नवी दिल्ली-येथे 26 सप्टेंबर 2018 रोजी झालेल्या, ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या (एआयएमए) 45व्या नॅशनल मॅनेजमेंट कन्व्हेन्शनमध्ये भारत फोर्जला गौरवण्यात आले. एआयएमए पुरस्कार नवे बेंचमार्क निर्माण करून उद्योगामध्ये मूलभूत बदल आणणाऱ्या व इतरांसाठी अनुकरणी कार्य करणाऱ्या उल्लेखनीय व्यक्तींची दखल घेतात.
2010 मध्ये सुरुवात झाल्यापासून, या पुरस्काराने भारतातील उद्योग, मीडिया, क्रीडा व मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत, एआयएमए मॅनेजिंग इंडिया अॅवॉर्ड्स देशातील सर्वात प्रतिष्ठेचे पुरस्कार म्हणून लोकप्रिय झाले आहेत.
भारत फोर्ज लिमिटेडविषयी
भारत फोर्ज लिमिटेड (बीएफएल) ही 3 अब्ज डॉलर उलाढालीच्या कल्याणी समूहाची प्रमुख कंपनी आहे व ऑटोमोटिव्ह, रेल्वे, ऊर्जा, संरक्षण, बांधकाम व खाणकाम, तेल व वायू यासहित विविध औद्योगिक क्षेत्रांना अतिशय चांगली कामगिरी, नाविन्य, सुरक्षा व महत्त्वाचे भाग आणि सोल्यूशन यांचा जागतिक पुरवठादार आहे. आज बीएफएल या प्रदेशातील मेटॅलर्जिकल ज्ञानाचे सर्वात मोठे भांडार आहे आणि कंपनी भौगोलिकदृष्ट्या विखुरलेल्या परदेशी ग्राहकांना संकल्पनेपासून उत्पादनाचे डिझाइन, इंजिनीअरिंग, उत्पादन, चाचणी आणि व्हॅलिडेशनपर्यंत परिपूर्ण सेवा देते. उल्लेखनीय प्रगती व भांडवली वस्तू व पायाभूत सुविधा क्षेत्रांमध्ये आक्रमकपणे प्रवेश करून एक इंजिनीअरिंग समूह म्हणून साधलेले परिवर्तन, यामुळे बीएफएल एक जागतिक आर्थिक सत्ता यामध्ये भारताचे परिवर्तन झपाट्याने करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनविषयी
ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशन ही भारतातील मॅनेजमेंट पेशाची सर्वोच्च राष्ट्रीय संघटना आहे आणि आपल्या विविध उपक्रमांद्वारे ती मॅनेजमेंट पेशाच्या कार्यक्षमता वाढवण्यासाठी कार्यरत आहे. संघटनेकडे परदेशात दोन एलएमए आहेत व 67 स्थानिक मॅनेजमेंच असोसिएशनद्वारे 30000 हून अधिक सदस्य आहेत. एआयएमए ही नॉन-लॉबिंग बॉडी आहे आणि आधुनिक व महत्त्वाच्या व्यवस्थापन पद्धती व तंत्रे लोकप्रिय करण्यासाठी सहसा जगातील सर्वोत्तम प्रोफेशनल संघटना व संस्थांबरोबर काम करते. नॅशनल मॅनेजमेंट कन्व्हेन्शन हा एआयएमएचा प्रमुख वार्षिक कार्यक्रम असून, त्याचा भर प्रामुख्याने राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर असतो. त्यामध्ये विविध क्षेत्रांतील विचारवंत, मुख्य कार्यकारी अधिकारी व मंत्री यांसह विविध वक्ते व्याख्याने देतात.