पुणे-पुण्याचे सर्वांत मोठे आणि अत्यंत खास तंदुरुस्ती केंद्र ‘नायट्रो वेलनेस अँड फिटनेस हब’ आजपासून कल्याणीनगर येथे सुरु झाले. या केंद्राचे उद्घाटन ‘पंचशील ग्रुप’चे अध्यक्ष अतुल चोरडिया यांच्या हस्ते झाले.
‘नायट्रो’च्या या पुणे केंद्रात फंक्शनल ट्रेनिंग, स्ट्रेंथ ट्रेनिंग, स्विमिंग पूल व ग्रुप ॲक्टिव्हिटीज अशा परिपूर्ण सुविधा उपलब्ध आहेत. व्यायामाची उपकरणे अत्याधुनिक व वाढीव सुरक्षा वैशिष्ट्यांनी युक्त आहेत. फिजिओथेरपिस्ट व न्यूट्रिशनिस्ट यांच्यासह प्रशिक्षित व प्रमाणित अशा तंदुरुस्ती व्यावसायिकांचा संघ सज्ज आहे. ‘नायट्रो वेलनेस अँड फिटनेस हब’ने एक अद्वितीय फंक्शन ट्रेनिंग उपकरणही आणले आहे ज्यावर २२० हून अधिक प्रकारचे शरीर वजन व्यायाम खास प्रशिक्षण क्षेत्रात करता येतात. या केंद्राने आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रोफेशनल साईझ एमएमए किक बॉक्सिंग रिंगची रचना केली असून आपल्या स्पिनिंग स्टुडिओमध्ये टॉप एंड बाइक्स आणल्या आहेत. या स्टुडिओला आकाशाचे सुंदर दृश्य दिसेल असे काचेचे छत आहे आणि सभोवताल पाणी खेळवलेला लाऊंजही आहे. येथील हेल्थ कॅफेमध्ये व्यायामानंतर खाण्याचे ताजे, चविष्ट व आरोग्यपूर्ण पदार्थ व पेये उपलब्ध आहेत. त्याखेरीज या केंद्रात स्पा, सलून व अन्य भरपूर सुविधा आहेत.
या आधुनिक तंदुरुस्ती केंद्रातील जिम्नॅशियममध्ये मध्यवर्ती भागात सिग्नेचर जायंट डिस्को बॉल बसवला असून त्यामुळे जिमला जणू एखाद्या क्लबचे रुप प्राप्त झाले आहे. जांभळ्या रंगातील प्रकाश योजनेमुळे जिममध्ये शांत व स्फूर्तिदायक वातावरण निर्माण झाले आहे. या केंद्रात अत्याधुनिक व्यायामशाळा, अद्ययावत उपकरणे, प्रमाणित प्रशिक्षक व व्यायामादरम्यान संगीताचा आनंद लुटण्यासाठी लाईव्ह डीजेची सोय असल्याने हे केंद्र परिपूर्ण तंदुरुस्ती अनुभव मिळवून देणारे ठरले आहे.
यासंदर्भात ‘नायट्रो वेलनेस अँड फिटनेस हब’चे संस्थापक प्रबोध डावखरे म्हणाले, “या केंद्रात काहीसे रॉक स्टार शैलीचे उत्साहवर्धक व हलकेफुलके रुप आणि अनुभव निर्माण करण्याचे आमचे ध्येय होते. पारंपरिक जिम व क्लबमध्ये आपण जे वातावरण पाहतो त्याहून वेगळेपण राखण्याची आमची इच्छा होती. प्रत्येक जिममध्ये आढळणारी एकसमान व वैतागवाणी अंतर्रचना मला येथे नको होती. त्यामुळे मी अशी रचना केली आहे जी माझ्यातील राकट, ऊर्जापूर्ण, चाकोरीबाह्य आणि माझ्या स्पर्धकांहून सरस राहण्याच्या आकांक्षेचे प्रतिबिंब ठरेल.”
‘नायट्रो फिटनेस’ ही प्रबोध डावखरे यांनी स्थापन केलेली तंदुरुस्ती केंद्रांची साखळी आहे. वर्ष २०१२ मध्ये त्यांनी कल्याणकारी प्रशिक्षण देण्याच्या एकमेव हेतूने पहिले ‘नायट्रो फिटनेस हब’ उघडले. आज त्यांची ठाण्यात दोन तर ब्रिच कँडी येथे एक केंद्रे आहेत. पुण्यातील केंद्र चौथे असून लवकरच नाशिक येथे एक केंद्र उघडण्याची योजना आहे.
‘नायट्रो फिटनेस हब’ हे असे केंद्र आहे, जेथे तंदुरुस्ती गांभीर्याने, पण रंजक वातावरणात केली जाते. येथील सर्व उपकरणे आणि प्रत्येक गोष्ट गरजेनुरुप बनवून घेण्यात आली असून जगातील सर्वोत्तम उत्पादकांकडून आयात केली आहे. केंद्राची अंतर्ऱचना व बाह्यरचनाही सर्वोत्तम दर्जाची असून त्यातील घटकही प्रसिद्ध ब्रँडसचेच आहेत. विविध स्रोतांतून सर्वोत्तम ते घेण्यामुळे, विशेषतः जिम स्थापन करताना दर्जाबाबत कोणतीही तडजोड केलेली नाही.
“आम्ही अगदी प्रत्येक बाबतीत म्हणजे आमच्या उपकरणांचा दर्जा व सेवांतही वेगळेपण जोपासले आहे. ग्राहकांना अनोखा ‘नायट्रो एक्स्पिरियन्स’ मिळावा, हेच आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. तंदुरुस्ती उद्योगात क्रांती घडवण्यासाठी आणि जिम कसे असावे याबाबतचा दृष्टीकोन बदलून टाकण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत. म्हणूनच आम्ही चाकोरीच्या बाहेरचे आहोत,” असे प्रबोध यांनी स्पष्ट केले.
विशेष उल्लेखनीय उपक्रम म्हणजे या केंद्रातील जिममध्ये शारीरिक विकलांग व अपंग व्यक्तींना सुविधांचा वापर करण्यासाठी आणि पोषक पदार्थ मिळण्यासाठी मोफत प्रायोजन पुरवले जाणार आहे.
दसऱ्याच्या पवित्र मुहूर्ताचे औचित्य साधून प्रबोध यांनी एक स्तुत्य पुढाकारही जाहीर केला आहे. ‘नायट्रो हब’च्या वाहनतळाच्या जागेत दर रविवारी दुपारी वंचित बालकांसाठी इंग्रजी व इतर विषयांचे मोफत शिकवणी वर्ग सुरु केले जाणार आहेत. सर्व पुस्तके, शैक्षणिक साहित्यही जिमतर्फे पुरवले जाईल. समाजाच्या देण्याची परतफेड करण्याचा हा आमचा नम्र मार्ग आहे, अशा भावना प्रबोध यांनी व्यक्त केल्या आहेत.