‘ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यामध्ये विलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल पुणे यांनी २ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी समारंभपुर्वक नवीन शाळेच्या माहितीपत्रकाचे अनावरण केले आणि विलिंग्टन कॉलेजच्या वैशिष्ट्यांची ओळख करून दिली.
पुणे: विलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल पुणे (डबल्यू.सी.आय.पी.), विलिंग्टन कॉलेज यू के. चे एक भागीदार, यांनी २ नोव्हेंबर ला सायंकाळी विलिंग्टन कॉलेजच्या भारतातील प्रवासाच्या सुरुवातीची नोंद घेण्यासाठी एक शानदार समारंभ आयोजित केला. या समारंभात विलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल पुणे या शाळेच्या माहितीपत्रकाचे अनावरण केले गेले. यावेळी युनिसन ग्रुप, जे डबल्यू.सी.आय.पी चे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी या कामात सहभागी झाले आहेत आणि विलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनलचे वरिष्ठ मान्यवर उपस्थित होते. विलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल चे वरिष्ठ आंतरराष्ट्रीय संचालक श्री. स्कॉट ब्रायन, शिक्षण संचालिका (प्राथमिक आणि इ वाय एफ एस) श्रीमती फियोना कार्टर, विलिंग्टन कॉलेज सर्विसेस लिमिटेड आणि ग्रुप इस्टेट चे खजीनदार श्री. एडविन वाय, विलिंग्टन कॉलेज, भारतचे सहसंस्थापक श्री. अनुज अग्रवाल आणि विलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल पुणे चे मुख्य संस्थापक (फाऊंडिंग मास्टर) डॉ. मरे टोड यावेळी तेथे होते. प्रेक्षकांना या वेळेस विलिंग्टन कॉलेज आणि युनिसन ग्रुपच्या अग्रगण्य व्यक्तींचे अभ्यासपूर्ण विचार ऐकण्याची संधी मिळाली.

भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा दाखविणारे मोहक असे इंडोवेस्टर्न फ्यूजन नृत्य शिनजिनि कुलकर्णी यांनी सादर केले.
विलिंग्टन कॉलेज यू. के. चे ध्येय भारताच्या शैक्षणिक बाजारपेठेमध्ये अधिक उंची गाठण्याचे आणि गतिमानपणे बदलणाऱ्या उद्योग संधींचा फायदा घेण्यात विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी त्यांना भारतीय बालवाडी ते बारावी शिक्षण पद्धतीमधून कौशल्य आधारित शिक्षण देणे आणि अशा शैक्षणिक पद्धतीला प्रोत्साहित करणे हे आहे. विलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल पुणे ही वय वर्ष दोन ते अठरा या वयोगटासाठी मुले व मुली यांचे सहशिक्षण देणारी दिवसीय शाळा असेल. पुरस्कार विजेते ब्रिटिश वास्तू विशारद मिका जोन्स यांनी या शाळेच्या आवाराची रचना बनविली आहे.
ही शाळा आय बी डिप्लोमा अभ्यासक्रमामध्ये महत्त्वाचे मानले जाणारे इंग्लिश नॅशनल अभ्यासक्रमचे अनुसरण करेल; ज्यासाठी विलिंग्टन कॉलेज हे जागतिक पातळीवरील अग्रगण्य शैक्षणिक संस्थांपैकी एक मानले जाते. विलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल पुणे हे ‘ऑक्सफोर्ड ऑफ द ईस्ट’ म्हणून नावाजलेल्या
पुण्यामध्ये सुरू होत असून त्यासाठी विस्तृत आणि पर्यावरणपुरक शालेय आवार बनविले जात आहे. डब्ल्यू. सी. आय. पी. क्रीडा संगीत आणि कला या क्षेत्रांमध्येही अतुलनीय सुविधा पुरविणार आहे. त्यांनी भविष्यात पूर्ण बोर्डिंग शाळांसकट अजून बऱ्याच शाळा चालू करण्याचे योजले आहे.

विलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल पुणे चे सह संस्थापक श्री. अनुज अग्रवाल यावेळी म्हणाले की, “ आम्ही पुण्यामध्ये विलिंग्टन कॉलेजच्या या भव्य प्रारंभाने खूप आनंदित व उत्साहित आहोत आणि बालवाडी ते बारावीच्या या शैक्षणिक विभागाला अत्त्यूत्तम शिक्षण पुरविणे हे आमचे ध्येय आहे. एन. इ. पी. २०२० चे सिद्धांत पायाभूत मानून विलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल पुणे उत्तम सुविधांसह विद्यार्थ्यांचे संगोपन करण्यास सुसज्ज आहे. प्रायोगिक शिक्षण पुरविण्यापासून ते विद्यार्थ्यांना त्यांची आवड ओळखून ती जपायला शिकविण्यापर्यंत , आंतरराष्ट्रीय शैक्षणिक देवाणघेवाण कार्यक्रमांपासून ते विद्यार्थ्यांच्या सामाजिक व भावनिक गरजांची पूर्तता करण्यापर्यंत असे सर्व निकष आम्ही या शाळेत देऊ जेणेकरून पालक त्यांचे मूल पुढे भविष्यात मोठा लीडर होऊ शकेल अशा पूर्ण विश्वासाने मुलांना शाळेत पाठवतील.”
विलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल पुणे चे फाऊंडिंग मास्टर श्री. मरे टोड म्हणाले की, “विलिंग्टन कॉलेजच्या इतिहासातील या नवीन परकरचा एक भाग होताना मी रोमांचित झालो आहे.
भारतात येणे हे आमच्यासाठी एक स्वप्न होते आणि आम्ही आशा करतो की, आम्ही भारतीय शालेय शिक्षणास दोन्ही जगातील सर्वोत्तम देऊ, बालवाडी ते बारावीसाठी सर्वोत्तम अध्यापन प्रक्रिया आणि कार्यपद्धती पुढे आणू आणि सकारात्मक व दीर्घकाळ टिकणारा प्रभाव पाडू. पुण्यासारख्या अनोख्या शहरात राहणे हे अत्यंत रोमांचकारक आहे आणि आम्ही आता सप्टेंबर २०२३ मध्ये शाळा चालू होण्याची उत्सुकतेने वाट पाहत आहोत.”
जवळपास १७० वर्षांचा इतिहास, राज घराण्याचे संबंध आणि सांस्कृतिक वारसा असलेले विलिंग्टन कॉलेज हे जगातील आय. बी. डी. पी. शाळांमधील एक अग्रगण्य नाव आहे. ब्रिटिश शिक्षण पद्धती आणि भारतीय शिक्षण पद्धती या दोहोंमधील जे सर्वोत्तम आहे ते दोन्ही मिळवून आमची ही पुण्यातील शाखा विलिंग्टन कॉलेजची नैतिक मूल्ये, शाश्वत गुणवत्ता आणि महत्वाकांक्षा निश्चितच जपेल. युनिसन ग्रुप भारतातील पहिले विलिंग्टन कॉलेज स्थापन करणार आहे जे सप्टेंबर २०२३ मध्ये पुण्यामध्ये चालू होईल. शैक्षणिक विचार आणि अभ्यासात ही शाळा आघाडीवर असेल.