ वयोगटातील महिलांना या मोफत लसीकरण मोहिमेचा लाभ होणार आहे. ऑनलाईन ॲपच्या माध्यमातून नोंदणीद्वारे लसीकरण करण्यात या महिलांना अनेक समस्या येत आहेत. त्यापैकी अनेकांकडे पुरेशी माहिती, कागदपत्रे नाहीत. परिणामी, या महिला मोठ्या संख्येने लसीकरणापासून दूर राहिल्या आहेत. आम्ही वेळोवेळी मागणी केल्यानंतर आता अखेर प्रशासनाने कोविन ॲपवर नोंदणी करण्याची सक्ती मागे घेतली आहे. परंतु, तरीही लस केंद्रांवर जाऊ न शकल्याने अनेक महिला लसीकरणापासून वंचित राहण्याचा धोका आहे. म्हणूनच अशा महिलांची केवळ नोंदणी करण्यात मदत करण्याऐवजी संपूर्ण लसीकरण करण्याची जबाबदारीच घेण्याचे मी ठरवले. त्यासाठी आवश्यक त्या प्रशासकीय बाबींची पूर्तता केली असून पहिल्याच दिवशी दोनशे महिलांचे लसीकरण करण्यात यश मिळाले.

लसीकरणाचा दुहेरी फायदा

घरेलू कामगार महिलांचा या लसीकरणामुळे दुहेरी फायदा मिळणार आहे. या परिसरातील मोठ्या सोसायट्या व तेथील कुटुंबीयांच्या सुरक्षेच्या दृष्टीने सुद्धा फायदा होणार आहे. या घरेलू कामगारांपैकी बहुतांश महिला या परिसरातील मोठ्या सोसायट्यांमध्ये घरेलू कामगार म्हणून काम करतात. त्यांचे लसीकरण होऊ शकत नसल्यामुळे संबंधित सोसायट्यांमधील नागरिकांमध्ये काहीशी अस्वस्थता व भीती पसरली होती. तसेच या घरेलू कामगार महिलांना आपल्या रोजगारापासून वंचित राहावे लागण्याची शक्यता निर्माण झाली होती. आता या घरेलू कामगार महिलांचेही आता लसीकरण होणार असल्यामुळे बिनदिक्कतपणे त्या परिसरातील सोसायट्यांमध्ये कामासाठी जाऊ शकतील आणि तेथे राहणाऱ्या नागरिकांना कोणताही धोका उद्भवणार नाही. पर्यायाने कोविड सुरक्षित वातावरण आणि घरेलू कामगार महिलांसाठी रोजगाराची हमी असे दुहेरी फायदे या मोहिमेच्या माध्यमातून साध्य करता येणार आहेत, असा विश्वास नगरसेवक महेश वाबळे यांनी व्यक्त केला.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

सीसीटीव्ही चा पुरावा देत आरोप:भाजपा पदाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार महापालिकेने केल्या मतदार याद्या

पुणे- भाजपा पदाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार महापालिकेने प्रभाग रचना आणो प्रभागांच्या...

पुण्यात शाळकरी मुलीवर अत्याचार, नराधमाला बेड्या

पुणे- विश्रांतवाडी परिसरात अल्पवयीन तरुणीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना...

7 दिवसांत 4500 + विमाने रद्द- प्रवाशांच्या मनस्तापाच्या भरपाईचा हक्क देणारा कायदा देशात आहे का नाही?

मुंबई-देशातील सर्वात मोठी देशांतर्गत विमान कंपनी इंडिगोच्या सोमवारीही 562...

असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले:मोहोळ

पुणे:असंघटित कामगार हक्कांसाठी आयुष्यभर लढणारे नेतृत्व हरपले अशा शब्दांत...