मुंबई : नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ला रुपे डिस्कव्हर ग्लोबल कार्ड तब्बल 25 दशलक्ष लोकांपर्यंत पोचल्याचे जाहीर करताना अभिमानास्पद वाटते आहे. एनपीसीआय आणि डिस्कव्हर फायनान्शिअल सर्व्हिसेस (डीएफस)मधील भागीदारी, रुपेचा जगभरातील स्वीकार वाढावा, यासाठी करण्यात आलेली आहे, यासाठी 2014 सालापासून बँकेतर्फे रुपे डिस्कव्हर ग्लोबल कार्ड देण्यात येत आहे.एनपीसीआयचे प्रमुख प्रक्रिया अधिकारी श्री. दिलीप आसबे म्हणाले की, “डीएफएसबरोबर संलग्नित होणे ही घटना आमच्यासाठी अतिशय प्रतिष्ठेची आहे. आम्ही आतापर्यंत 25 दशलक्ष रुपे कार्ड धारकांच्या सबलीकरणाचा टप्पा गाठला आहे, त्यांना तब्बल 185 देश आणि जागतिक ठिकाणी 40 दशलक्ष पॉइंट ऑफ सेल (पीओएस) टर्मिनल आणि 1.9 दशलक्ष एटीएमद्वारे कार्डाचा वापर करता येणार आङे.’’
डीएफएसचे अध्यक्ष आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी श्री. डेव्हिड डब्ल्यू नेलम्स म्हणाले की, “आम्ही आतापर्यंत जी प्रगती केली आहे, त्याचा आम्हाला अभिमान आहे. भारतीय आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठ्या प्रमाणावर प्रवास करतात आणि डिस्कव्हर गोल्बल नेटवर्कला रुपे ग्लोबल कार्डधारकांच्या या जागतिक प्रवासात खरेदीसाठी मदत करता येणार आहे, याचा भाग होता येत आहे, यासाठी आम्ही उत्साही आहोत. एनपीसीआयबरोबरच्या आमच्या भागीदारीसाठी आम्ही वचनबद्ध आहोत आणि भारतीय देयकांच्या बाजारपेठांमध्ये संलग्नितपणे विकास करू शकू, याकडे लक्ष देणार आहोत.’’दोन कंपन्यांमधील अंतर्गत भागीदारीचा लाभ देयक नेटवर्कना होणार आहे, या धोरणात्मक भागीदारीमुळेरुपे डिस्कव्हर डेबिट आणि क्रेडिट इंटरनॅशनल कार्डांसाठी विमा संरक्षण दिले जाणार आहे, हे संरक्षण एनपीसीआयच्या भारतातील सदस्य बँकांद्वारे दिले जाईल. रूपे ग्लोबल डेबिट आणि क्रेडिट कार्ड सध्या 32 बँकांमध्येदेण्यात आली आहेत. भारताबाहेर व्यापाऱ्यांकडे खरेदीसाठी आणि डिस्कव्हर ग्लोबलनेटवर्कमधून रोख रक्कम काढताना याचा वापर करता येईल. डिस्कव्हर ग्लोबल नेटवर्कमध्ये डिस्कव्हर, डिनेर क्लब इंटरनॅशनल, पल्स आणि संबंधित नेटवर्कचा समावेश आहे.
सध्या रुपे ग्लोबल कार्ड रुपे ग्लोबल क्लासिक डेबिट कार्ड, रुपे ग्लोबल क्लासिक क्रेडिट कार्ड, रुपे प्लॅटिनम डेबिट कार्ड, रुपे प्लॅटिनम क्रेडिट कार्ड आणि रुपे सिलेक्ट क्रेडिट कार्ड अशा पाच विविध प्रकारांचा समावेश आहे.
रुपे डिस्कव्हर सिलेक्ट क्रेडिट कार्डाची वैशिष्ट्ये
- संपन्न प्रकारावर लक्ष्य केंद्रित केलेले हे कार्ड तुमचे स्वप्नातील जगणे प्रत्यक्षात येण्यासाठी मदत करते आणि याद्वारे मिळणाऱ्या सेवांमुळे तुमची जीवनशैली अतिशय आरामदायी होते.
- समकालीन स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय लाँजमध्ये प्रवेश,जगभरातील 500 प्लस लाँज आणि भारतातील 30 प्लस लाँजचा समावेश; यासारख्या सर्वोत्तम विशेष सेवा खास ग्राहकांना भेट म्हणून दिल्या जातात.
- प्रवास, खानपान आणि करमणूक यासंबंधीच्या सेवा 24×7 उपलब्ध
- 10 लाख रुपयांपर्यंतचा वैयक्तिक अपघात विमा
रुपे डिस्कव्हर प्लॅटिनम डेबिट आणि क्रेडिट कार्डाची वैशिष्ट्ये
- भारतातील महत्त्वाकांक्षी तरुणांवर लक्ष्य केंद्रित
- रेस्टॉरंट, इंधनाचे पंप आणि सेवासुविधांची बिले भरणे यासर्वांवर वर्षभर चालणाऱ्या कॅशबॅक सेवा
- ऑनलाइन आणि ऑफलाइन व्यापाऱ्यांसाठी विस्तारीत नेटवर्कवर वैध असणाऱ्या आकर्षक ऑफऱ आणि सवलती
- एनपीसीआयबद्दल थोडेसे :भारतातील रिटेल देयक यंत्रणांसाठी केंद्रीय पायाभूत सुविधा म्हणून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय)ची स्थापना 2009 साली करण्यात आली आणि देशातील सर्व प्रकारच्या बँकांसाठी देयकांच्या वापरासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) ही संकल्पना अमलात आणली. इंटर बँक एटीएमचे व्यवहार बदलून एकच सेवा करणे, धनादेश वटवणे, नॅशनल ऑटोमेटेड क्लिअरिंग हाउस (एनएसीएच), आधार अनेबल पेमेंट सिस्टम (एइपीएस), यूएसएसडी आधारित *99#, रुपे कार्ड, इमिडिएट पेमेंट सर्व्हिस (आयएमपीएस), युनिफाइड पेमेंट इंटरफेस (यूपीआय) आणि भारत इंटरफेस फॉर मनी (बीएचआयएम). सध्या 350 दशलक्षपेक्षा जास्त रुपे डेबिट कार्ड जारी करण्यात आलेली आहेत.
डिस्कव्हरबद्दल थोडेसे: डिस्कव्हर फायनान्शिअल सर्व्हिसेस (एनवायएसई : डीएफएस) ही थेट बँक सेवा आणि देयक सेवा देणारी कंपनी असून, अमेरिकेतील सर्वात मोठ्या ब्रँडच्या वित्तीय सेवांबरोबर संलग्नित आहे. 1986 सालापासून कंपनी अमेरिकेतील सर्वात मोठी कार्ड देणारी कंपनी आहे. कंपनीतर्फे डिस्कव्हर कार्ड दिले जाते, याशिवाय अमेरिकेतील रोख रकमांच्या बक्षीसांतील प्रमुख कंपनी आहे, आणि याद्वारे विद्यार्थ्यांना खासगी कर्ज, वैयक्तिक कर्ज, गृह इक्विटी कर्ज, चेकिंग आणि बचत खाती आणि ठेवींवरील प्रमाणपत्र यासारख्या थेट बँक सेवा दिल्या जातात. कंपनीचा डिस्कव्हरच्या नेटवर्कमध्ये कामकाज चालते, लाखो व्यापारी आणि कॅश वापरली जाणारी ठिकाणी आदींच्या साहाय्याने कार्य चालते;पल्स या देशातील अग्रणीच्या एटीएम/डेबिट नेटवर्क, आणि डिनेर क्लब इंटरनॅशनल, ग्लोबल पेमेंट नेटवर्क यांच्यासह तब्बल 185 देशांमध्ये आणि प्रदेशांमध्ये कंपनीच्या प्रक्रिया राबवल्या जातात.