राफाएलतर्फे केआरएएसला 100 दशलक्ष डॉलर्सचे कंत्राट

Date:

भारतीय सैन्य आणि हवाई दलास 1000 बराक- 8 एमआरएसएएम मिसाइल्स किट्स पुरवण्यासाठी कंत्राट

हैद्राबाद – आज सकाळी झालेल्या समारंभात राफाएल कार्यकारी उपाध्यक्ष आणि हवाई व क्षेपणास्त्र संरक्षक यंत्रणा विभागाचे व्यवस्थापक, ब्रिगेडियर जनरल (निवृत्त) पिनी यंगमन यांनी कल्याणी राफाएल अडव्हान्स्ड सिस्टीम्स लि., इंडियाला (केआरएएस) 1000 बराक- 8 एमआरएसएएम मिसाइल्स किट्सचे उत्पादन करण्याचे 100 दशलक्ष डॉलर्सचे कंत्राट दिले असून ते बीडीएलला आणखी घटक समाविष्ट करण्यासाठी पुरवले जाणार आहेत. केआरएएस ही राफाएल अडव्हान्स्ड सिस्टीम्स आणि कल्याणी स्ट्रेटेजिक सिस्टीम्स लि. यांच्यातील 49 : 51 गुणोत्तरानुसार संयुक्त भागीदार असून भारतीय भागिदाराचा त्यातील वाटा 51 टक्के आहे. मेक इन इंडियाशी असलेली बांधिलकी जपत संयुक्त भागिदारांनी सर्वोत्तम उत्पादन सुविधा, अत्याधुनिक अभियांत्रिकी सेवा आणि विस्तारित लाइफ सायकल सपोर्ट (एमआरओ) सिस्टीम्समध्ये भारतीय संरक्षण दलास पुरवण्यासाठी गुंतवणूक केली आहे. केआरएएस 2023 पर्यंत आपली कर्मचारी संख्या वाढवून 300 टेक्निकल तंत्रज्ञांपर्यंत नेण्याची अपेक्षा आहे.

राफाएल अडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टीम्सला भारताच्या संरक्षण क्षेत्राशी सहकार्याचा समृद्ध इतिहास लाभला असून त्यातूनच विविध संयुक्त भागिदारी, उपकंपन्या तसेच माहितीचे फलदायी आदानप्रदान उदयास आले आहे. गेल्या दोन दशकांत झालेल्या या भागिदारींद्वारे राफाएलने भारतात आपल्या मेक इन इंडिया उपक्रमाच्या माध्यमातून 250 दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.

या समारंभात ब्रिगेडियर (निवृत्त) पिनी यंगमन यांनी भारतीय सैन्य आणि भारतीय हवाई दल (आयएएफ) यांच्या कामकाजासाठी आवश्यक तयारी करून देण्यावर जोर दिला. ते म्हणाले, ‘केआरएएस तसेच मेक इन इंडिया उपक्रमात आम्ही बजावत असलेल्या भूमिकेचा आणि भारताच्या संरक्षण उद्योगातील दमदार गुणवत्तेशी असलेल्या नात्याचा राफाएलमध्ये आम्हा सर्वांना अभिमान वाटतो. या प्रकल्पाची सांगता होत असताना यापुढेही केआरएएस तसेच बीडीएलसारख्या भारतातील इतर भागिदारांबरोबर आणखी विक्रमी टप्पे साजरे करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.’

भारताचे जागतिकीकरण करण्यात आणि मेक इन इंडिया उपक्रमाला जागतिक ब्रँड बनवण्यात कल्याणी समूहाने कायमच आघाडीची भूमिका बजावली आहे. आपल्या संरक्षण व्यवसाय उद्योगातही समूहाने याच तत्वज्ञानाचे अनुकरण केले असून डीआरडीओ तसेच डीपीएसयू या संयुक्त भागिदारांबरोबर यशस्वी संबंध जोडलेले आहेत.

याप्रसंगी कल्याणी समूहाचे अध्यक्ष बाबा कल्याणी म्हणाले, ‘हे कंत्राट आपल्या देशात अस्तित्वात असलेल्या क्षमतांची आणि त्यांचा मेक इन इंडियाचे ध्येय खऱ्या अर्थाने साकार करण्यासाठी कशाप्रकारे वापर होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण आहे. कल्याणी समूहाला या कामगिरीचा आणि राफाएलसोबत असलेल्या नात्याचा अभिमान वाटतो. याचप्रकारे आम्ही आणखी कंत्राटांचीही अंमलबजावणी करू असा विश्वास आहे.’

कल्याणी समूहाबद्दल

कल्याणी समूह हा भारतीय बहुराष्ट्रीय समूह असून तो अभियांत्रिकी स्टील, वाहनउद्योग, औद्यिजकता, अक्षय उर्जा, संरक्षण, शहरी पायाभूत सुविधा आणि विशेष रसायने अशा महत्त्वाच्या क्षेत्रात उच्च तंत्रज्ञान, अभियांत्रिकी व उत्पादन क्षमतांसह कार्यरत आहे.

कल्याणी स्ट्रेटजिक सिस्टीम्स लि. (केएसएसएल) ही कल्याणी समूहातील प्रमुख कंपनी असून ती संरक्षण आणि विमानवाहतूक क्षेत्रातील उपक्रम हाती घेणारी आहे. कर्नल आर भाटिया या प्रसंगी म्हणाले, की केएसएसएलचे भारतीय संरक्षण उद्योगाला विविध सुटे भाग आणि उपयंत्रणांची पुरवठा करणारी पारंपरिक पुरवठादार ते संपूर्ण यंत्रणेचा पुरवठा करणाऱ्या पुरवठादार कंपनीमध्ये रुपांतर झाले आहे. पर्यायाने कंपनीने जगातील आघाडीची संरक्षण पुरवठादार कंपनी बनण्याच्या उद्दिष्टाप्रती समर्पित आणि केंद्रित दृष्टीकोन ठेवला आहे.

 

राफाएल अडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टीम्स लि.

70 वर्षांचा वारसा लाभलेली राफाएल अडव्हान्स्ड डिफेन्स सिस्टीम्स लि. इस्त्राएली संरक्षक दलासाठी अवकाश, जमीन, समुद्र आणि अंतराळात वापरता येण्याजोग्या अत्याधुनिक संरक्षण यंत्रणांच्या विस्तारित श्रेणीचे डिझाइन, विकास, उत्पादन आणि पुरवठा करते तसेच भारतीय संरक्षक दलांसाठी आणि भारतातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये निर्यात करण्यासाठी मेक इन इंडिया उत्पादने बनवण्यासाठी बांधील आहे.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...

“एच.डी.मांजरेकर उत्कृष्ट एन.सी.सी कॅडेट ट्रॉफी” वितरण कार्यक्रम संपन्न

मेजर एच.डी. मांजरेकरउत्कृष्ट एन.सी.सी.कॅडेट ट्रॉफी वितरणरक्तदान शिबिराचे आयोजन६१ रक्तदात्यांनी...

देशभक्तीपूर्ण वातावरणात ६४ वा गोवा मुक्ती दिन साजरा; मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून राष्ट्रध्वजारोहण

‘ऑपरेशन विजय’, पिंटो व कुंकळ्ळी उठावांचा मुख्यमंत्र्यांकडून उल्लेख; पोलीस,...