आईटीप्रोफेशनल व्यावसायिक डालिया दत्ता ठरल्या ‘मिसेस इंडिया

Date:

पुणे“माझी सर्वांत मोठी प्रेरणा सुश्मिता सेन आहे. मी लहान असताना वर्ष १९९४ मध्ये सुश्मिताच्या कामगिरीने माझ्याही डोळ्यात सौंदर्य स्पर्धेत मुकूट जिंकण्याच्या, सम्राज्ञीचा बहुमान मिळण्याच्या आणि देशबांधवांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करण्याच्या स्वप्नाचे बीज अंकुरले.”, ही प्रतिक्रिया आहे बंगाली सौंदर्यवती डालिया दत्ता हिची. डालियाला हयात पुणे हॉटेलमध्ये नुकत्याच झालेल्या ‘मिसेस इंडिया – एम्प्रेस ऑफ द नेशन’ या सौंदर्य़ स्पर्धेत सेकंड रनर अप मुकूट प्रदान करुन सन्मानित करण्यात आले. तिने खरोखर आपल्या कामगिरीने प्रेक्षकांची मने जिंकत वाहवा मिळवली.

डालिया म्हणाल्या, “या प्रतिष्ठित सौंदर्य स्पर्धेत जिंकण्याची माझी कहाणी अगदी रंजक आहे. खरेतर वैयक्तिक कटिबद्धता आणि आव्हानांमुळे माझे लहानपणीचे स्वप्न अंधुक झाले होते, पण एके दिवशी माझा संपर्क दिवा पेजंट्सशी आला आणि मला आश्चर्य वाटले. सौंदर्य स्पर्धांची रचना बहुधा अविवाहित आणि सडपातळ मुलींनी सहभागी होण्याच्या हेतूने चाकोरीबद्ध केली जाते, परंतु दिवा पेजंट्स मात्र विवाहित महिलांचेही ग्लॅमरच्या दुनियेत स्वागत करते. मुख्य म्हणजे सुप्त सामर्थ्य असलेल्या महिलांना पुढे आणण्याची त्यांची इच्छा बघून मलाही तथ्य जाणवले. मग मीही माझ्या कक्षांचा विस्तार करुन कृती करायचे ठरवले. बाकी सर्व इतिहास आहे आणि मी अजुनही माझ्या विजेतेपदाच्या मुकूटाच्या चमचमत्या वलयात आहे. दिवा पेजंट्स हे अनेक महिलांसाठी खऱ्या अर्थाने आयुष्य बदलवून टाकणारे ठरले आहेत. मला ही आय़ुष्यभराची संधी मिळवून दिल्याबद्दल मी माझे मार्गदर्शक आणि दिवा पेजंट्सचे मालक अंजना व कार्ल मस्कारेन्हास यांची ऋणी आहे. ते परिपूर्ण मार्गदर्शक आहेत, ज्यांनी आमची निवड केली, आमच्या व्यक्तीमत्वाला उजाळा दिला आणि आमचे रुपांतर चमचमत्या तारकांत केले. अंजना, कार्ल आणि दिवाचा संपूर्ण संघ यांच्यामुळे मी माझे स्वप्न जगण्याचे धाडस केले आणि विजयी झाले.”

डालिया या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विषयातील मास्टर ऑफ सायन्स पदवीधर असून त्यांनी सौंदर्य स्पर्धेतील प्रवासात मिळालेले पाठबळ, प्रेम व प्रोत्साहन तसेच यशाचे श्रेय विशेषतः आपला साडेतीन वर्षांचा मुलगा रोनिल, पती लिजो वर्गीस, बहीण तुली दत्ता, नणंद लिजी वर्गीस व मित्रपरिवाराला दिले आहे.

डालिया सध्या पुण्यातील ई-झेस्ट सोल्यूशन्स लिमिटेड या बहुराष्ट्रीय माहिती तंत्रज्ञान कंपनीत की अकाऊंट मॅनेजर म्हणून काम करतात. “या ठिकाणी मला संयुक्त राष्ट्रसंघाच्या (युनो) विविध संघटनांसमवेत काम करण्याची संधी मिळाल्याने मी आभारी आहे. मी या कामातून मानवतेप्रती जागतिक प्रभाव निर्माण करण्यात खारीचा वाटा उचलत आहे. माझा कर्म करण्यावर विश्वास आहे आणि माझ्यासाठी मानवता हा सर्वांत मोठा धर्म आहे. संयुक्त राष्ट्र संघाच्या संघटनांसमवेत सहकार्यातून मला नोकरीचे प्रचंड समाधान मिळत आहे.”, असा आनंद त्यांनी व्यक्त केला आहे.

डालिया या नृत्याकांक्षी असून त्यांनी काही वर्षांपूर्वी कथ्थक नृत्य शिकले आहे. सध्या त्या साल्सा व बाशाटा नृत्य प्रकारातही आहेत. त्यांना गायनाची, पाककलेची आवड असून प्रवासही खूप प्रिय आहे. आपण भटकंतीप्रेमी असल्याचे त्या स्मितपूर्वक नमूद करतात.

“सौंदर्य स्पर्धेतील विजेतेपदापर्यंतचा माझा प्रवास तितकासा सोपा नव्हता. घरात लहान मूल आणि कार्य़ालयातील पूर्णवेळची माहिती तंत्रज्ञान नोकरी त्यांच्याकडे पूर्ण लक्ष द्यावे अशी मागणी करत असताना, तसेच इतर कौटुंबिक जबाबदाऱ्या निभावताना तर ते आणखी अवघड होते. ही तारेवरची कसरत करताना मला अवघी ३ तास झोप मिळायची. आपण आपल्या स्वप्नाला न्याय देऊ शकत नाही, की प्रियजनांना, या निराशेने मी अनेकदा कोलमडून पडले, पण मी त्यातूनही उठून मार्ग कायम ठेवला. आता मी यशाची चव चाखली आहे आणि कबूल करते की त्याची सवय लागली आहे. माझे ध्येय आता इतर महिलांना त्यांच्या कोशातून बाहेर काढून त्यांची स्वप्ने जगायला लावण्यासाठी प्रेरणा देण्याचे आहे. एखादी महिला इतर महिलांमध्ये ताकद निर्माण करते तेव्हा ते खरे सक्षमीकरण असते, असे मला वाटते.” या शब्दांत डालिया यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

स्पर्धेच्या नामवंत परीक्षक मंडळात अश्मित पटेल (चित्रपट अभिनेता), मुग्धा गोडसे (अभिनेत्री व मॉडेल), अदिती गोवित्रीकर (अभिनेत्री, मॉडेल व मिसेस वर्ल्ड २००१ बहुमान विजेती), कार्ल मस्कारेन्हास, पिया पावानी, गौरांगी श्रावत, सिमरन गोधवानी, कमल शर्मा (हयातच्या पदाधिकारी) व डॉ. रचना शर्मा यांचा समावेश होता

SHARAD LONKAR
SHARAD LONKARhttps://mymarathi.net/
पुण्याचे स्वतंत्र ,पहिले,ऑनलाइन मराठी न्यूज पोर्टल.. http://mymarathi.net/ पुणे महापालिकेची मुख्य सभा लाईव्ह करणारे सर्वात पहिले न्यूज पोर्टल .. C.G.Registration No.MSME/ MH- 26-0179354,M.G. RC No. DCL 2131000315798079 मालक-संपादक : शरद लोणकर( mobile-9423508306) sharadlonkarpune@gmail.com - State Committe Member Of Digital Media Editor Journalist Association Maharshtra *1984 पासून पुण्यात पत्रकारिता, *आजीव सभासद - अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, *आजीव सभासद - महाराष्ट्र साहित्य परिषद, *पुण्याच्या रस्त्याखाली ३० फुट खोल उतरून पेशवेकालीन भुयारी पाणीपुरवठा यंत्रणेचा प्रत्यक्षात माग काढणारा पहिला पत्रकार म्हणून मान मिळविला ... *स्वातंत्र्य वीर सावरकर यांचे नातू प्रफुल्ल चिपळूणकर हे सारस बागेजवळ भिक्षुकाच्या अवस्थेत दुर्लक्षित जिवन जगत असल्याचे सर्वप्रथम निदर्शनास आणून दिले *इराक मध्ये अडकलेल्या भारतीय मजुरांची सुटका होण्यासाठी विशेष प्रयत्न -लातूर मधील ५ तरुणांची सुटका . *निगडीतील २ महिन्यात दुप्पट पैसे देणाऱ्या सनराईज कन्सल्टन्सी च्या तथाकथित एल टीटीइ हस्तकाचा पर्दाफाश-संबधित फरार https://www.facebook.com/MyMarathiNews/

Share post:

Popular

More like this
Related

आबा बागुल संपूर्ण परिवारासह एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल …

ठाणे |पुणे- संपूर्ण हयात ज्या परिवाराने कॉंग्रेस मध्ये घालविली,...

‘आणीबाणीचे नायक आणि खलनायक’ या पुस्तकाचे विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते प्रकाशन

‘आणीबाणी’ चांगली की वाईट, या वादापेक्षा त्याकडे निरपेक्ष इतिहास...