‘मिसेस महाराष्ट्र : एम्प्रेस ऑफ महाराष्ट्र २०१९’ सौंदर्य स्पर्धा पुण्यात संपन्न

Date:

पुणे-‘दिवा पेजंट्सचे संचालक कार्ल मस्कारेन्हास व अंजना मस्कारेन्हास यांच्या संकल्पनेतून साकारलेली मिसेस महाराष्ट्र २०१९ या सौंदर्य स्पर्धेची महाअंतिम फेरी पुण्यातील हयात हॉटेलमध्ये नुकतीच दिमाखात संपन्न झाली. या स्पर्धेचे हे सलग चौथे वर्ष असून गेल्या वर्षीच्या स्पर्धेला सर्वोत्तम राज्य-स्तरीय सौंदर्य स्पर्धेचे मानांकन प्राप्त झाले होते. यंदाचा सोहळा त्याहून अधिक शानदार झाला.

अंतिम फेरीसाठी एकूण ५० स्पर्धकांची निवड करण्यात आली होती. त्यांना दिवातर्फे अंजना व कार्ल यांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली परिचय, आवाजातील चढउतार, रंगमंचावरील वावर, प्रश्नोत्तर सत्र अशा कौशल्यांत पारंगत करण्यात आले.

स्पर्धेच्या परीक्षक मंडळातील प्रसिद्ध चित्रपट तारका व नामवंतांमध्ये वर्षा उसगावकर (अभिनेत्री), झोया अफरोज (अभिनेत्री), डॉ. विरल देसाई (केशरोपण तज्ज्ञ), डॉ. सुहानी मेंडोंसा (यलो स्पायडर इव्हेंट्सच्या संचालक), रचना गुप्ता (इंटरनॅशनल दिवा क्वीन), कमल शर्मा (हयात पुणेच्या डीओएसएम) व कार्ल मस्कारेन्हास (दिवाचे संचालक) यांचा समावेश होता. याखेरीज आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अभिनेते गुलशन ग्रोव्हर यांच्या उपस्थितीनेही समारंभाला आगळीच शोभा आली.

सिल्व्हर श्रेणीतील (वयोगट २० ते ३६ वर्षे) विजेते :

–    राधिका जहागीरदार         विजेती

–    डॉ. अमृता कोडिलकर             फर्स्ट रनरअप

–    डॉ. माधवी अंबोरे          सेकंड रनरअप

–    भाग्यश्री कराडे             थर्ड रनरअप

 

गोल्ड श्रेणीतील (वयोगट ३७ ते ५५ वर्षे) :

–    देवयानी हजारे             विजेती

–    अल्पना पारेख             फर्स्ट रनरअप

–    स्वाती ठक्कर                   सेकंड रनरअप

–    रश्मी डाके                थर्ड रनरअप

 

महाअंतिम फेरी पुढील सौंदर्यवतींनाही मुकूट परिधान करण्यात आला

इंटरनॅशनल क्वीन – श्वेता पाटील

इंटरनॅशनल क्वीन – मॉली जोसेफ

इंटरनॅशनल क्वीन – रचना गुप्ता

 

आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सूत्रसंचालक व गायिका दिलरुबा पांडे यांनी सह-सूत्रसंचालक फरहा अन्वर यांच्या साथीने या महासोहळ्याचे सूत्रसंचालन केले.

प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक पूजा सिंग यांनी कार्यक्रमाचे दिग्दर्शन व नृत्य संयोजन केले. त्यांना श्रद्धा रामदास, नेहा चौहान व मृणाली तायडे यांची सुरेख साथ लाभली.

महाराष्ट्र राज्याचा चमकदार सोहळा ठरलेल्या या कार्यक्रमाने उपस्थित असेल्या सर्वांना डेअर*ड्रीम*डॅझल (धाडस करा-स्वप्न पाहा-स्तिमित करा) ही प्रेरणा दिली.

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

काँग्रेसच्या प्रवक्त्याला केलेल्या मारहाणीची खंत नाही:भाजपच्या तुषार दामगुडे यांची स्पष्टोक्ती

मुंबई-भाजप पदाधिकारी तुषार दामगुडे यांनी काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवार...

यश चोपड़ा फाउंडेशन तर्फे ‘साथी 2026’ची घोषणा; कल्याणकारी उपक्रमांचा विस्तार

यश चोपड़ा फाउंडेशन (YCF), ही यश राज फिल्म्स ची सामाजिक...

अजित पवारांच्या विमानाचे 3000 तासांचे रेकॉर्डच नाही: ‘VSR’ कंपनीच्या रेकॉर्डमध्ये हेराफेरी असल्याचा रोहित पवारांचा आरोप

मुंबई-उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनानंतर आता या...