टाटा क्रुसिबल कॅम्पस क्विझ २०२० च्या पुणे क्षेत्रीय फेरीत पुण्याच्या सिम्बॉयसिस सेंटर फॉर इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी (एससीआयटी) टीमने पटकावले विजेतेपद

Date:

पुणे  टाटा क्रुसिबल कॅम्पस क्विझ २०२० च्या पुणे क्षेत्रीय फेरीत पुण्याच्या सिम्बॉयसिस सेंटर फॉर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे (एससीआयटी) दिगंत बाकरी आणि अखिल अशोक यांनी विजेतेपद पटकावले आहे.

 बालाजी इन्स्टिट्यूट ऑफ मॉडर्न मॅनेजमेंट, पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या शहर स्तरीय अंतिम फेरीत एकूण २६२ संघांनी भाग घेतला होता.  भाग्यशाली विजेते दिगंत बाकरी आणि अखिल अशोक यांना ७५,०००* रुपयांच्या रोख पुरस्काराने गौरवण्यात आले.  तसेच त्यांना राष्ट्रीय अंतिम फेरीत भाग घेण्यासाठी पात्र ठरण्यासाठी झोनल फेरीत सहभागी होण्याचीही संधी मिळणार आहे.  पुण्याच्या कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्रजोत विरेश पाटणे आणि अथर्व अभय सोमण यांनी उपविजेतेपद जिंकले असून त्यांना ३५,०००* रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले.  टीएमटीसी ग्रुप ऑफ ह्यूमन रिसोर्सेसचे डायरेक्टर श्री. इम्यॅन्युएल डेविड हे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

 

टाटा क्रुसिबल कॅम्पस क्विझची यंदाची संकल्पना इंडस्ट्री ४.०ही आहे.  ख्यातनाम क्विझमास्तर गिरी बालसुब्रमण्यम म्हणजेच पिकब्रेनयांनी आपल्या अनोख्या, कौशल्यपूर्ण शैलीत स्पर्धेचे सूत्रसंचालन केले. 

 

भारतातील सर्वात मोठी कॅम्पस क्विझ म्हणून नावाजल्या जाणाऱ्या टाटा क्रुसिबल कॅम्पस क्विझचे हे सोळावे वर्ष असून दोन महिन्यात तब्बल ४० शहरांमध्ये तिचे आयोजन केले जाणार आहे.  त्यानंतर देशभरात पाच झोनल फेऱ्या होतील व सर्वात शेवटी मुंबईत महाअंतिम फेरी पार पडेल.  टाटा क्रुसिबल कॅम्पस क्विझच्या राष्ट्रीय विजेत्या संघाला ५ लाख* रुपयांचे रोख बक्षीस व प्रतिष्ठेची टाटा क्रुसिबल ट्रॉफी देऊन गौरविण्यात येईल. 

 

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

महापौर मंजुषा नागपुरे यांच्या पुढाकाराने सफाई कामगाराच्या मुलीच्या उपचाराचा मार्ग मोकळा

पुणे :पुणे महानगरपालिका अंतर्गत वानवडी क्षेत्रीय कार्यालयातील गोसावी आरोग्य...

378 वा बीज सोहळा:तुकोबांच्या नामगजराने देहूनगरी दुमदुमली

पुणे-जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नामगजराने गुरुवारी देहूनगरी दुमदुमली....

अजित पवार मृत्युप्रकरणी व्हीएसआर कंपनी मालकाची सीआयडीकडून 8 तास चौकशी:अपघाती मृत्यू, हलगर्जीपणा की घातपात ?

पुणे -दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक मृत्यू प्रकरणात...

“चालू” ठेकेदारांना जोरदार झटका: स्थायी समितीचे नवे धोरण

''महापालिकेकडून केली जाणारी कामे दर्जेदार झाली पाहिजेत. पण खूप...