सिरम इन्स्टिट्यूट, बाळासाहेब देवरस पॅालिक्लिनिक, अखिल मंडई मंडळ आणि रमणबाग युवा मंच यांच्या वतीने आयोजन
पुणे : गणेशोत्सव मंडळांनी व ढोल-ताशा पथकांनी संघटन, ऐक्य आणि शिस्त या त्रिसूत्रीच्या आधारे गणपती बाप्पाची सेवा केली पण यावर्षी या त्रिसूत्रीचा उपयोग कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यासाठी करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर गणेशोत्सव मंडळ आणि ढोल ताशा पथकाच्या वतीने मोफत कोरोना लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. नावनोंदणीपासून लस मिळेपर्यंत या लसीकरणाच्या व्यवस्थापनाची संपूर्ण जबाबदारी अखिल मंडई मंडळाचे कार्यकर्ते आणि रमणबाग युवा मंचाचे वादक यांनी उचलली होती.
सिरम इन्स्टिट्यूट, बाळासाहेब देवरस पॅालिक्लिनिक, अखिल मंडई मंडळ आणि रमणबाग युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने मंडई भागातील कष्टकरी आणि गरजू लोकांसाठी मोफत लसीकरण आयोजित करण्यात आले होते.
यावेळी अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, खजिनदार संजय मते, सचिव विश्वास भोर, विश्वस्त देविदास बहिरट, सुरज थोरात, विक्रम खन्ना, संकेत मते, अजय झवेरी, संकेत तापकीर, साहिल मिसाळ, अथर्व माने, ओमकार थोरात, आशीष थोरात, हर्षल भोर, सागर निपुणगे, केदार जाधव, सुजीत सोमण, रोहित कुलकर्णी, ऋषिकेश आपटे, सुशील चव्हाण, आशुतोष ढमाले, स्वप्नील झोरे आदी उपस्थित होते.

