Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर; 100 हून अधिक मराठी उमेदवार यशस्वी

Date:

नवी दिल्ली : केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल आज जाहिर झाला. देशातील 1 हजार 78 उमेदवार यात यशस्वी ठरले. यामध्ये 100 हून अधिक मराठी उमदेवारांनी यश संपादन केले आहे.

आज जाहिर झालेल्या निकालात केंद्रीय लोकसेवा आयोगाने 1 हजार 78 उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये सर्वसाधारण (ओपन) गटातून 499, इतर मागास प्रवर्गातून 314, अनूसूचित जाती प्रवर्गातून 176, अनूसूचित जमाती प्रवर्गातून 89 इतक्या उमेदवांराचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवांरापैकी 52 उमेदवार शारीरिक विकलांग आहेत. लोकसेवा आयोगाने 172 उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve list) तयार केली आहे. यामध्ये सर्व साधारण गट 86 इतर मागास, इतर मागास वर्ग 74, अनुसूचित जाती 8 अनुसूचित जमाती 04 उमेदवारांचा समावेश आहे.

महाराष्ट्रतून 100 उमेदवार यशस्वी ठरले आहेत. यामध्ये योगेश कुंबेजकर 8, श्रीकांतनाथ पांचाळ 16, हनुमंत झेंडगे 50, विशु महाजन 70, निखिल पाठक 107, सिद्धेश्वर बोंडार 124, स्वप्नील वानखडे 132, रोहण बोटरे 187, स्वप्नील खरे 197, राहुल पांडवे 200, नवनाथ गव्हाणे 220, हर्षल भोयर 233, मुकुल कुलकर्णी 238, रोहित गोडके 257, अक्षय कोंडे 278, रवींद्र खटाळे 283, आशिष काटे 328, पंकज खंडागळे 340, अक्षय पाटील 344, किशोर क्षिरसागर 353, संजीव चेथुले 354, शेख अंसर अहमद 361, दत्तात्रेय शिंदे 377, विवेक भस्मे 395, श्रीकांत सुसे 400, रेहा जोशी 425, वासुद तोरसेकर 440, कपील गाडे 455, शैली ढोले 448, सोमय मुंडे 476, संदीप भोसले 482, अमीत मुंडे 485, स्वप्नील पुंडकर 487, शिबी गहरवार 489, अमीत आसरे 490, अदिती वाळुंज 491, पुनम पाटे 497, तुषार वाघ 545, नंदकिशोर कलाल 549, मनिष नारनवरे 552, विशाल साकोरे 568, देवयानी हलके 576, शीतल वाडी 580, प्रसाद मेनकुंदळे 599, प्रवीण डोंगरे 601, आकाश वानखडे 603, किरणकुमार जाधव 614, किरण शिंदे 618, ऋषिकेश खिल्लारी 627, शरदचंद्र पवार 632, गोपाल चौधरी 635, कुलदीप सोनवणे 636, चंद्रकांत राठोड 537, विशाल नरवडे 640, अरविंद कुमार नामदेव 648, अवध किशोर पवार 657, पवन बनसोड 674 शशांक शेव्हरे 682, श्रुती शेजोळे 690, स्वप्नील कोठवडे 693, राहुल तिरसे 705, विनोदकुमार येरणे 709, रामदास काळे 711, स्वप्नील महाजन 720, नितीश पाठोडे 723, रोहन आगवणे 735, समीर पाटील 746 , लक्ष्मीकांत सूर्यवंशी 750, प्रांजल पाटील 773, संदीप साठे 775, विक्रम विरकर 784, जय वाघमारे 788, किशोर तांदळे 814, शुभम ठाकरे 817, ओमकारेश्वर कांचनगिरे 820, संदीप पानदुले 826, भुषण भिरुड 829, संघमित्र खोब्रागडे 832, योगेश पाटील 836, रामदास भिसे 851, स्वप्नील चौधरी 862, राहुल गारूड 869, उदय खोमणे 885, सूर्यकांत पवार 886, निधी बारड 887, प्रदीप मिरासे 896, शिवानंद सुर्वे 913, शिवम् धमणीकर 934, प्रवीण गावस्कर 936, रोहित कुमार भैसारे 941, अतुल कुमार टीरके 943, वैशाली धांडे 964, अमोघ थोरात 966, गौरव मेश्राम 968, अजय खरडे 975, क्रांती खोब्रागडे 982, स्वाती सुर्वे 1003, मामोनी डोले 1005, योगेश भरसाट 1013, संदीप पवार 1038, श्रीकांत मंत्री 1048, राहूल माळी 1054, सुधीर जाखेरे 1059, स्नेहल भापकर 1062, विष्णू अव्टी 1064, संदीप सोनावणे 1074, गोरखनाथ पाटील 1076 हे उमेदवार आहेत.

रिक्त जागेंपैकी शासनातील सेवेमध्ये खालीलप्रमाणे नियुक्ती करण्यात येणार आहे.

भारतीय प्रशासन सेवा (आय.ए.एस.) – या सेवेत सर्वसाधारण गट (ओपन) 91 इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) 49, अनुसूचित जाती (एस.सी.) 27, अनुसूचित जमाती (एस.टी.) 13 जागा रिक्त आहेत. गुणाणूक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केला जाणार आहे.

भारतीय विदेश सेवा (आय.एफ.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण 45 जागा रिक्त आहेत. यामध्ये सर्वसाधारण गट (ओपन) 25, इतर इतर मागास वर्ग (ओ.बी.सी) 07 अनुसूचित जाती (एस.सी.) 07, अनुसूचित जमाती (एस.सी.) निरंक जागा रिक्त आहेत.

भारतीय पोलीस सेवा (आय.पी.एस.) – या सेवेमध्ये एकूण 150 जागा रिक्त आहेत. यामध्ये सर्वसाधारण गटातून (ओपन)77 उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून 37, अनुसूचित जाती प्रवर्गातून 23, अनुसूचित जमाती प्रवर्गातून 13 उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.

केंद्रीय सेवा गट ‘अ’ – या सेवेमध्ये एकूण 728 जागा रिक्त आहेत. यामध्ये सर्वसाधारण गटातून (ओपन) 369, उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून 196, अनुसूचित जाती प्रवर्गातून 104, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून 56 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.

केंद्रीय सेवा गट ‘ब’ – या सेवेमध्ये एकूण 61 जागा रिक्त आहेत. यामध्ये सर्वसाधारण गटातून (ओपन) 20, उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून 19, अनुसूचित जाती प्रवर्गातून 15 तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून 07 उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महाराष्ट्र झोपडपट्टी पुनर्विकास विधेयकाच्या अंमलबजावणीतील संभाव्य अडचणींबाबत आमदार बापूसाहेब पठारे यांचा सवाल

मुंबई: महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) विधेयक सध्या...

ज्येष्ठ कलाकार मनमोहन महिमकर यांना बेघर होऊ देणार नाही

मनमोहन महिमकर यांनी घेतली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट चित्रपट...

श्री ओंकारेश्वर मंदिराचा २८७ वा वर्धापन दिन साजरा

पुण्याच्या ऐतिहासिक आणि धार्मिक वैभवाचे प्रतीक ; आकर्षक सजावट...

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्यावतीने एकावर स्थानबद्धेची कारवाई

पुणे, दि. 9: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या आदेशानुसार एमपीडीए...