नवी दिल्ली : व्होल्टास या भारतातील पहिल्या क्रमांकाचा एसी ब्रॅण्ड असलेल्या टाटा समूहातील कंपनीने २०१८ सालची नवीन “व्होल्टास ऑल स्टार इन्व्हर्टर एसीज”ची मालिका बाजारात आणून आपले आघाडीचे स्थान अधिक भक्कम केले आहे. या आगळ्यावेगळ्या “टू स्टेज स्टेडी कूल कंम्प्रेसर” तंत्रज्ञानावर आधारित एसींमध्ये दोन टप्प्यांतील कम्प्रेशनमुळे दोन टप्प्यात गारवा वाढवला जातो. यामुळे “स्टेडी कूलिंग अॅण्ड स्टेडी सेव्हिंग्ज” अर्थात गारवा अचानक न वाढता स्थिरपणे वाढवणे आणि ऊर्जेची बचत हे दोन्ही साध्य होते. ही सुविधा अन्य एसींमध्ये नाही. यावर्षी व्होल्टासने एसी विभागात १२० एसकेयूज लाँच केले आहेत. त्यामध्ये इन्व्हर्टर एसी, स्प्लिट एसी आणि विंडो एसींचा समावेश आहे.
इन्व्हर्टर एसींच्या या नवीन मालिकेतील एसी तापमान ५५ अंशांपर्यंत कमी करू शकतात आणि केवळ १८ डेसिबल ध्वनीची निर्मिती करतात. यामध्ये आणखीही काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. उदाहरणार्थ, प्रगत एअर प्युरिफायर आणि फाइव्हडी डीसी मोटर तंत्रज्ञान (एसींमधील सर्व मोटर्स डीसी तत्त्वावरच काम करतात). याशिवाय या मालिकेतील सर्व उत्पादनांसोबत “पाच वर्षांची सर्वसमावेशक वॉरंटी”, “मोफत स्टॅण्डर्ड इन्स्टॉलेशन” आणि “क्रेडिट व डेबिट कार्डामार्फत खरेदी केल्यास पाच टक्के कॅशबॅक” अशा अनेक ऑफर्स आहेत.
याबाबत व्होल्टास लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रदीप बक्षी म्हणाले, “कूलिंग आणि कंफर्ट क्षेत्रात व्होल्टासची ब्रॅण्ड इक्विटी सर्वाधिक असून, एसी विभागात हा पहिल्या क्रमांकाचा ब्रॅण्ड आहे. आता ग्राहक इन्व्हर्टर एसीला प्राधान्य देऊ लागले असून एसी उद्योगातील हा सर्वाधिक वेगाने वाढणारा विभाग आहे. उद्योगातील प्रवाहाशी सुसंगती राखत, व्होल्टासने इन्व्हर्टर एसीच्या बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वांत मोठ्या श्रेणींपैकी एक लाँच केली आहे.”
“सर्व हवामानांसाठी अनुकूल एसी” (ऑल वेदर एसी)
सध्या उपलब्ध असलेल्या ऑल वेदर एसींमध्ये आणखी सुधारणा करत व्होल्टासने ऑल वेदर एसींची एक नवीन आणि सुधारित श्रेणी बाजारात आणली आहे. आसपासचा परिसर अधिक थंड करण्याची क्षमता, योग्य पद्धतीने हीटिंग आणि हवेतील आर्द्रता नियंत्रित करण्याची सुविधा यात आहे. या सुविधांमुळे ग्राहकांना वर्षभर सर्व प्रकारच्या हवामानांमध्ये एसीचा वापर करता येतो.
या सर्व नवीन सुविधांनी युक्त उत्पादनांसह कंपनीने इन्व्हर्टर एसी, स्प्लिट एसी, विंडो एसी यांच्या दमदार श्रेणी देशभरातील १५ हजारांहून अधिक केंद्रांच्या मार्फत विक्रीसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. एसींच्या नवीन श्रेणी व्होल्टासच्या वेगवान वाढीत हातभार लावतील आणि कंपनीचे बाजारपेठेवरील वर्चस्व कायम राखतील. नुकत्याच झालेल्या एका त्रयस्थ व स्वतंत्र रिटेल लेखा अभ्यासाच्या अहवालानुसार, कंपनीचा बाजारपेठेतील वाटा २३.३ टक्के (२०१७-१८ आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत) असून सर्वांत नजीकच्या स्पर्धकांना खूप मागे टाकून व्होल्टास भारतातील पहिल्या क्रमांकाचा एसी ब्रॅण्ड ठरला आहे.
फ्रेश एअर कूलर्स
आपल्या कार्यक्षेत्राचा विस्तार करत, कंपनीने यावर्षी ‘व्होल्टास फ्रेश एअर कूलर्स’ची नवीन श्रेणी बाजारात आणली आहे. “हर गर्मी का कूलर” अर्थात कोणत्याही प्रकारच्या उन्हाळ्यात थंडावा देणारा कूलर असे या श्रेणीचे घोषवाक्य आहे. या कूलर्समध्ये “स्मार्ट ह्युमिडिटी कंट्रोल” तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला असून परिसरातील हवेतील आर्द्रतेचा योग्य वापर करून हे कूलर्स समतोल थंडावा देतात. याशिवाय टर्बो एअर थ्रो आणि अॅण्टि-मायक्रोबिअल टँकसारख्या सुविधांची जोड कूलर्सना देण्यात आली आहे. व्होल्टास एअर कूलर विकत घेण्यासाठी ग्राहकांना आकर्षक वाटणारी “झिरो परसेंट कंझ्युमर फायनान्स” योजना उपलब्ध आहे.
उत्पादनांची उपलब्धता यावर्षी आणखी वाढवण्यात आली असून, डेझर्ट, पर्सनल, विंडो आणि टॉवर कूलर या सर्वच विभागांत ३५ एसकेयूज ठेवण्यात आले आहेत. नुकत्याच झालेल्या स्वतंत्र आणि त्रयस्थ लेखा अभ्यासाच्या अहवालानुसार ही कंपनी भारतातील आघाडीच्या तीन कूलर्स ब्रॅण्ड्समध्ये आहे.
व्यावसायिक शीतकरण उत्पादने
व्यावसायिक शीतकरण उत्पादनांच्या उदयोन्मुख विभागात, व्होल्टासने नवीन कॉम्बो कूलर, कर्व्ह्ड ग्लास फ्रीझर आणि व्हर्टिकल डिसप्ले फ्रीजर्स यांच्यासारखे नवीन एसकेयूज लाँच केले आहेत. शिवाय व्होल्टासने आरओ आणि यूव्ही शुद्धीकरण तंत्रज्ञानाने युक्त असे एसीही लाँच केले असून अशा प्रकारच्या पहिल्या एसींमध्ये त्यांची गणना होते. व्होल्टासने बॉटम माउंटेड वॉटर डिस्पेन्सर्सही बाजारात आणले आहेत. यासह व्होल्टासच्या व्यावसायिक शीतकरण उत्पादनांनी १०० एसकेयूज टप्पा ओलांडला आहे.
एसी, एअर कूलर्स आणि व्यावसायिक शीतकरण उत्पादनांच्या विस्तारित श्रेणीसह व्होल्टासने २०१८ सालात बाजारपेठेत शीतकरणाच्या उत्पादनांचे २५०हून अधिक एसकेयूज लाँच केले आहेत.
व्होल्टास लिमिटेडविषयी : आपल्या युनिट्सच्या स्वरुपातील उत्पादनांच्या व्यवसायासह (यामध्ये एअर कंडिशनर्स, एअर कूलर्स आणि व्यावसायिक शीतकरण उत्पादनांचा समावेश होतो.) व्होल्टास ही आघाडीची इंजिनीअरिंग सोल्युशन्स पुरवणारी तसेच प्रोजेक्ट स्पेशालिस्ट कंपनी आहे. भारतात १९५४ साली स्थापन झालेली व्होल्टास ही कंपनी उष्मीकरण (हीटिंग), व्हेंटिलेशन व वातानुकूलन (एचव्हीएसी), शीतकरण, विद्युत-यांत्रिकी प्रकल्प, वस्त्रोद्योग यंत्रसामुग्री, खाणकाम व बांधकाम उपकरणे, जल व्यवस्थापन व उपचार, शीतगृह सेवा, इमारत व्यवस्थापन प्रणाली, विद्युतीकरण आणि अंतर्गत हवेचा दर्जा आदी क्षेत्रांत इंजिनीअरिंग सेवा पुरवते. व्होल्टास लिमिटेड ही टाटा समूहातील आघाडीच्या दहा कंपन्यांपैकी एक आहे.