नगरसेवक उमेश गायकवाड आणि रेसेक्यू चॅरिटेबल ट्रस्टचा उपक्रम
पुणे- कोरोनाशी शासन ,महापालिका आपापल्या स्तरावर लढा देत असताना कोरेगाव पार्क घोरपडी परिसरातील नगरसेवक उमेश गायकवाड यांनी आपल्या प्रभागात कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था आणि नागरिकांच्या मदतीने गरजूंना अन्न पुरविण्याचा उपक्रम विविध मार्गे सुरु ठेवला आहे याचाच भाग म्हणून त्यांनी रस्त्यावरची मोकाट जनावरे देखील उपाशी राहू नयेत म्हणून १ लक्ष रुपये चे १००० किलो फिडेल चिकन सॅसेज हे खरेदी केले आहे जे रेसक्यू चॅरिटेबल ट्रस्टचा मदतीने२४ स्वयंसेवकांमार्फत रस्त्यावरील प्राण्यांपर्यंत पोहोचविले जाते आहे.
नगरसेवक गायकवाड यांनी या प्रकरणी सांगितले कि, लॉक डाऊन मुळे निर्माण झालेल्या कठीण परिस्थितीत जेव्हा माणसांना अन्न टंचाई भासत आहे त्यावेळी आपल्या प्रभागातील १०,००० कुटुंबांना रेशन पुरवले आहे आणि पुरवत आहेत, प्रभागातील प्रत्येक गरजू घरात रेशन तर पुरवलेच एवढं नव्हे तर प्रभागातील रस्त्यांवरील मुक्या प्राण्यांसाठी (कुत्रे – मांजर) अन्न पुरवण्याचा संकल्प केला आहे. पुणे शहरातील ते एकमेव असे नगरसेवक असतील ज्यांनी हे चालू केले आहे. असे रेसेक्यू ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आले.
नगरसेवक उमेश गायकवाड मित्र परिवारातर्फे १ लक्ष रुपये चे १००० किलो फिडेल चिकन सॅसेज रेसक्यू चॅरिटेबल ट्रस्टचा मदतीने खरेदी केले असून, २४ स्वयंसेवकां मार्फत ते विभागणी करून ते दिले जाणार आहे. रेसक्यू चॅरिटेबल ट्रस्टच्या संस्थापक नेहा पंचमीया मॅडम, मंजिरी पटवर्धन मॅडम तसेच खोडू इराणी आज उपस्थित होते.रेसक्यू चॅरिटेबल ट्रस्ट यांचा सहकार्याने ते विविध भागात पुरवले जाणार आहे.
बोट क्लब रोड, रुबी हॉल परिसर, नेलोर रोड, कोरेगाव पार्क मधील सर्व लेन, नॉर्थ मेन रोड, वेस्टीन हॉटेल पासून ताडी-गुत्ता चौक, पिंगळे वस्ती, शिर्के कंपनी रोड, बी. टी कवडे रोड, घोरपडी परिसरामध्ये पुरवले जाणार आहे.

