वैफल्यग्रस्त प्रशांत जगताप यांचे बेछुट आणि बिनबुडाचे आरोप – संदीप खर्डेकर यांचा घणाघात.

Date:

पुणे-

अमेनिटी स्पेस च्या विषयावरून राष्ट्रवादीत माजलेले रणकंदन, स्थायी समिती सदस्यांसह पक्षादेश धुडकावणारे नगरसेवक आणि महापालिकेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच दिसू लागलेला पराभव,यामुळे राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप वैफल्यग्रस्त झाले असून आपले अपयश लपविण्यासाठी बेछुट आणि बिनबुडाचे आरोप करत आहेत अशी घणाघाती टीका भाजप चे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी केली आहे.वस्तूत: भाजप प्रदेशाध्यक्ष आ.चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी ने पुणे शहरात कामांचा धडाका लावला असून 2017 च्या निवडणुकीत दिलेली सर्व आश्वासने पूर्ण करत आणली आहेत.कोरोना च्या संकटकाळात अभूतपूर्व सेवाकार्य करणारे भाजप चे लोकप्रतिनिधी आपापल्या प्रभागात सामान्य पुणेकरांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात यशस्वी झाले आहेत. येवढेच नव्हे तर पुणेकरांचे मेट्रो चे स्वप्न देखील साकार होतं आहे. अश्या परिस्थितीत येत्या मनपा निवडणुकीत पुणेकर पुन्हा एकदा भाजप ला पसंती देतील हे लक्षात आल्यामुळे प्रशांत जगताप आपले अस्तित्व टिकविण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांना लक्ष्य करत आहेत, मात्र या प्रयत्नात आपलेच हसू होतं आहे हे त्यांच्या लक्षात येत नसावे. खरेतर राजकीय सभ्यतेनुसार त्यांनी त्यांच्या बरोबरीच्या नेत्यांवर टीका केली तर एकवेळ समजून घेता येईल पण थेट भाजप प्रदेशाध्यक्षांवर आरोप करताना त्यांना सभ्यतेचे ही भान राहिलेले नाही. राज्यात त्यांचा पक्ष सहभागी असलेल्या महाभकास आघाडी चे सरकार आहे आणि हे सरकार कश्या पद्धतीने सुडाचे आणि गलिच्छ राजकारण करत आहे ते मा. नारायण राणे प्रकरणात देशाने बघितले आहे, त्यामुळे त्यांना पुणे महापालिकेतील कोणत्याही विषयाची चौकशी करायची असेल तर त्यांनी सत्तेचा दुरुपयोग करून खुशाल करावी त्यास आम्ही योग्य प्रत्युत्तर देऊच, मात्र ते करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर आरोप करताना त्यांनी संयम बाळगावा असा सल्ला ही संदीप खर्डेकर यांनी दिला आहे. विकास कामांमध्ये अडथळे आणण्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडले जातील असेही खर्डेकर म्हणाले.आपल्याच पक्षातील ज्येष्ठ अश्या खासदार वंदनाताईंच्या निर्णयांचा अनादर करणारे प्रशांत जगताप, महापौर राजीनामा देणार होते असा कापोलकल्पित दावा करतात हे हास्यास्पद असल्याचे ही खर्डेकर म्हणाले.प्रशांत जगताप यांचा केवळ प्रसिद्धी साठी सारा खटाटोप असून मोठ्या नेत्यांवर बोलले की वारेमाप प्रसिद्धी मिळते आणि आपले अपयश ही झाकता येते असा त्यांचा गैरसमज झाला आहे, ह्या कल्पनाविलासातून त्यांनी लवकर बाहेर यावे वा काहीतरी सकारात्मक कार्य करावे असा सल्ला ही खर्डेकर यांनी दिला आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापौर मंजुषा नागपुरे यांच्या पुढाकाराने सफाई कामगाराच्या मुलीच्या उपचाराचा मार्ग मोकळा

पुणे :पुणे महानगरपालिका अंतर्गत वानवडी क्षेत्रीय कार्यालयातील गोसावी आरोग्य...

378 वा बीज सोहळा:तुकोबांच्या नामगजराने देहूनगरी दुमदुमली

पुणे-जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नामगजराने गुरुवारी देहूनगरी दुमदुमली....

अजित पवार मृत्युप्रकरणी व्हीएसआर कंपनी मालकाची सीआयडीकडून 8 तास चौकशी:अपघाती मृत्यू, हलगर्जीपणा की घातपात ?

पुणे -दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक मृत्यू प्रकरणात...

“चालू” ठेकेदारांना जोरदार झटका: स्थायी समितीचे नवे धोरण

''महापालिकेकडून केली जाणारी कामे दर्जेदार झाली पाहिजेत. पण खूप...