मुंबई– ताज हॉटेल पॅलेसेस रिझॉर्ट सफारीजने आपल्या पुण्यातील हॉटेल्ससाठी काही नवीन नियुक्त्यांची घोषणा केली आहे. सुजु कृष्णन आणि जयंत दास हे केरळच्या कटिबंधीय बॅकवॉटर्समधून पुण्यात, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत आले आहेत. सुजु कृष्णन ताज ब्ल्यू डायमंडच्या विवांताची सूत्रे हाती घेतील, तर जयंत दास पुण्यातील हिंजवडी येथील गेटवे हॉटेलची जबाबदारी सांभाळतील.
सुजु हे कंपनीत २४ वर्षांपासून कार्यरत असलेले ताजचे निष्ठावंत कर्मचारी आहेत. ताज ग्रॅज्युएट ट्रेनिंग कार्यक्रमाचा भाग म्हणून कोलकाता येथील ताज बेंगाल हॉटेलमध्ये ते १९९४ साली फ्रण्ट ऑफिस कर्मचारी म्हणून रुजू झाले. अनेक शहरांमध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर सुजू यांना आग्रा येथील फतेहाबाद मार्गावरील द गेटवे हॉटेलमध्ये महाव्यवस्थापक म्हणून नियुक्त करण्यात आले. पुण्यात येण्यापूर्वी ते एर्नाकुलमच्या मरिन ड्राइव्हवरील गेटवे हॉटेलचे महाव्यवस्थापक होते.
“पुण्यासारख्या उत्साही शहरातील ताज ब्ल्यू डायमंडच्या विवांतामध्ये एक नवीन खेळी सुरू करण्याबाबत मी खूपच रोमांचित आहे. सर्वोत्कृष्ट सेवेचा ताजचा वारसा पुढे चालवायला मिळणे ही भाग्याची गोष्ट आहे,” असे सुजु कृष्णन म्हणाले.
बेंगलोर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतलेले सुजु यांना ताज ब्रॅण्डबद्दल खूपच उत्कट जिव्हाळा आहे आणि स्वत: उदाहरण घालून देऊन नेतृत्व करण्यावर त्यांचा विश्वास आहे. त्यांना भारतीय आणि पाश्चिमात्य शास्त्रीय संगीत आवडते. वाचन आणि आउटडोअर अॅक्टिव्हिटीज हे त्यांचे छंद आहेत.
“सुजु यांनी ताजमध्ये स्वत:ला सिद्ध केलेले आहे. ते आमच्या सर्वांत तरुण महाव्यवस्थापकांपैकी एक होते. टाटा समूह युवा व्यवस्थापक नेतृत्व कार्यक्रमासाठी त्यांना नामांकन मिळाले होते. त्यांनी अनेक ठिकाणी यशस्वी नेतृत्व केले आहे आणि ते निकालावर (रिझल्ट) लक्ष केंद्रित करणारे व्यावसायिक आहेत. जयंत दास यांनीही समूहात अनेक आव्हानात्मक कामे हातात घेतली आहे आणि त्यातील बहुतेक यशस्वीरित्या पूर्ण केली आहेत. ते अत्यंत परिपक्व आणि मेहनती आहेत. मी या दोघांनाही पुण्यातील त्यांच्या नवीन कामासाठी शुभेच्छा देतो,” असे ताज हॉटेल पॅलेसेस रिझॉर्ट्स सफारीजचे पश्चिम विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष (ऑपरेशन्स) फरहात जमाल म्हणाले.
जयंत दास हे पुण्यातील हिंजवडी येथील गेटवे हॉटेलच्या महाव्यवस्थापकपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. ते यापूर्वी केरळमधील अथ्थे ताज कुमारकोम रिझॉर्ट आणि स्पाचे महाव्यवस्थापक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली या हॉटेलने दोन राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार प्राप्त केले आहेत. जयंत यांनी त्यांची ताजमधील कारकीर्द १९९३ मध्ये कोलकात्याच्या ताज बेंगालमधून केली.
“हिंजवडीच्या गेटवे हॉटेलमधील तरुण व प्रतिभावान कर्मचाऱ्यांसोबत काम सुरू करून आमच्या पाहुण्यांना ताज ब्रॅण्डची ओळख असलेली उच्च स्तरावरील सेवा देण्यास मी उत्सुक आहे,” असे जयंत दास म्हणाले.
जयंत यांनी पटणा येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमधून पदवी घेतली आहे. त्यापूर्वी त्यांनी त्रिपुरा विद्यापीठातून कला शाखेची पदवी घेतली आहे. फावल्या वेळात जयंत शास्त्रीय आणि सुगम संगीताचा आनंद घेतात आणि नॉन-फिक्शन प्रकारातील पुस्तके वाचतात. असामान्य स्थळांना भेटी देण्याची आवड त्यांना आहे- यात जंगल सफारींचा क्रमांक पहिला आहे!
दोन्ही ताज हॉटेलांमधील पाहुणे पुणे शहराचा दिमाख अनुभवू शकतील. ताज-ब्ल्यू डायमंडचे विवांता पुण्याच्या हृदयस्थानी आणि व्यावसायिक तसेच मनोरंजन क्षेत्राच्या केंद्रस्थानी आहे. तर हिंजवडी येथील गेटवे हॉटेल हे पुण्यातील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राच्या केंद्राजवळ तसेच पुणे-मुंबई महामार्गालगत, अत्यंत सोयीस्कर ठिकाणी आहे.
ताज हॉटेल पॅलेसेस रिझॉर्ट्स सफारीजविषयी
ऐषोरामाचा अस्सल अनुभव हवा असलेल्या जगातील सर्वांत चिकित्सक पर्यटकांना सेवा देणारा ताज हॉटेल पॅलेसेस रिझॉर्ट सफारीज हा इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड अर्थात आयएचसीएलचा प्रतिष्ठित ब्रॅण्ड १९०३ सालापासून कार्यरत आहे. जगविख्यात लॅण्डमार्क्सपासून ते आधुनिक बिझनेस हॉटेल्सपर्यंत, रमणीय बीच रिझॉर्ट्सपासून ते अस्सल भव्य राजवाड्यांपर्यंत ताजच्या सर्व हॉटेल्समध्ये भारतीय आतिथ्यशीलता, जागतिक दर्जाची सेवा आणि आधुनिक ऐषोराम यांचा मिलाफ साधलेला आहे. मुंबई येथील ताज महाल पॅलेस हॉटेल म्हणजे समूहाचा मुकुटमणी असून, सर्वोत्तम सुसंस्कृत राहणीमान, कल्पकता आणि जिव्हाळ्याचा मापदंड या हॉटेलने निर्माण केला आहे. कडवे श्रम आणि कडवा श्रमपरिहार (वर्क-हार्ड, प्ले-हार्ड) या तरुणांच्या जीवनशैलीला साजेसा आधुनिक आणि सृजनशील आतिथ्याचा अनुभव विवांतामध्ये मिळतो. गेटवे हॉटेल्सचे वैशिष्ट्य म्हणजे पाहुण्यांना ताजेतवाने करणारा, निवांत अनुभव तसेच दर्जा, सेवा व शैलीतील सातत्य.
इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेडचा (आयएचसीएल) ताज हॉटेल्स पॅलेसेस रिझॉर्ट्स सफारीज हा प्रमुख ब्रॅण्ड आहे. आयएचसीएलचा इकॉनॉमी विभागातील हॉटेल्सचा जिंजर ब्रॅण्डही भारतातील ब्रॅण्डेड बजेट हॉटेल्सच्या क्षेत्रातील पहिला ब्रॅण्ड असून सर्वांत मोठाही आहे. इंडियन हॉटेल्स कंपनी लिमिटेड सॅट्स (पूर्वीचे नाव सिंगापोर एअरपोर्ट टर्मिनल सर्व्हिसेस) या हवाई खानपानसेवा क्षेत्रातील आघाडीच्या कंपनीसोबत ताजसॅट्स एअर केटरिंग ही सेवा जॉइंट व्हेंचरच्या स्वरुपात देते. महत्त्वाच्या शहरांमध्ये होणाऱ्या हवाई वाहतुकीमध्ये या सेवेद्वारे अन्नपदार्थ पुरवले जातात.