Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0
Advt.

.

0

भारतातील बहुराष्ट्रीय समूह बीकेटी व क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे केएफसी बीबीएल यांच्यामध्ये 2018-2021 या तीन वर्षांच्या कालावधीसाठी भागीदारी करार

Date:

मेलबर्न – भारतातील बहुराष्ट्रीय समूह बाळकृष्ण इंडस्ट्रीज लि. (बीकेटी) हा केएफसी बिग बॅश लीगशी (बीबीएल) भागीदारी करणारा पहिली उपखंडीय समूह ठरला असून, नवा ऑफ-हायवे टायर पुरवठादार म्हणून तीन वर्षांसाठी आज करार करण्यात आला.

जवळजवळ दशकभर बीकेटी टायर्स ऑस्ट्रेलियातील ट्रेडफेअर या वितरकाद्वारे ऑस्ट्रेलियामध्ये उपलब्ध आहेत आणि शेतकऱ्यांना व खाणकाम क्षेत्राला मोठ्या प्रमाणात टायर पुरवत आहेत.

आजच्या बीबीएल घोषणेचा भाग म्हणून, ऑस्ट्रेलियातील देणग्यांना व विशेषतः संघर्ष करत असलेल्या शेतकरी वर्गाला मदत देण्यासाठी बीकेटी व ट्रेडफेअर यांनी एकूण 30,000 डॉलरचा धनादेश सुपुर्त केला. न्यू साउथ वेल्समधील गन्नेदाहमधील ऑसी हेल्पर्स या संघर्ष करणाऱ्या शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या चॅरिटीला 20,000 डॉलर रकमेचा धनादेश देण्यात आला, तर टॅमवर्थ येथील रोनाल्ड मॅकडॉनल्ड हाउसला 10,000 डॉलर रकमेचा धनादेश देण्यात आला.

भागीदारीची आजची घोषणा एमसीजी या ऑस्ट्रेलियन क्रिकेटच्या गृही करण्यात आली. या वेळी, ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध क्रिकेटपटू रिकी पाँटिंग, बीकेटीचे संयुक्त संचालक राजीव पोद्दार यांसह भारतातील अन्य अधिकारी, क्रिकेट ऑस्ट्रेलिया बिग बॅश लीग प्रमुख किम मॅककॉनी व भारताचे मेलबर्नमधील अॅक्टिंग कौन्सुल जनरल हरी प्रसाद हे उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोकप्रिय भारतीय अभिनेत्री, फॅशन डिझाइनर व टेलिव्हिजन प्रेझेंटर मंदिरा बेदी यांनी केले.

बीकेटी समूहाला क्रिकेटबद्दल असलेली आवड व उत्साह आणि बीकेटीच्या “ग्रोइंग टुगेदर” विचारसरणीशी जुळणारे बीबीएलचे विचार यामुळे बीबीएलशी भागीदारी करण्याच्या बीकेटीच्या निर्णायाला उत्तेजन मिळाले. विशेषतः या भागीदारीच्या बाबतीत, एकत्र प्रगती करणे म्हणजे, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी प्रगती करणे व आकृष्ट करणे या दृष्टीने ऑस्ट्रेलियातील क्रिकेटला पाठिंबा देणे व जतन करणे – जगभरातील 160 देशांत विस्तारलेल्या बीकेटीच्या कार्याचे भरपूर आभार.

क्रिकेटचे चाहते राजीव पोद्दार यांनी सांगितले: “मी क्रिकेटचा मोठा चाहता असल्याने या भागीदारीमुळे खरेच आनंद होत आहे. क्रिकेटला पाठिंबा देणे प्रोत्साहन देणे शक्य होत असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. या खेळाची गतीशीलता भावणारी आहेच, परंतु त्यासाठी गरजेचा असलेला संपूर्ण संघाचा खेळ त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे, आवश्यक असलेली सांघिक भावना, किंवा प्रत्येक खेळाडू दर्शवत असलेला अलिखित उत्तम खेळ यांचे महत्त्व अधिक आहे. उलट, चुकीचे खेळणे म्हणजे या खेळाचेच नुकसान असते. बीकेटीमध्येही आम्ही हीच विचारसरणी अंगिकारतो: प्रत्येकाचा यथोचित आदर करून आपले काम चोख करणे.”

किम मॅककॉनी म्हणाल्या: मोठ्या प्रतीक्षेत असलेल्या बीबीएल|08 चे वेध लागलेले असताना, केएफसी बिग बॅश लीगचा भागीदार बीकेटीचे स्वागत आहे. ही स्पर्धा केवळ ऑस्ट्रेलियातच नाही, तर परदेशातही लोकप्रिय होत असल्याचे बीबीएलचा पुरवठादार बनण्याच्या बीकेटीच्या निर्णयातून दिसून येते. तसेच, ऑस्ट्रेलियातील सर्वात लोकप्रिय क्रीडा लीगशी जोडले जाण्याचे भागीदारांच्या दृष्टीने असलेले मूल्यही स्पष्ट होते.

ट्रेडफेअरचे जनरल मॅनेजर स्टीव्ह रायन यांनी सांगितले: हा करार अतिशय मोलाचा अभूतपूर्व आहे. ऑस्ट्रेलियाचे क्रिकेटविषयीचे प्रेम कालातीत आहे. उन्हाळ्याच्या हंगामात सर्व उद्याने क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी युवकांनी फुलून जातात, तर त्यांचे पालक बाजूला बसून मुलांचा खेळ पाहत असतात.

 वीकेण्डला आखला जाणारा कुटुंबाचा बेत मागच्या उद्यानात क्रिकेटचा सामना खेळल्याशिवाय किंवा बिचवर बिच क्रिकेट खेळल्याशिवाय पूर्णच होत नाही. ग्रामीण भाग असो किंवा मोठी शहरे, ऑस्ट्रेलियातील सर्व नागरिकांमध्ये एक आवड सामायिक आहे, ती म्हणजे क्रिकेट. हा विषय संपूर्ण देशाला प्रोत्साहन देतो आणि थरार निर्माण करतो.

 सामने सुरू असताना मोठमोठ्या उत्साहाने चर्चा सुरू असल्याचे ऐकायला बघायला मिळू शकते. केएफसी बिग बॅश लीगच्या पाठिशी राहिल्याने, लीगच्या नावाशी उपक्रमांशी जोडलेले असल्याने आणि प्रामुख्याने टीव्हीसह अन्य माध्यमांनी मोठ्या प्रमाणात प्रकाशझोत टाकल्याने ऑस्ट्रेलियामध्ये बीकेटीची प्रचंड प्रसिद्धी होण्यासाठी निश्चितच मदत होणार आहे”.

 बीकेटीने जगभरातील आंतरराष्ट्रीय खेळांना दिलेल्या प्रायोजकत्वाच्या पार्श्वभीमीवर बीकेटीने बीबीएलशी केलेली भागीदारी बेतलेली आहे. यामध्ये सन 2013 मध्ये माँस्टर जॅम सर्किट या अमेरिकेतील लाइव्ह मोटरस्पोर्ट इव्हेंटशी करण्यात आलेल्या कराराचा समावेश आहे. त्यामध्ये, बीकेटीचे टायर असलेल्या भव्य ट्रकनी स्टंट केले होते. तसेच, इटलीतील लेगा नाझनेल प्रोफेशनीस्ती बी या बी फूटबॉल सीरिजच्या प्राशसकीय संघटनेशी आता “सेरी बीकेटी” नावाने ओळखल्या जाणाऱ्या सेकंड डिव्हिजन चॅम्पिअनशिपच्या प्रायोजकतेसाठी, तसेच ला लीग दे फूटबल प्रोफेशनेल या प्रोफेशनल फ्रेंच फूटबॉलच्या प्रशासकीय संघटनेशी, आता कप दे ला लीग बीकेटी नावाने ओळखल्या जाणाऱ्या लिगच्या नॅशनल कपच्या प्रायोजकत्वासाठी नुकताच करार करण्यात आला.

 बीकेटी आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्यातील करारावर हॅवस अँड एन्टरटेन्मेंट (हॅवस एसई) या ब्रँड व चाहते यांचे नाते विकसित करण्याच्या हेतूने प्रभावी मार्केटिंग धोरण राबवण्यासाठी क्रीडा व मनोरंजन उद्योगांमध्ये कार्यरत असलेल्या हॅवस मीडिया ग्रूपच्या स्पेशलिस्ट टीमची स्वाक्षरी आहे. हॅवस एसईची इटलीची टीम बीकेटीची क्रीडा प्रायोजकत्वाची निवड, वाटाघाटी व अॅक्टिवेशन यासाठीची जागतिक सल्लागार आहे.

बीकेटीविषयी:

बाळकृष्ण इंडस्ट्रीज लि. (बीकेटी) ही भारतातील टायर उत्पादक आहे. बीकेटी समूहाने शेती, औद्योगिक, अर्थमूव्हिंग, खाणकाम, एटीव्ही गार्डनिंग या क्षेत्रांसाठी नेहमी मोठ्या प्रमाणातील ऑफहायवे टायर्स उत्पादने उपलब्ध केली आहेत नेहमी त्यात आवश्यक बदल केले आहेत. वैविध्यपूर्ण युजरच्या निरनिराळ्या गरजांसाठी तयार केलेल्या नावीन्यपूर्ण उत्पादनांमध्ये जगभरातील 160 देशांत विक्री केल्या जाणाऱ्या 2,400 उत्पादनांचा समावेश आहे.

ट्रेडफेअरविषयी:

ट्रेडफेअर इंटरनॅशनलची (टीएफआय) सुरुवात एक लहान व्यवसाय म्हणून झाली आणि गेल्या 25 वर्षांत या व्यवसायाचे रूपांतर ऑस्ट्रेलियातील एक प्रमुख ऑफहायवे टायर पुरवठादारामध्ये झाले आहे. 1992 मध्ये स्थापना झाल्यापासून, टीएफआयने बाजारातील विविध श्रेणींच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कार्य सेवा यांचा विस्तार केला आहे. यामध्ये शेती, फॉरेस्ट्री, खाणकाम, बांधकाम मटेरिअल हँडलिंग यांचा समावेश आहे. सुरुवातीला मेलबर्न व्हिक्टोरिया येथे असलेल्या टीएफआयने झपाट्याने प्रगती केली आहे आणि ऑस्ट्रेलियातील सर्व राज्यांमध्ये शाखा सुरू करून, राष्ट्रीय वितरण जाळे निर्माण केले आहे. टीएफआयने ऑस्ट्रेलियाच्या बाहेरही विस्तार केला आहे आणि लवकरच न्यूझीलंड येथे शाखा सुरू केली जाणार आहे. टीएफआय बीकेटी यांची भागीदारी फार जुनी, गेल्या 20 वर्षांपासून आहे त्यांचे उद्दिष्टही एकच आहे, ते म्हणजे युजरच्या गरजा व्यवस्थितरित्या समजून घेण्यासाठी त्यांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी त्यांना यथाशक्ती मदत करणे.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाविषयी:

क्रिकेट ऑस्ट्रेलिया ही ऑस्ट्रेलियातील खेळासाठी राष्ट्रीय प्रशासकीय संघटना आहे. ही संघटना सहा राज्य क्रिकेट संघटना, आपल्या सदस्यांद्वारे स्थानिक राज्य स्तरांवरील क्रिकेटना एकमेकांशी जोडते. दोन टेरिटरी असोसिएश सहयोगी सदस्य आहेत.क्रिकेट हा ऑस्ट्रेलियातील सर्वात लोकप्रिय आवडीचा ऑस्ट्रेलियातील सर्वांसाठीचा खेळ ठरावा, हे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे उद्दिष्ट आहे. क्रिकेट आवडावे, यासाठी प्रत्येकाला उत्तेजन देण्याचा हेतू आहे

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

राज्य जीएसटी अधिकाऱ्यांचे विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन.

पुणे- राज्य जीएसटी अधिकाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून आपल्या...

“ज्या स्त्रीच्या वेदनेवरून कायदे बदलले, तिला समाजाने न्याय दिलाच पाहिजे” — डॉ. नीलम गोऱ्हे

नागपूर, दि. ११ डिसेंबर २०२५ :चंद्रपूर जिल्ह्यातील नवरगाव येथे...

“महिलांनी स्वतःची ओळख निर्माण करा; शासन तुमच्या पाठीशी आहे— डॉ. नीलम गोऱ्हे”

चंद्रपूर, दि. ११ : नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू असताना...

जलसंधारण खात्याचा आकृतीबंध न उठल्यास संजय राठोडांना छत्रपती संभाजीनगरात प्रवेशबंदी!

वाल्मी येथील रोजगार सत्याग्रहात काँग्रेसचा इशारा छत्रपती संभाजीनगर :राज्यातील लाखो...