मुंबई : थॉमस कुक (इंडिया) लिमिटेड, या भाराततील प्रवास आणि प्रवासासंबंधित वित्तीय सेवा देणाऱ्या आघाडीच्या कंपनीने, पुण्यात आपली उपस्थिती अधिक बळकट करण्यासाठी, दोन नव्या फ्रँचाइजी “गोल्ड सर्कल पार्टनर”ला सुरुवात केली आहे, विमान नगर आणि कोथरुड येथील फ्रँचाइजींचे थॉमस कुक (इंडिया) लिमिटेडच्या लेझर ट्रॅव्हलचे ज्येष्ठ उपाध्यक्ष श्री. रोमील पंत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या विस्तारामुळे थॉमस कुक इंडियाच्या वितरणात वाढ होणार आहे आणि पुण्यातील 6 ग्राहक केंद्रांपर्यंत पोहोच वाढणार आहे : यात 2 स्वमालकीच्या शाखा आणि 4 गोल्ड सर्कल पार्टनर (फ्रँचाइजी) आउटलेटचा समावेश आहे.
थॉमस कुक इंडियाच्या माहितीत, पुण्यातील उच्चतम क्षमता असेलल्या स्रोत बाजारांसह लहान कॅचमेंट एरिया सहलींच्या व्यवसायासाठी अधोरेखित करण्यात आला आहे. संधी घेण्यासाठी कंपनीने विमाननगर आणि कोथरूड येथे गोल्ड सर्कल पार्टनर फ्रँचाइजी आउटलेट सादर करण्यात/निवडण्यात आले आहेत.
थॉमस कुक गोल्ड सर्कल पार्टनर उपक्रम हा विशेष फ्रँचाइजी पार्टनर उपक्रम असून, देशभरातील ब्रँडची उपस्थिती वाढावी, यासाठी सादर करण्यात आलेला आहे, यामुळे कंपनीची उत्पादने आणि सेवा प्रमुख शहरे/निमशहरांतील ग्राहकांपर्यंत पोचवता येणार आहेत आणि द्वितीय व तृतीय श्रेणीतील बाजारपेठांमध्येही त्याचा विस्तार करता येणार आहे. गोल्ड सर्कल पार्टनरचे लाभ. भारतातील अग्रणीच्या प्रवासी कंपनीबरोबर संलग्नित राहिल्याने मिळणार आहेत, याबरोबरच पर्यटन व्यवसाय व्यवस्थापित करण्यासाठी तज्ज्ञांकडून अनुभवांची देवाण-घेणाण करता येणार आहे, व प्रशिक्षणही मिळणार आहे. याशिवाय गोल्ड सर्कल पार्टनरला विक्री आणि मार्केटिंग पाठिंबाही मिळत आहे, यामुळे नवीन व्यवसायाचा विकास आणि संपादन व जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोचण्याचा प्रयत्न शक्य होणार आहे.
विमाननगर आणि कोथरूडमधील नवीन गोल्ड सर्कल पार्टनर आउटलेट ग्राहकांसाठी पर्यटनाच्या उपाययोजना सादर करते, यामध्ये पर्यटनाचे विविध पर्याय आणि पर्यटनाशी संबंधित वित्तीय सेवा पुढील प्रमाणे आहेत:
- आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक सहली (ग्रूप प्रवास, एफआयटी वैयक्तिक सहली, क्रूज, रेल…)
- प्रवास विमा
- परकीय चलन, प्री-पेड फोरेक्स कार्ड, रेमिटन्स सेवा