पुणे-‘सूर्यदत्ता कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझम’ने (एससीएचएमटीटी) जगभरातील हॉस्पिटॅलिटी स्कूल्स व उद्योगांच्या गरजा पूर्ण करणारे हॉस्पिटॅलिटी विषयातील दर्जेदार शिक्षण, प्रशिक्षण व व्यावसायिक प्रमाणन देण्यासाठी ‘अमेरिकन हॉटेल अँड लॉजिंग एज्युकेशनल इन्स्टिट्यूट, मिशिगन’समवेत (एएचएलईआय) सहयोग केल्याचे ‘एससीएचएमटीटी’चे शिक्षण अधिष्ठाता डॉ. संजय चोरडिया यांनी अभिमानपूर्वक जाहीर केले आहे.
या सहयोगांतर्गत दिले जात असलेले अभ्यासक्रम :
१. द स्टार्ट प्रोग्रॅम – एक वर्षाचा शिक्षण व उद्योग समन्वय साधणारा आणि कमवा आणि शिका तत्त्वावरील कार्यक्रम
२. गेस्ट सर्व्हिस गोल्ड : गेस्ट सर्व्हिस (अतिथी सेवा) विषयातील व्यावसायिक प्रमाणन
३. सर्टिफिकेशन प्रोग्रॅम : सहा महिने ते एक वर्षाचा प्रमाणन कार्यक्रम
यासंदर्भात ‘एएचएलईआय’चे विपणन विभागाचे संचालक डॅनी मॅथ्यूज म्हणाले, “स्टार्ट प्रोग्रॅम हा अशा स्वरुपाचा देशात उपलब्ध असलेला असा पहिलाच कार्यक्रम आहे, जो उद्योगाने मापदंड ठरवून दिलेला जागतिक कार्यक्रम असून त्याच्या माध्यमातून शिक्षणक्षेत्र व उद्योगाच्या कामकाजातील पोकळी भरुन निघते. हा कार्यक्रम संपूर्णतः कौशल्यावर भर देणारा असून प्रशिक्षित व कुशल कर्मचारीबळ विकासाच्या काळजीत असलेल्या उद्योगातील नेतृत्वासाठी सज्ज पर्याय आहे. भारतात आमच्या सहा प्रमुख शृंखला असून अनेक संस्थांना या व्यावसायिक प्रमाणनातून प्रचंड फायदा झाला आहे. पुण्याच्या ‘सूर्यदत्ता कॉलेज ऑफ हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट अँड ट्रॅव्हल टुरिझम’शी सहयोग करार करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. त्यांच्या कॅम्पसद्वारे आम्ही हा जागतिक दर्जाचा प्रमाणन कार्यक्रम देऊ करत आहोत.”
हा कार्यक्रम कौशल्य सुधारणा अभ्यासक्रम असून तो केवळ होतकरु हॉटेल व्यावसायिकांसाठीच नव्हे, तर प्रस्थापित हॉटेल व्यावसायिकांसाठीही आहे, ज्यांना आपले ज्ञान अद्ययावत करुन अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय प्रमाणनासह नैपुण्य प्राप्त करण्याची इच्छा आहे, असे डॉ. संजय चोरडिया यांनी बोलून दाखवले.

