पुणे-भारत आणि रशिया यंदा परस्परांतील राजनैतिक संबंधांचा ७० वा वर्धापनदिन साजरा करत आहेत. रशिया हा भारताचा अत्यंत विश्वसनीय आणि काळाच्या कसोटीवर सिद्ध झालेला मित्र आहे. हा पैलू लक्षात घेऊनच भारतीय विद्यार्थी सन १९५० पासून शिक्षणासाठी रशियात स्थलांतरित होत आहेत.
भारतीय विद्यार्थ्यांकडून रशियात शिक्षणासाठी सर्वाधिक पसंतीचे क्षेत्र म्हणजे वैद्यकीय विद्याशाखा. आधीच्या भारतीय विद्यार्थ्यांनी रशियातील छोट्या शहरांत शिक्षण घेतले आहे, परंतु तेथील पायाभूत सुविधांची कमतरता आणि क्लिनिकल प्रॅक्टिसला असणारा कमी वाव यामुळे त्यांचे एमसीआय स्क्रिनिंग टेस्ट्समध्ये नुकसान होत होते आणि त्यांना वैद्यकीय शाखेतील शिक्षण पूर्ण केल्यावर मार्गही बदलावा लागत होता. यामुळे पालक सतर्क झाले आणि त्यांना जाणवू लागले, की केवळ किफायतीपेक्षाही शिक्षणाच्या गुणवत्तेला अधिक महत्त्व आहे.
रशियामध्ये ९७० स्टेट युनिव्हर्सिटी असून त्यातील केवळ दहा विद्यापीठांना फेडरल युनिव्हर्सिटीचा दर्जा आहे. या फेडरल युनिव्हर्सिटींनाच केंद्र सरकारची मान्यता आहे. रशियन फेडरल युनिव्हर्सिटीज जागतिक दर्जाच्या असून त्यांना जगभर, तसेच शिक्षणाच्या बाजारपेठेत ठळक स्थान आहे. तेथील अभ्यासक्रम सहा वर्षांचा असून त्याला ‘मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया’ची मान्यता आहे. प्रवेशासाठी कोणतेही डोनेशन नसते. उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (एचएससी) परीक्षेत ५० टक्के गुण व एनईईटी परीक्षेतील गुण इतकीच पात्रता असते.
फेडरल युनिव्हर्सिटींकडे सिम्युलेशन सेंटर्ससारख्या आधुनिक पायाभूत सुविधा असलेली स्वतःची रुग्णालये आहेत, जेथे विद्यार्थ्यांना गुंतागुंतीच्या केसवर काम करावे लागते आणि ॲनॉटॉमी थिएटर्समध्ये मानवी शरीराचा त्रिमितीत व चार मितींमध्ये अभ्यास करण्याची संधी मिळते. फेडरल युनिव्हर्सिटीचे स्वतःचे निदान केंद्रही आहे, जे विद्यार्थ्यांना निदान व उत्तम शुश्रूषा करण्यात मदत करते.
फेडरल युनिव्हर्सिटी रशियाच्या महानगरांत म्हणजेच ७३ टक्के लोकसंख्या राहात असलेल्या क्षेत्रात वसलेल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना तेथील युनिव्हर्सिटी हॉस्पिटल्समध्ये किरकोळ ते गंभीर आजाराच्या विविध रुग्णांवर उपचारांचा प्रत्यक्ष अनुभव मिळतो. फेडरल युनिव्हर्सिटींची गणना विद्यापीठांच्या जागतिक मानांकन यादीत झाली असल्याने भारतीय विद्यार्थ्यांना अत्यंत दर्जेदार शिक्षण आणि मान्यताप्राप्त पदवीचा लाभ होतो.
या युनिव्हर्सिटींमधील वसतिगृहे सर्व आधुनिक सुविधायुक्त व सुशोभित आहेत. जगभरातील ७० देशांतील विद्यार्थी या परिसरांत अध्ययन करतात.
या युनिव्हर्सिटींच्या ग्रंथालयात भारतीय पुस्तके व प्रश्न संच पुरवले जातात ज्यामुळे विद्यार्थ्यांना एमसीआय परीक्षेच्या तयारीसाठी मदत होते. येथे विद्यार्थ्यांना ऑक्स्फर्ड व केंब्रीज विद्यापीठांती ईबुक्सही वाचता येतात. येथील अध्यापन पद्धती प्रात्यक्षिक आणि सैद्धांतिक आधारित आहे.
‘ए. के. एज्युकेशनल कन्सल्टंट्स’चे संचालक डॉ. अमित कामले, एम.डी.(रशिया) हे रशियन मेडिकल युनिव्हर्सिटींचे भारतातील अधिकृत प्रतिनिधी असून ते रशियासमवेत सहयोगाने गेली १८ वर्षे काम करत आहेत. ते म्हणाले, “फेडरल युनिव्हर्सिटींनी भारतीय विद्यार्थ्यांसाठी त्यांची दारे उघडल्याचा मला खूप आनंद झाला आहे. फेडरल युनिव्हर्सिटी ही रशियातील अत्युच्च विद्यापीठे असल्याने भारतीय विद्यार्थ्यांना तेथील विविधतापूर्ण संस्कृती व पदवीचा लाभ होईल. या विद्यापीठांची निवड प्रक्रिया अन्य विकसनशील देशांप्रमाणे नसते. तेथे प्रवेशेच्छुक विद्यार्थ्यांचे जीवशास्त्र व रसायनशास्त्राचे मूलभूत ज्ञान तपासले जाते आणि त्यातील सर्वोत्तम विद्यार्थ्यांनाच शिक्षणासाठी कॅम्पसमध्ये प्रवेश मिळतो. ही सर्व प्रक्रिया केवळ गुणवत्तेवर आधारित असते. त्यामुळे आपला पाल्य दुय्यम दर्जाच्या संस्थेत शिकत असल्याची काळजी करण्याचे पालकांना कारण नाही.”
फेडरल युनिव्हर्सिटींमध्ये शिकताना वैद्यकीय समस्या सोडवण्याचा प्रत्यक्ष अनुभव मिळण्यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षकांशी, तसेच कार्यपद्धतीशी कधीही संपर्क साधता येतो. फेडरल युनिव्हर्सिटी अमेरिका, युके, युरोप, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड आदी जागतिक नामवंत विद्यापीठांसमवेत स्टुडंट एक्स्चेंज प्रोग्रॅम राबवत असल्याने भारतीय विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षणाच्या प्रत्येक पैलूतील सर्वोत्तम गोष्टींची प्राप्ती होते.
रशियातील फेडरल युनिव्हर्सिटींनाही महाराष्ट्रातील विद्यापीठांशी सहयोगाची इच्छा आहे. मुंबई विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. संजय देशमुख व पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांची भेट घेतल्यानंतर “या नामवंत विद्यापीठांशी सहयोग करायला आम्हाला आवडेल,” अशी प्रतिक्रिया रशियातील ‘इमॅन्युएल कान्ट बाल्टिक फेडरल युनिव्हर्सिटी’च्या कुलगुरु डॉ. एल्मिरा झिल्बर यांनी व्यक्त केली आहे.
“भारतीय विद्यार्थी अत्यंत बुद्धिमान असतात आणि आमच्या कॅम्पसमध्ये त्यांचे स्वागत आहे,” या शब्दांत कझान फेडरल युनिव्हर्सिटीच्या कुलगुरु प्रा. इल्शात गाफुरोव्ह यांनीही प्रशंसा केली.