पुणे : ‘ए. के. एज्युकेशनल कन्सल्टंट्स’च्या (एकेईसी) रशियात एमबीबीएस अभ्यासक्रमासाठी जाणाऱ्या वर्ष २०१७-१८ च्या बॅचचे विद्यार्थी प्रस्थानपूर्व विद्यार्थी पालक मेळाव्याच्या निमित्ताने येथील शेरेटॉन ग्रँड हॉटेलमध्ये नुकतेच एकत्र आले. ही बॅच रशियातील ‘इमॅन्युएल कान्ट बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटी’त एमबीबीएस अभ्यासक्रम शिकण्यासाठी रवाना झाली आहे. मेळाव्यात विद्यार्थी व पालकांचे डॉ. अमित कामले व पोर्णिमा कामले यांनी स्वागत केले. कार्यक्रमाला सन्माननीय पाहुणे म्हणून फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य डॉ. रविंद्रसिंग परदेशी उपस्थित होते. समारंभाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे ही पहिलीच भारतीय बॅच आहे जिने कालिनिनग्राड येथील इमॅन्युएल कान्ट बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये निवड होण्यापूर्वी रशियन सरकारची रसायनशास्त्र व जीवशास्त्र विषयातील प्रवेश परीक्षा यशस्वीपणे उत्तीर्ण केली आहे. या परीक्षेत पुण्याची शमिका मुरुडकर व मुंबईची शिवानी खांडलीकर या दोघींनी अव्वल स्थान पटकावले आहे. बॅचमधील विद्यार्थ्यांना त्यांच्या वैयक्तिक वाचनासाठीची भारतीय पुस्तके ए. के. एज्युकेशनल कन्सल्टंट्सने पुरवली होती.
शपथ ग्रहण समारंभात (हिप्पोक्रॅटिक ऑथ सेरेमनी) या विद्यार्थ्यांनी उत्तम आणि उदात्त डॉक्टर बनण्याची प्रतिज्ञा केली. ‘ए. के. एज्युकेशनल कन्सल्टंट्स’चे संचालक डॉ. अमित कामले यांनी पालक व विद्यार्थ्यांना संबोधित करताना प्रवासाचे कानमंत्र, रशियातील शहरात व युनिव्हर्सिटी परिसरातील सुरक्षा, नोंदणी व व्हिसाचे नियम, अभ्यासक्रम, परीक्षा, सुट्या, पालक आणि विद्यार्थ्यांची वर्तणूक व जबाबदारी आदी पैलूंवर मार्गदर्शन केले. डॉ. कामले म्हणाले, “ भारताला आज रशियातून शिक्षण घेतलेल्या दर्जेदार व कार्यक्षम डॉक्टरांची गरज आहे. इमॅन्युएल कान्ट बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटी त्यांच्या विकसित कॅम्पसमध्ये केवळ गुणवत्ताधारक भारतीय विद्यार्थ्यांची निवड करत असल्याचा मला आनंद आहे. केवळ गुणवत्ताधारक भारतीय विद्यार्थ्यांची नोंदणी होणे ही काळाची गरज आहे.” भाषणानंतर डॉ. कामले यांनी पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या शंकांचे निरसन केले.
याप्रसंगी शमिका मुरुडकरचे वडील डॉ. शिरीष मुरुडकर म्हणाले, “विद्यार्थ्याला स्वीकारण्यापूर्वी त्याचे ज्ञान व सुप्त क्षमता यांची चाचणी घेण्याची संकल्पना हा रशियन फेडरल युनिव्हर्सिटींचा अत्यंत उत्तम पुढाकार आहे, कारण एमबीबीएस अभ्यासक्रम देऊ करणाऱ्या प्रमुख देशांत प्रवेश परीक्षाच नाहीत त्यामुळे विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण पूर्ण करुन भारतात परतल्यावर एमसीआय चाचणी उत्तीर्ण करणे अवघड जाते.”
शिवानी खांडलीकरचे वडील श्याम खांडलीकर यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, “या मेळाव्याला उपस्थित राहताना मला अत्यंत आनंद झाला. डॉ. अमित कामले यांच्यासारख्या ध्येयवादी व्यक्तीशी संपर्कात आल्याने, तसेच ‘ए.के.ई.सी’ संस्था स्वतःला परिवार समजून देत असलेला उत्तम व्यावसायिक, स्नेहाचा आणि माणुसकीचा दृष्टीकोन यामुळे एक पालक म्हणून मी समाधानी आहे.”