२०२० पर्यंतची गुंठेवारी नियमित करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुणे आणि पिंपरी महापालिकेला आदेश

Date:

पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील विविध विकासकामांचा नगरविकास मंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई, दि. ३ –  पुणे आणि पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील गुंठेवारीची प्रकरणे नियमित करण्याबाबत नगरविकास विभागाने निर्गमित केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील विविध विकासकामांचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत आढावा घेतला. या बैठकीस विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यसभा खासदार संजय राऊत, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी आणि महेश पाठक यांचेसह पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील, शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख संजय मोरे आणि पिंपरी चिंचवड शहरप्रमुख सचिन भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

पुणे आणि पिंपरी- चिंचवड या शहरातील विविध विकासकामाचा सद्यस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ही सर्व कामे दिलेल्या मुदतीत पूर्ण करण्याचे निर्देश नगरविकास मंत्री श्री. शिंदे यांनी या दोन्ही महापालिका आयुक्तांना दिले.

३१ डिसेंबर २०२० पर्यंतची गुंठेवारी नियमित करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. या नियमांची अंमलबजावणी अजूनही सुरु झाली नसल्याचे निदर्शनास आल्याने, याबाबत शासनाने सर्व मनपा आयुक्तांना पत्र पाठवून या नियमांची अंमलबजावणी करण्यासाठी प्रस्ताव स्वीकारण्यास सांगितले होते. त्यानुसार आलेल्या प्रस्तावावर नियमांच्या अधीन राहून कार्यवाही करावी, तसेच कोणत्याही गुंठेवारीधारकास गुंठेवारी नियमित करण्याची इच्छा असल्यास त्याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

पुणे महानगरपालिकेची हद्दवाढ झालेली आहे. यानंतर पुणे महानगरपालिकेतील रिक्त पदे भरण्यासाठी शासनाने परवानगी दिली असून भरतीसाठी पदांच्या  आकृतिबंधाला देखील मंजुरी देण्यात आलेली आहे. ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री शिंदे यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांना दिले.

पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेतील नागरिकांना २४ तास पाणी पुरवठा करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अमृत योजना अत्यंत धीम्या गतीने सुरु असल्याचे समजले. शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची गैरसोय होऊ नये यासाठी या योजनेच्या कामाला गती देण्याचे निर्देश त्यांनी पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांना दिले.तसेच ही योजना पूर्ण होईपर्यंत देखील शहरातील नागरिकांना एक दिवसाआड सुरु असलेला पाणी पुरवठा नियमित करण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

“चालू” ठेकेदारांना जोरदार झटका: स्थायी समितीचे नवे धोरण

''महापालिकेकडून केली जाणारी कामे दर्जेदार झाली पाहिजेत. पण खूप...

पुणे महापालिकेतील स्वीकृत सदस्य निवडीसाठी पैशाचा घोडेबाजार थांबवा:रमेश चेन्नीथलांकडे तक्रार

पुणे- येथील महापालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून १ जागा कॉंग्रेसच्या...

अनधिकृत बांधकामांबाबत अभियंत्यांवर जबाबदारी निश्चित करा:स्थायी समितीचे अध्यक्ष श्रीनाथ भिमाले

नियमित सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याची स्थायी समितीची सूचना ...